AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एनडीएतून बाहेर पडल्याची खंत नाही, उलट आनंद : विनायक राऊत

एनडीएतून बाहेर पडल्याची खंत नाही, उलट आनंद, असं वक्तव्य शिवसेनेचे लोकसभेचे गटनेते आणि खासदार विनायक राऊत (Vinayak raut criticized on bjp)  यांनी केले.

एनडीएतून बाहेर पडल्याची खंत नाही, उलट आनंद : विनायक राऊत
| Edited By: | Updated on: Nov 17, 2019 | 8:11 PM
Share

मुंबई : एनडीएतून बाहेर पडल्याची खंत नाही, उलट आनंद, असं वक्तव्य शिवसेनेचे लोकसभेचे गटनेते आणि खासदार विनायक राऊत (Vinayak raut criticized on bjp)  यांनी केले. आज (17 नोव्हेंबर) दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना शिवतीर्थावर अभिवादन करण्यासाठी विनायक राऊत (Vinayak raut criticized on bjp) दिल्लीवरुन मुंबई आले यावेळी त्यांनी आपले मत व्यक्त केले.

“एनडीएतून बाहेर पडल्याची खंत नाही, उलट आनंद आता मोकळ्या वातावरणात उडायला मिळत आहे”, असं विनायक राऊत म्हणाले.

“शिवसेनेची सभागृहात बसण्याची वेगळी व्यवस्था होऊ शकेल, पण शिवसेनेचा आवाजाला कुणी ब्रेक लावू शकत नाही. भाजपची ही विनाश काले विपरित बुद्धी आहे. भगवंत त्यांना बुद्धी देवो. शिवसेना अन्यायाविरुद्ध बोलत राहणार”, असं राऊत म्हणाले.

“महाराष्ट्रातील अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झालं हा विषय संसदेत प्राधान्याने लावणार. बेरोजगारीचा प्रश्न प्रकर्षाने मांडणार. सरकारच्या देशवासीयांच्या हिताच्या मुद्याला समर्थन देऊ पण देशवासीयांच्या हिताच्या विरुद्ध असलेल्या मुद्याला विरोध करु”, असंही राऊत म्हणाले.

“भाजपने चक्रव्यूह रचून शिवसेनेची कोंडी करण्याचे कितीही डावपेच आखले तरी ते भेदण्याचे धारिष्ट्य शिवसेनेकडे आहे. सत्ता समीकरणावर मोदींशी कुठलीही चर्चा झालेली नाही. आमचा आक्रमक पवित्रा सर्वांना संसदेत पाहायला मिळेल”, असं विनायक राऊत यांनी सांगितले.

एनडीएच्या बैठकीला शिवसेना खासदार गैरहजर

शिवसेनेला एनडीएच्या बैठकीचं निमंत्रणच नाही. त्यामुळे शिवसेना बैठकीला जाणार नाही, असा दावा शिवसेनेचे लोकसभेचे गटनेते आणि खासदार विनायक राऊत यांनी केला होता. तर दुसरीकडे भाजपने शिवसेना एनडीएच्या बैठकीला गैरहजर राहिल्याने त्यांना संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी बाकावर जागा दिली आहे.

KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.