जामिनावरील गायक दलेर मेहंदीचा भाजपमध्ये प्रवेश

नवी दिल्ली : पंजाबी गायक दलेर मेहंदी (Daler Mehndi) यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. दिल्ली भाजप अध्यक्ष मनोज तिवारी आणि केंद्रीय मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांच्या उपस्थितीत दलेर मेहंदी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्याआधी पंजाबी गायक हंसराज हंसनेही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांना भाजपने उत्तर पश्चिम दिल्लीतून उमेदवारी दिली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये सेलिब्रिटींची आवक …

जामिनावरील गायक दलेर मेहंदीचा भाजपमध्ये प्रवेश

नवी दिल्ली : पंजाबी गायक दलेर मेहंदी (Daler Mehndi) यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. दिल्ली भाजप अध्यक्ष मनोज तिवारी आणि केंद्रीय मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांच्या उपस्थितीत दलेर मेहंदी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्याआधी पंजाबी गायक हंसराज हंसनेही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांना भाजपने उत्तर पश्चिम दिल्लीतून उमेदवारी दिली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये सेलिब्रिटींची आवक वाढल्याचं या निमित्ताने दिसून येत आहे. कारण दलेर मेहंदी, हंसराज हंस, अभिनेता सनी देओल, क्रिकेटर गौतम गंभीर यासारखे सेलिब्रिटींनी भाजपचं कमळ हाती घेतलं आहे.

कोण आहे दलेर मेहंदी?

दलेर मेहंदी हे पंजाबी गायक आहेत. त्यांचा जन्म बिहारच्या पाटणा इथं 18 ऑगस्ट 1967 रोजी झाला.

दलेर मेहंदी यांनी वयाच्या पाचव्या वर्षापासूनच गायनाला सुरुवात केली.

1995 मध्ये दलेर मेहंदी यांनी गाण्याचा पहिला अल्बम रेकॉर्ड केला. ‘बोलो ता रा रा रा’ या अल्बमला लोकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलं.

1998 मध्ये दलेर मेहंदींचा आणखी एक अल्बम आला. ‘तुनक तुनक तून’ हा अल्बमही प्रचंड गाजला.

मानव तस्करीप्रकरणी दोन वर्षांची शिक्षा

दलेर मेहंदी आणि त्यांचा भाऊ शमशेर सिंह यांना मानव तस्करी (कबुरबाजी) प्रकरणात दोन वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. अवैधरित्या लोकांना परदेशात पाठवल्याप्रकरणी दलेर मेहंदी दोषी ठरला. त्याला अटक करण्यात आली होती. सध्या दलेर मेहंदी जामीनावर बाहेर आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *