AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra News : ड्रग्ज माफियांच्या सर्वात मोठा मित्र मातोश्रीवर आहे!; कुणी केला खळबळजनक आरोप?

Nitesh Rane on Uddhav Thackeray Aditya Thackeray : 'या' प्रकरणी आदित्य ठाकरेचा राजीनामा का घेतला नाही?; भाजप नेत्याचा सवाल. ड्रग्ज माफियांच्या सर्वात मोठा मित्र मातोश्रीवर आहे!; कुणी केला खळबळजनक आरोप? काय केलाय या नेत्याने आरोप? संजय राऊतांवर काय निशाणा साधला? पाहा...

Maharashtra News : ड्रग्ज माफियांच्या सर्वात मोठा मित्र मातोश्रीवर आहे!; कुणी केला खळबळजनक आरोप?
| Updated on: Oct 19, 2023 | 1:06 PM
Share

महेश सावंत, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, सिंधुदुर्ग | 19 ऑक्टोबर 2023 : महाराष्ट्रात सध्या मोठं ड्रग्ज रॅकेट समोर आलं आहे. ड्रग्जमाफिया ललित पाटील याला अटक झाली आहे. यावरून भाजप नेत्याने थेट ‘मातोश्री’वर आरोप केलेत. चोर की दाढी में तिनका म्हणतात तसं आहे… सुशांत सिंहची आत्महत्या होती तर कोर्टात जाण्याची काय गरज होती? लवकरच योग्य माणसाला शिक्षा मिळणार आहे. ललित पाटील महायुतीचा माणूस होता असं म्हणायचे. आता तो मोहरा कसा झाला? जेव्हा ललित पाटील जेव्हा तोंड उघडेल तेव्हा ठाकरे गटाचे नेते जेलमध्ये असतील. ठाकरे गट उद्या नाशिकमध्ये मोर्चा काढणार आहे. नाशिकमध्ये मोर्चा काढण्यापेक्षा एक मोर्चा मातोश्रीवर मोर्चा काढावा. कारण ड्रॅग माफियांच्या सर्वात मोठा मित्र मातोश्रीवर आहे, असा गंभीर आरोप भाजप आमदार नितेश राणे यांनी केला आहे.

सुशांतसिंह मर्डर प्रकरणात आदित्य ठाकरेचा राजीनामा का घेतला नाही? आमच्या मंत्र्यांचा राजीनामा मागण्याचा अधिकार ठाकरे गटाच्या नेत्यांना नाही. आर्थर रोड जेलची खोली साफ करण्याचे काम सुरु आहे. लवकरच संजय राऊतसाहेब तिकडे जातील. फडणवीस साहेबांचं डोकं ठिकाणावर आहे, असं राऊत म्हणत आहेत. म्हणूनच तुझ्या मालकाची झोप उडाली आहे. मातोश्रीवरचा वाईनचा साठा संपला आहे, असं नितेश राणे म्हणाले आहेत.

तुझ्यात हिंमत असेल तर तू पत्राचाळमध्ये जाऊन दाखव. लोकांनी तुला चपलेने मारलं नाहीतर माझा नाव बदलेन. 140 कोटी जनतेतून एकाने चुकून राहुल गांधीचं नाव घेतलं असेल तर त्याला त्याची चूक 2024 मध्ये समजेल. जो लाईटचं बटन ऑन करेल तो काँग्रेसचा नेता, कार्यकर्ता नाही. तुमचा नेताच म्हणाला आहे. कार्यकारिणीमध्ये निष्ठवाण नाहीत. भांडी डबे उचलणारे बूट उचलणारे ठाकरेंच्या कार्यकारिणीमध्ये आहेत. शरद पवार यांनी म्हाडाची लोकसभा निवडणूक लढवावी, असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

देशाचे पंतप्रधान मोदींजींनी काल इजराईलच्या भूमिकेचं समर्थन केलं. त्यावर शरद पवारांनी टीका केली आहे. 93 च्या दंगलीच्या काळात दहशदवादी काय करु शकतात हे माहीत असताना फक्त मतांसाठी राजकारण करतात. हमासचा निषेध करताना आम्ही उद्धव ठाकरे, शरद पवारांना ऐकलं नाही. ते अप्रत्यक्ष पद्धतीने पाठिंबा देत आहेत. उद्या ओवेसींच्या रॅलीत हे सहभागी होतील. मतांच्या राजकारणासाठी संजय राऊत मोदींवर टीका करत आहे. त्याची लायकी नाही, असा घणाघातही नितेश राणे यांनी केला आहे.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.