खडसे निष्ठावंत नाहीत, त्यांना शिवसेना स्टाईलने उत्तर देणार, स्थानिक आमदाराचा हल्लाबोल

भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावर अखेर आज शिक्कामोर्तब झालं. याबाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अधिकृत घोषणा केली आहे.

खडसे निष्ठावंत नाहीत, त्यांना शिवसेना स्टाईलने उत्तर देणार, स्थानिक आमदाराचा हल्लाबोल

जळगाव : भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावर अखेर आज शिक्कामोर्तब झालं. याबाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अधिकृत घोषणा केली आहे. एकनाथ खडसे यांनी भाजपचा त्याग केला असून ते शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, असे जयंत पाटील यांनी सांगितले.

राज्याच्या राजकारणात घडत असलेल्या या घटनेबाबत अनेक राजकीय मंडळींकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. महाविकास आघाडीतले नेते खडसेंचं स्वागत करत आहेत, तर भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांमधील नेते आत्मचिंतनाबाबत बोलू लागले आहेत. यातच आता राष्ट्रवादीसोबत सत्तेत असलेल्या शिवसेनेच्या आमदाराने वेगळी भूमिका घेतली आहे.

शिवसेनेचे स्थानिक आमदार चंद्रकांत पाटील एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत बोलताना म्हणाले की, “एकनाथ खडसे हे निष्ठावंत नेते नाहीत. पुढे पाहा काय काय होतंय. खडसेंनी मला त्रास दिला, शिवसेनेच्या नेत्यांवर खोटे गुन्हे दाखल केले होते”. (ShivSena mla Chandrakant Patil says Eknath Khadse is not loyal leader)

“खडसेंच्या राष्ट्रवादी पक्ष प्रवेशानंतर मी खासदार शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे. खडसेंनी जर माझ्या मतदार संघात हस्तक्षेप केला तर मी शिवसेना स्टाईलने त्यांना ऊत्तर देईन. मी आत्ताच या विषयावर फार बोलणार नाही. पण मी करून दाखवेन आणि तेव्हा ती मोठी बातमी होईल”.

भाजप सोडण्याबाबत खडसे काय म्हणाले?

“मी भाजपच्या प्राथमिक सदस्याचा राजीनामा आज दिला. गेल्या 40 वर्षात मी भाजपचं काम केलं. भाजप जिथे पोहोचला नव्हता, तिथे आम्ही पोहोचवली. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी मला छळले, माझ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करायला लावला” असं एकनाथ खडसे म्हणाले.

गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, पांडुरंग फुंडकरांसारखे कितीतरी नेते होते, त्यांच्यासोबत आजतागातयत भाजपचं काम केलं. भाजपने मला अनेक मोठी पदं दिली, मी ते नाकारु शकत नाही. मी भाजपवर किंवा केंद्रातील नेत्यावर टीका केली नाही, असं खडसे म्हणाले. माझ्यासोबत एकही आमदार, एकही खासदार नाही. रक्षाताई भाजप सोडणार नाहीत, असं सांगितले आहे, त्यांचा निर्णय घेण्यासाठी त्या सक्षम आहेत, असंही खडसे म्हणाले.

संबंधित बातम्या

देवेंद्र फडणवीसांनी खडसेंवर अन्याय केला नाही: गिरीश महाजन

भाजपचा हात सोडताच खडसेंचं ट्विटरवर नवं रुप, नाव आणि कव्हरपेजही बदललं

‘टिक टिक वाजते…’ खडसेंच्या राजीनाम्यानंतर कन्या रोहिणी खडसेंचा फेसबुकवर सूचक फोटो

Raksha Khadse | एकनाथ खडसेंच्या राजीनाम्यानंतर खासदार सूनबाई रक्षा खडसे म्हणतात…

यशाची शिखरं पादाक्रांत करताना पायाची दगडं का निसटत आहेत?; खडसेंच्या राजीनाम्यावरून मुख्यमंत्र्यांचा भाजपला टोला

(ShivSena mla Chandrakant Patil says Eknath Khadse is not loyal leader)

Published On - 5:32 pm, Wed, 21 October 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI