कृषीमंत्री दादा भुसेंच्या मुलाचं शिवसेना खासदाराच्या कन्येशी लग्न, गुपचूप लगीन उरकलं!

अनिश बेंद्रे

|

Updated on: Apr 26, 2021 | 7:23 PM

सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी या सोहळ्यास उपस्थित राहून वधू वरांना शुभ आशीर्वाद दिला (Dada Bhuse son wedding Rajan Vichare Daughter)

कृषीमंत्री दादा भुसेंच्या मुलाचं शिवसेना खासदाराच्या कन्येशी लग्न, गुपचूप लगीन उरकलं!
आविष्कार दादाजी भुसे आणि लतीशा राजन विचारे यांचे मालेगावात लग्न

मनमाड : शिवसेनेच्या दिग्गज नेत्यांच्या मैत्रीचं रुपांतर आता नात्यामध्ये झालं आहे. राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांचा मुलगा आविष्कार आणि ठाण्याचे खासदार राजन विचारे यांची कन्या लतीशा यांचा विवाह झाला. मालेगावातील आनंद फार्म इथे छोटेखानी विवाह सोहळा संपन्न झाला. या लग्नाबाबत अतिशय गुप्तता पाळण्यात आली होती. (Shivsena Minister Dada Bhuse son wedding with MP Rajan Vichare Daughter)

मालेगाावातील फार्महाऊसवर लगीनगाठ

अविष्कार दादाजी भुसे आणि लतीशा राजन विचारे मालेगावमधील आनंद फार्म येथे विवाह बंधनात अडकले. या विवाह सोहळ्याविषयी अतिशय गुप्तता बाळगण्यात आली होती. ‘मोजक्या’ नातेवाईकांव्यतिरिक्त इतर वऱ्हाडी मंडळींना या विवाह सोहळ्यात ‘नो एन्ट्री’ देण्यात आली आहे. मीडियालाही या सोहळ्यात प्रवेश देण्यात आला नव्हता.

ज्या फार्म हाऊसवर हा विवाह सोहळा झाला, त्या फार्म हाऊसच्या गेटवर परवानगीशिवाय आत येऊ नये असा फलक लावण्यात आला होता. या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी कोणालाही परवानगी देण्यात आलेली नाही. मात्र विशेष अतिथी आणि त्यांच्या वाहनांना परवानगी देण्यात आली.

आमदार-खासदारांच्या गाड्यांनाच केवळ एन्ट्री

राज्यातील काही आमदार, खासदार यांच्या गाड्या गेटमधून सोडण्यात आल्या. पोलीस आणि सुरक्षा पथकांचा मात्र या ठिकाणी राबता पाहायला मिळाला. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी या सोहळ्यास उपस्थित राहून वधू वरांना शुभ आशीर्वाद दिला. तर अन्न पुरवठा मंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी या विवाह सोहळ्यात ऑनलाईन सहभागी होऊन आविष्कार आणि लतीशा यांना आशीर्वाद दिला.

(Dada Bhuse son wedding Rajan Vichare Daughter)

छगन भुजबळ यांची व्हर्चुअल उपस्थिती

नितीन राऊत यांच्या मुलाच्या रिसेप्शनला काट

याआधी, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या मुलाचं फेब्रुवारी महिन्यात लग्न झालं. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राऊत यांनी आपल्या मुलाच्या लग्नानिमित्त आयोजित स्वागत समारंभ स्थगित केला होता. तसं पत्रक काढत ऊर्जामंत्र्यांनी सामाजिक भान दाखवलं होतं.

संबंधित बातम्या :

राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे लग्नबंधनात, विवाह सोहळ्याला शरद पवार, भुजबळांची उपस्थिती

ऊर्जामंत्री नितीन राऊतांचं सामाजिक भान, कोरोनामुळे मुलाच्या विवाहाचा स्वागत समारंभ स्थगित

(Shivsena Minister Dada Bhuse son wedding with MP Rajan Vichare Daughter)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI