राम मंदिराचे भूमिपूजन पक्षाचे नाही, तर राम भक्तांचे, विनायक राऊतांचा टोला

राम मंदिराचे भूमिपूजन पक्षाचे नाही, तर राम भक्तांचे, विनायक राऊतांचा टोला

सरकारमधील कुरबुरी सोडवण्यास महाविकास आघाडीचे नेते सक्षम आहेत," असे विनायक राऊत यावेळी (Vinayak Raut On Ayodhya Ram Mandir Temple) म्हणाले.

Namrata Patil

|

Jul 29, 2020 | 4:07 PM

रत्नागिरी : येत्या 5 ऑगस्टला अयोध्येत राम मंदिर भूमिपूजन सोहळा होणार आहे. या सोहळ्याची जय्यत तयारी सध्या अयोध्येत सुरु आहे. मात्र या सोहळ्याचे निमंत्रण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यात आलेले नाही. यावरुन शिवसेनेच्या नेत्यांनी भाजपवर टीका करायला सुरुवात केली आहे. प्रभू रामचंद्र हे केवळ आणि केवळ भाजपचे आहेत, हे दाखवण्याचा प्रयत्न भाजपकडून होतो आहे, अशी टीका शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केली आहे. (Vinayak Raut On Ayodhya Ram Mandir Temple Stone Foundation Program)

“राम मंदिर निर्मितीचा मार्ग ज्यांच्या ज्यांच्या प्रयत्नातून होतो आहे, त्यांची जाणीव ठेवणं आज आवश्यक आहे. पण दुदैवाने तसे होत नाही. कदाचित उद्धव ठाकरे रामजन्मभूमीत गेले तर राम मंदिराचे श्रेय शिवसेनेला जाईल, याची भाजपला भिती वाटत असेल,” असे विनायक राऊत म्हणाले.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर

“आता राम मंदिराचे भूमिपूजन पक्षाचे नाही तर राम भक्तांचे आहे हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. उद्धव ठाकरे यांनी ऑनलाईन भूमिपूजनाचा पर्याय सुचवला आहे, तो योग्यच आहे. राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने शेकडो लोकांना एकत्र बोलवणं योग्य नाही. असे केल्याने आयसीएमआरच्या निर्णयाचे हे उल्लंघन होईल,” असेही विनायक राऊत यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा – Ayodhya Ram Mandir | रामाच्या जन्मापासून ते लंका दहनापर्यंतचे सर्व प्रसंग भिंतीवर, भूमिपूजनासाठी अयोध्या सज्ज

“महाविकासआघाडीचे सरकार मजबूत आहे. सरकारमधील कुरबुरी सोडवण्यास महाविकास आघाडीचे नेते सक्षम आहेत,” असे विनायक राऊत यावेळी म्हणाले.

“नाणार रिफायनरी संदर्भात केंद्राकडून राज्याला कुठलेही अल्टिमेंटम नाही. अशा वावड्या म्हणजे प्रकल्पाच्या दलालांनी उठवलेली आरोळी आहे. स्थानिकानी म्हटलं तर सरकार नाणारचा करार करायला तयार आहे. पण सध्या स्थानिकांचा या प्रकल्पाला विरोध आहे. त्यामुळे प्रकल्पाला विरोध कायम असल्याचे विनायक राऊत यांनी सांगितले.” (Vinayak Raut On Ayodhya Ram Mandir Temple Stone Foundation Program)

संबंधित बातम्या : 

राम जन्मभूमी आमच्या आत्मियतेचा विषय, निमंत्रण कोणाला द्यायचे मंदिर समितीचा निर्णय : अनिल परब

Ayodhya | पंतप्रधान मोदींचे भाषण, 200 पाहुणे, राम मंदिर भूमिपूजनाचा कार्यक्रम ठरला

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें