AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवसेनेची 1 मार्चला सभा, नाणार प्रकरणी भूमिका स्पष्ट करणार

शिवसेना नाणारबाबत येत्या 1 मार्चला सभा घेणार असून यावेळी शिवसेना आपली भूमिका जाहीर करणार आहे.

शिवसेनेची 1 मार्चला सभा, नाणार प्रकरणी भूमिका स्पष्ट करणार
Nupur Chilkulwar
Nupur Chilkulwar | Updated on: Feb 23, 2020 | 1:19 PM
Share

रत्नागिरी : सत्तास्थापनेनंतर शिवसेनेची नाणार प्रकल्पाबाबतची (Shivsena Meeting About Nanar) भूमिका बदलली का?, असा प्रश्न विरोधकांकडून विचारला जात आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना नाणारबाबत जाहीर सभा घेणार आहे. येत्या 1 मार्चला नाणार गावात ही सभा होणार असून यावेळी शिवसेना आपली भूमिका जाहीर करणार आहे.

नाणार प्रकरणी ( Maharashtra Nanar Refinery project) विरोधकांकडून शिवसेनेवर सडकून टीका होत (Shivsena Meeting About Nanar) आहे. शिवसेना दुहेरी भूमिका घेत असल्याचा आरोप विरोधकांनी केला. याबाबत नाणारच्या सभेत शिवसेना आपली भूमिका स्पष्ट करणार आहे. या सभेला पक्षाचे खासदार आणि इतर नेतेही उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.

दुसरीकडे, काही शिवसेना पदाधिकाऱ्यांनी देखील नाणार प्रकल्पाला पाठिंब्याची भूमिका घेतली आहे. नाणार रिफायनरी समर्थनार्थ शिवसेनेचे स्थानिक नेते एकवटले आहेत. नाणार रिफायनरीला शिवसेना पदाधिकाऱ्यांनी समर्थन दिलं आहे. त्यामुळे नाणार रिफायनरी प्रकरणी शिवसेनेला धक्का बसण्याची शक्यता आहे.

‘ऑपरेशन नाणार’ची जबाबदारी आमदार प्रसाद लाडकडे

नाणार रिफायनरीला शिवसेना पदाधिकाऱ्यांचे समर्थन प्रकरणाचे आता राजकीय पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. शिवसेनला राम-राम केलेल्या शिवसैनिकांची भाजप आमदार प्रसाद लाड यांच्यासोबत एक गुप्त बैठक पार पडली. राजापूरमध्ये ही गुप्त बैठक पार पडली. सध्या ‘ऑपरेशन नाणार’ची जबाबदारी आमदार प्रसाद लाड यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

सामूहिकरित्या पक्षाचा राजीनामा दिलेले शिवसेनेचे सर्व पदाधिकारी भाजपच्या विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. येत्या बुधवारी दिल्लीत ही भेट होणार असल्याची शक्यता आहे.

नाणार समर्थनाचा मुद्दा पुन्हा एकदा पेटणार

शिवसेनेच्या सागवे जिल्हा परिषद गटातील उपविभागप्रमुखासह 22 शाखा प्रमुखांनी सामूहिक राजीनामे दिले होते. शिवसेना विभाग प्रमुख राजा काजवे यांच्यावर झालेली कारवाई ही अन्यायकारक असल्याचा आरोप करत या पदाधिकाऱ्यांनी (Shivsena Meeting About Nanar) राजीनामे दिले होते.

नाणार रिफायनरी प्रकल्प नेमका काय?

कोकणातील निसर्गसंपन्न अशा रत्नागिरी-सिंधुदुर्गाच्या सीमेवर नाणार तेलशुद्धीकरण (रिफायनरी) प्रकल्प प्रस्तावित होता. रत्नागिरीतील राजापूर तालुक्यातील 14 गावं आणि सिंधुदुर्गातील देवगड तालुक्यातील 2 गावांमध्ये प्रकल्पाचा विस्तार होणार होता. 13000 एकरावर हा प्रकल्प उभारला जाणार होता. नागरिकांचा विरोध असतानाही, या गावांमधील क्षेत्र 18 मे 2017 रोजी आद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आलं.

हिंदुस्थान पेट्रोलियम, इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियम या तीन सरकारी कंपन्या नाणार रिफायनरी प्रकल्प उभारत असून, त्यांची संयुक्तपणे रत्नागिरी रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल लिमिटेड म्हणजेच RRPCL कंपनी 22 सप्टेंबर 2017 रोजी स्थापन करण्यात आली.

काही महिन्यांपूर्वीच सौदी अरेबियाच्या अरामको कंपनीशी नाणार रिफायनरीबाबत करार झाला. नाणार रिफायनरीच्या उभारणीला तीन लाख कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. आशियातील सर्वात मोठा रिफायनरी प्रकल्प असल्याचे सांगण्यात येत असून, 2023 पर्यंत हा प्रकल्प कार्यन्वित करण्याचा सरकारचा विचार आहे.

आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे, प्रस्तावित नाणार रिफायनरी प्रकल्पापासून अवघ्या 15-16 किलोमीटरच्या अंतरावर जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प आहे.

Follow Us
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...