AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! मनसे-ठाकरे गटाच्या नेत्यांची एकत्र पत्रकार परिषद; नेमकं काय बोलणार?

मनसे आणि ठाकरे गटाचे महत्त्वाचे नेत उद्या (25 जून) एकत्र पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत दोन्ही नेते नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

मोठी बातमी! मनसे-ठाकरे गटाच्या नेत्यांची एकत्र पत्रकार परिषद; नेमकं काय बोलणार?
Shivsena mns Press
| Updated on: Jun 24, 2025 | 8:49 PM
Share

राज्यात गेल्या काही काळापासून मनसे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युतीबाबत चर्चा चालू आहे. दोन्ही बाजूंनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. यानंतर आता मनसे आणि ठाकरे गटाचे महत्त्वाचे नेत उद्या (25 जून) एकत्र पत्रकार परिषद घेणार आहेत. अर्थात ही पत्रकार परिषद युतीसंदर्भातील चर्चेवर नसली तरी दोन्ही पक्षांचे नेते त्यानिमित्ताने एकत्र येणार असल्याने वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. तसेच या पत्रकार परिषदेत दोन्ही नेते नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मनसे आणि ठाकरे गट उद्या 24 जूनला एकत्र पत्रकार परिषद घेणार आहेत. या परिषदेला शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत आणि मनसेचे माजी आमदार नितीन सरदेसाई संबोधित करणार आहेत. इंडिगो एअरलाइन्स कर्मचाऱ्यांबाबत भाजपच्या कामगार युनियनने केलेला खोटारडेपणा हे दोन्ही नेते उघड करणार आहेत. उद्या दुपारी ठीक 12.30 वाजता ही पत्रकार परिषद पार पडणार आहे.

आठवडाभरापूर्वी एकत्र आंदोलन

मनसे आणि ठाकरे गटाने इंडिगो अंतर्गत येणाऱ्या अजाईल कंपनीच्या विरोधात 18 जूनला एकत्र आंदोलन केले होते. प्रादेशिक मुंबईतील कामगार आयुक्त यांच्या कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात खासदार अरविंद सावंत हे सहभागी झाले होते. या आंदोलनात मनसे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा का सुरु झाली?

चित्रपट अभिनेते महेश मांजरेकर यांनी राज ठाकरे यांची मुलाखत घेतली होती. या मुलाखतीत राज यांनी मनसे-शिवसेनेच्या युतीबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. याला उत्तर देताना राज यांनी, ‘एकत्र येऊन राहणे मला कठीण वाटत नाही. महाराष्ट्रातील मराठी लोकांच्या अस्तित्वासाठी आमचे वाद आणि भांडणे खूपच लहान आहेत’ असे विधान केले होते. तेव्हापासून या युतीची चर्चा सुरु झाली.

यानंतर उद्धव ठाकरे यांनीही सकारात्मक प्रतिक्रिया देताना, मी छोटे छोटे वाद बाजूला ठेवण्यास तयार आहे, महाराष्ट्रातील लोकांना जे हवे आहे ते होईल असं म्हटलं होतं. त्यामुळे या युतीच्या चर्चांना अधिक जोर आला. त्यानंतर दोन्ही पक्षाच्या काही नेत्यांच्या कार्यक्रमांमध्ये भेटीगाठीही झाल्या. मात्र अजून युतीचा निर्णय अंतिम झालेला नाही.

Follow Us
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप,
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप, अखेर मुख्यमंत्र्यांनी...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण... अखेर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनचे टोचले कान, काय घडलं?
पंतप्रधानांच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ!
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ; नेमकं काय म्हणाले?
सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; काय घडलं?
ShivSena | सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; नेमकं काय घडलं?
शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
Sanjay Raut | शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? कपिल सिब्बलांच्या युक्तिवादानंतर संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!
Shivsena Case Hearing | विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!; कपिल सिब्बलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे गटाकडून सर्वात मोठी प्रतिक्रिया
2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी?
मोठी बातमी! 2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी? कपिल सिब्बलांचा कोर्टात मोठा युक्तिवाद
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर, चार मुद्यामध्येच... कोर्टात नेमकं काय घडलं?
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! खासगी अकॅडमी चालकाला अटक
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! सोलापुरातून खासगी अकॅडमी चालकाला अटक