AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गणेश नाईक ‘शिल्पकार’ नव्हे तर ‘मिस्टर पाचटक्के’; शिवसेनेची जळजळीत टीका

स्वत:ला नवी मुंबईचे शिल्पकार म्हणवून घेणाऱ्यांचा शहराच्या विकासात कुठलाही सहभाग नाही. शिल्पकार घराण्याच्या बाहेर कोणालाही पद देत नाहीत. | Ganesh Naik

गणेश नाईक 'शिल्पकार' नव्हे तर 'मिस्टर पाचटक्के'; शिवसेनेची जळजळीत टीका
गणेश नाईक यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. त्यांची अवस्था ही बुडत्या जहाजाप्रमाणे झाली आहे.
| Updated on: Jan 17, 2021 | 1:32 PM
Share

नवी मुंबई: गणेश नाईक हे भाजपमधून शिवसेनेत गेलेल्या नगरसेवकांना गद्दार म्हणतात. सायकलवरून फिरणाऱ्या गणेश नाईक (Ganesh Naik) यांना ठाकरे आणि पवारांनी मोठे केले. मात्र, नाईकांनी त्यांची साथ सोडली. त्यामुळे खरे गद्दार तुम्ही आहात, अशी जळजळीत टीका शिवसेना नेते विजय नाहटा यांनी केली. (Mahavikas Aghadi Melava in Navi Mumbai)

ते रविवारी नवी मुंबईतील महाविकासआघाडीच्या मेळाव्यात बोलत होते. यावेळी विजय नाहटा यांनी गणेश नाईक यांच्यावर सडकून टीका केली. स्वत:ला नवी मुंबईचे शिल्पकार म्हणवून घेणाऱ्यांचा शहराच्या विकासात कुठलाही सहभाग नाही. शिल्पकार घराण्याच्या बाहेर कोणालाही पद देत नाहीत. फक्त कंत्राटातून आपल्या कमिशनचे पाच टक्के घेतात. त्यामुळे गणेश नाईक यांना शिल्पकार नव्हे तर ‘मिस्टर पाचटक्के’ म्हटले पाहिजे, असे टीकास्त्र विजय नाहटा यांनी सोडले.

नवी मुंबईची धनशक्ती मोडीत काढू: शशिकांत शिंदे

नवी मुंबईत नगरेसवकांची यादी पाहिली तर महाविकासआघाडी भक्कम आहे. या निवडणुकीत धनशक्तीचा वापर केला जाईल. पण आपण जनशक्तीच्या बळावर निवडून येऊ, असा विश्वास शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केला. भाजपवाले सतत सरकार पडेल अशी चर्चा घडवून आणतात. मात्र, आमचे संजय राऊत त्यांना पुरून उरतात. शरद पवार आणि उद्धव ठाकरे हेदेखील खंबीर आहेत. तेव्हा आता नवी मुंबईतील धनशक्ती मोडून काढायची, असा निर्धार शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केला.

‘पक्ष बघू नका फक्त महाविकास आघाडी बघून मतदान करा’

नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत जनतेने पक्ष बघून नव्हे तर महाविकासआघाडी बघून मतदान करावे, असे आवाहन काँग्रेस नेते अस्लम शेख यांनी केले. आज देश संकटात असताना भाजपला त्याचे काही नाही. पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या वाढलेल्या दरांविषयी भाजप काहीच का बोलत नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

नवी मुंबईत महाविकास आघाडीचे नेते एकत्र; गणेश नाईकांच्या सत्तेला हादरा बसणार?

नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीनेही मोर्चेबांधणी सुरू केली आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीचे नेते आज नवी मुंबईत एकत्र आले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी गेल्या 20 वर्षांपासूनच्या भाजप नेते गणेश नाईक यांच्या पालिकेतील सत्तेला हादरा देणार का? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे

वाशीमध्ये महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या निमित्ताने काँग्रेस नेते अस्लम शेख, राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे, आनंद परांजपे, जितेंद्र आव्हाड, शिवसेना उपनेते विजय नाहटा, माजी खासदार राजन विचारे आदी नेते या मेळाव्यात उपस्थित आहेत.

संबंधित बातम्या:

Breaking | केंद्राच्या कृषी कायद्यांविरुद्ध मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार रस्त्यावर उतरणार

नवी मुंबईत महाविकास आघाडीचे नेते एकत्र; गणेश नाईकांच्या सत्तेला हादरा बसणार?

कर्नाटकव्याप्त प्रदेश महाराष्ट्रात आणणारच; मुख्यमंत्र्यांनी ठणकावले

(Mahavikas Aghadi Melava in Navi Mumbai)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.