भाजपकडून अशोक चव्हाणांच्या बालेकिल्ल्यात शिवसेना आमदार मैदानात?

नांदेड : लोकसभा निवडणुकीसाठी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या बालेकिल्ल्यात भाजपकडून आमदार प्रताप पाटील चिखलीकर रिंगणात उतरणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. ‘टीव्ही 9 मराठी’ला मिळालेल्या विश्वसनीय माहितीनुसार, नांदेडमध्ये भाजपतर्फे प्रताप पाटील चिखलीकर हे मैदानात असतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि प्रताप पाटील यांच्या भेटीत ही उमेदवारी फायनल झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान प्रताप पाटील यांच्या […]

भाजपकडून अशोक चव्हाणांच्या बालेकिल्ल्यात शिवसेना आमदार मैदानात?
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:14 PM

नांदेड : लोकसभा निवडणुकीसाठी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या बालेकिल्ल्यात भाजपकडून आमदार प्रताप पाटील चिखलीकर रिंगणात उतरणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. ‘टीव्ही 9 मराठी’ला मिळालेल्या विश्वसनीय माहितीनुसार, नांदेडमध्ये भाजपतर्फे प्रताप पाटील चिखलीकर हे मैदानात असतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि प्रताप पाटील यांच्या भेटीत ही उमेदवारी फायनल झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान प्रताप पाटील यांच्या उमेदवारीमुळे त्यांचे समर्थक कामाला लागले आहेत. तर काँग्रेसची डोकेदुखी मात्र वाढणार आहे.

आमदार प्रताप पाटील चिखलीकर कोण आहेत

प्रताप पाटील चिखलीकर हे लोहा-कंधार विधानसभेचे शिवसेनेचे आमदार आहेत. शिवसेनेकडून निवडून आल्यानंतर ते मुख्यमंत्री फडवणीस यांचे समर्थक बनले, ते आजतागायत कायम आहेत. यापूर्वी एकदा अपक्ष आमदार म्हणून ते याच मतदारसंघात निवडून आले होते. स्वर्गीय विलासराव देशमुख, शरद पवार आणि अजित पवार यांच्याशी त्यांची सलगी होती.

मूळचे काँग्रेसी असलेले प्रताप पाटील यांचं स्थानिक पातळीवर अशोक चव्हाण यांच्याशी गेल्या काही वर्षांपासून जूळत नाही. त्यामुळेच आता लोकसभेच्या निवडणुकीत भाजप प्रताप पाटील यांना मैदानात उतरवत आहे. खरं तर त्यांचा लोहा हा विधानसभा मतदारसंघ लोकसभेच्या लातूर मतदारसंघात येतो. असं असतानाही काँग्रेसला टक्कर देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी प्रताप पाटील यांना नांदेडमध्ये उतरवण्याचा निर्णय जवळपास निश्चित केला आहे.

प्रताप पाटील यांच्या उमेदवारीमुळे नांदेडची निवडणूक काँग्रेससाठी एकतर्फी होणार नाही, हे उघड आहे. त्यामुळे काँग्रेससाठी चिखलीकर यांची उमेदवारी जड जाईल असं चित्र आहे. दरम्यान काँग्रेसकडून स्वतः अशोक चव्हाणच निवडणूक रिंगणात उतरतील, असं काँग्रेस कार्यकर्त्यांनी सांगितलं.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.