AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पहिल्यांदाच घडणार… मनसे-ठाकरे गटाचं ठरलं, उद्या मुंबईत एकत्र आंदोलन

राज्यात गेल्या काही दिवसांपासून मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युतीची चर्चा सुरु आहे. अशातच आता उद्या मुंबईत मनसे आणि ठाकरे गटाच आंदोलन होणार आहे.याबाबत माहिती जाणून घेऊयात.

पहिल्यांदाच घडणार... मनसे-ठाकरे गटाचं ठरलं, उद्या मुंबईत एकत्र आंदोलन
Shivsena MNS Protest
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Jun 17, 2025 | 7:39 PM
Share

राज्यात गेल्या काही दिवसांपासून मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युतीची चर्चा सुरु आहे. या युतीबाबत सकारात्मक संकेतही मिळत आहेत. अशातच आता या दोन्ही पक्षांचे कार्यकर्ये एकत्र येणार आहेत. उद्या मुंबईत मनसे आणि ठाकरे गटाच आंदोलन होणार आहे. हे आंदोलन कशाविरोधात असेल ते जाणून घेऊयात.

कामगार आयुक्तांच्या कार्यालयासमोर आंदोलन

समोर आलेल्या माहितीनुसार, मनसे आणि ठाकरे गट इंडिगो अंतर्गत येणाऱ्या अजाईल कंपनीच्या विरोधात आंदोलन करणार आहेत. उद्या (बुधवार) 11 वाजता प्रादेशिक मुंबईतील कामगार आयुक्त यांच्या कार्यालयासमोर हे आंदोलन होणार आहे. भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष आणि ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत तसेच मनसेचे वरळी विभाग अध्यक्ष यांच्या उपस्थितीत हे आंदोलन पार पडणार आहे.

दोन्ही नेत्यांनी एकत्र यावे ही कार्यकर्त्यांची इच्छा

एकीकडे ठाकरे गट आणि मनसे एकत्र येणार अशा चर्चा सुरु असताना मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाचं हे आंदोलन सर्वांचे लक्ष वेधून घेणार आहे. याआधीही दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांनी राज आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे अशी भावना व्यक्ती केली होती, त्यानंतर आता कार्यकर्ते एकत्र रस्त्यावर उतरुन आंदोलन करणार आहेत.

ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा का सुरु झाली?

चित्रपट अभिनेते महेश मांजरेकर यांनी राज ठाकरे यांची मुलाखत घेतली होती. या मुलाखतीत राज यांनी मनसे-शिवसेनेच्या युतीबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. याला उत्तर देताना राज यांनी, ‘एकत्र येऊन राहणे मला कठीण वाटत नाही. महाराष्ट्रातील मराठी लोकांच्या अस्तित्वासाठी आमचे वाद आणि भांडणे खूपच लहान आहेत’ असे विधान केले होते. तेव्हापासून या युतीची चर्चा सुरु झाली.

यानंतर उद्धव ठाकरे यांनीही सकारात्मक प्रतिक्रिया देताना, मी छोटे छोटे वाद बाजूला ठेवण्यास तयार आहे, महाराष्ट्रातील लोकांना जे हवे आहे ते होईल असं म्हटलं होतं. त्यामुळे या युतीच्या चर्चांना अधिक जोर आला. त्यानंतर दोन्ही पक्षाच्या काही नेत्यांच्या कार्यक्रमांमध्ये भेटीगाठीही झाल्या. मात्र अजून युतीचा निर्णय अंतिम झालेला नाही.

Follow Us
साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे...
Devendra Fadnavis : साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे हात जोडत शेतकरी ढसा ढसा रडला
निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून...
Ram Kadam : निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून राम कदमांचा पलटवार
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी...
Shiv Sena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी झालीच नाही; आता पुढे...
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती, ChatGPT संदर्भांतील आरोपाचं काय होणार?
देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल
Kapil Sibal : देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल, नेमकी काय केली मागणी?
निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर..
Satej Patil : निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर थेट आरोप
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई, 80 मंडळांवर गुन्हे
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी