नाणार विरोधात दलाली करणाऱ्यांना चपलेनी झोडा : विनायक राऊत

नाणारला समर्थन करणाऱ्या शिवसेना जिल्हा परिषद सदस्या मंदा शिवलकर यांची जाहीर सभेतून हकालपट्टी करण्यात आल्याचेही राऊत (Vinyak Raut on Nanar refinery) म्हणाले.

नाणार विरोधात दलाली करणाऱ्यांना चपलेनी झोडा : विनायक राऊत

रत्नागिरी : नाणार रिफायनरीच्या मुद्द्यावरुन कोकणात रणकंदन सुरु (Vinyak Raut on Nanar refinery) आहे. शिवसेनेनं कात्रादेवीत शक्तीप्रदर्शन करत जाहीर सभेतून नाणार विरोधी भूमिका घेतली. नाणार विषय संपल्याचं जाहीर करत शिवसेनेकडून नाणारचे समर्थन करणाऱ्यांना शेवटचं अल्टिमेंटम दिलं आहे. “नाणार विरोधात दलाली करणाऱ्यांना चपलेनी झोडा” असं आव्हान शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी जाहीर सभेतून दिलं. तसेच नाणारला समर्थन करणाऱ्या शिवसेना जिल्हा परिषद सदस्या मंदा शिवलकर यांची जाहीर सभेतून हकालपट्टी करण्यात आल्याचेही राऊत म्हणाले.

“विनायक राऊत यांच्या या धमकीला घाबरणार नाही. रिफायनरी समर्थनाच्या सभेला जाणार,” असा चंग रिफायनरीला समर्थन देणाऱ्या शिवसैनिकांनी बांधला आहे.

नाणार रिफायनरीच्या मुद्यावरुन कोकणात घमासान पहायला मिळत आहे. नाणार रिफानरीच्या विरोधात शिवसेनेनी जाहीर सभा घेतली. कात्रीदेवीच्या मैदानावर जोरदार शक्ती प्रदर्शन करत शिवसेनेनी नाणार प्रकल्पाच्या विरोधात पुन्हा एकदा हाक दिली. नाणार विषय संपल्याचं शिवसेनेनी जाहीर करत नाणारच्या विरोधात पुन्हा राळ पेटवली. नाणार रिफायनरी वरून समर्थन करणाऱ्या शिवसेनेच्याच मंदा शिवलकर या जिल्हा परिषद सदस्याची पक्षातून थेट हकालपट्टी करण्यात आली. शिवसेना सचिव विनायक राऊत यांनी जाहीर सभेतून ही घोषणा (Vinyak Raut on Nanar refinery) केली.

तर नाणार रिफायनरीला समर्थन करणाऱ्या शिवसैनिकांवर कारवाईचा इशारा खासदार विनायक राऊत यांनी दिला. रिफायनरीला समर्थन करणाऱ्या शिवसैनिकांना एक संधी दिली जाते. उद्या होणाऱ्या रिफायनरी समर्थक मेळाव्याला कोणीही शिवसैनिक गेल्यास त्यांच्यावर कडक कारवाई होईल असेही विनायक राऊत म्हणाले.

जाहीर भाषणातून विनायक राऊत यांनी नाणारला विरोध करणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना नाणारला समर्थन करणाऱ्या दलालांना चप्पलेनी झोडा असं वक्तव्य केलं. त्यामुळे नवीन वादालाही तोंड फुटलं आहे. तर रिफायनरीला समर्थन देणाऱ्या दलालांची गृहखात्यामार्फत चौकशी केली जाईल, असं उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केलं. तर राज्य सरकारचा प्रतिनिधी म्हणून हा प्रकल्प होणार नाही, अशी ग्वाही उदय सामंत यांनी जाहीर भाषणातून (Vinyak Raut on Nanar refinery) दिली.

तर दुसरीकडे शिवसेना जिल्हा परिषद सदस्य मंदा शिवलकर यांनी आपण या कारवाईला घाबरत नाही अशी प्रतिक्रिया मंदा शिवलकर यांनी दिली. तसेच ही कारवाई चुकीची आहे. त्यामुळे आपण राजीनामा देणार नाही. उलट आपण बाळासाहेबांची सच्ची शिवसैनिक असल्यााचं खणखणीत उत्तर मंदा शिवलकर यांनी दिलं.

खासदार विनायक राऊत यांच्या वक्तव्याचा समाचारही समर्थकांनी घेतला आहे. एका खासदाराला अशी भाषा शोभत नसल्याचं अनेकांनी म्हटलं आहे. कारवाई झाली तरी चालेल आपण उद्याच्या रिफायनरीच्या समर्थनाच्या सभेला जाणार अशी भूमिका रिफायनरीला समर्थन करणाऱ्या शिवसैनिकांनी घेतली (Vinyak Raut on Nanar refinery)आहे.

विनायक राऊत यांच्या वक्तव्यावर भाजपकडून टीका करण्यात आली. भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी रिफायनरीला समर्थन करणाऱ्या राष्ट्रवादीचं काय? असा सवाल प्रसाद लाड यांनी उपस्थित केला आहे.

नाणारच्या मुद्यावरून कोकणात राजकीय शिमगा रंगला आहे. नाणार रिफायनरी विरोधातील सभेतून नाणारचा मुद्दा शिवसेनेनी गरम केली. पण आता या नाणारच्या मुद्यात रिफायनरी समर्थनाची उद्याच्या सभेत काय घडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार (Vinyak Raut on Nanar refinery) आहे.

Published On - 4:46 pm, Sun, 1 March 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI