AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SMC Election 2022 Ward No 22 | राष्ट्रवादीच्या महत्वकांक्षेला धुमारे, महापौर पदासाठी फिल्डिंग, भाजपला करणार का चारीमुंड्या चीत?

SMC Election 2022 Ward No 22 | राष्ट्रवादीच्या महत्वकांक्षेला सोलापूर जिल्ह्यातच नव्हे तर शहरातही धुमारे फुटले आहे. काँग्रेसने सोलापूर शहर बघावे आणि राष्ट्रवादीने ग्रामीण भाग बघावा असा अलिखीत नियम होता. पण यंदा हा नियम तोटू शकतो असे दिसते.

SMC Election 2022 Ward No 22 | राष्ट्रवादीच्या महत्वकांक्षेला धुमारे, महापौर पदासाठी फिल्डिंग, भाजपला करणार का चारीमुंड्या चीत?
एमआयएमची राष्ट्रवादीला टक्कर Image Credit source: TV9marathi
| Updated on: Aug 06, 2022 | 5:57 PM
Share

SMC Election 2022 Ward No 22 | महाराष्ट्राच्या वस्त्रीनगरीत (Textile Park) पुन्हा एकदा निवडणुकीचा धुराळा उडणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या ओबीसीबाबतच्या निकालानंतर आता या निवडणुकीला रंगत चढणार आहे. दक्षिण महाराष्ट्रातील (South Maharashtra) या शहराची खासा अशी ओळख आहे. वस्त्रनगरीसह विडी उद्योगाने येथेच उभारी घेतली होती. हातमागावरची अनेक वस्त्र कधीकाळी महाराष्ट्रासह जगभरात विक्री होत होती. बिडी उद्योगाने ही आता मान टाकली आहे. घोंगड्या, सोलापूर चादरी, सोलापूरी पंचे यांची आजही राज्यच नाही तर राज्याबाहेर चलती आहे. राजकारणात सुशीलकुमार शिंदे यांच्या रुपाने सोलापूरकडे राज्याचे नेतृत्व चालून आले होते. कॉम्रेड नरसय्या आडम यांच्या रुपाने मार्क्सवाद्यांचा हा कधीकाळी बालेकिल्ला राहिला. कामगारांचे शहर असल्याने कामगारांनी समाजवादापेक्षा मार्क्सवाद जवळ केला आणि मास्तरांनी संपूर्ण भारतात एक आदर्श घालून दिला. सोलापूरच्या राजकारणात देशमुख गट ही सक्रीय आहे. पश्चिम महाराष्ट्रात असून ही अनेक बाबतीत जिल्हा मागास आहे. सांस्कृतिक आणि कामगार चळवळीचे केंद्र असलेले सोलापूर भूवैकुंठ ही आहे. महाराष्ट्राचं अराध्य दैवत पांडुरंग, विठ्ठलाने भक्तीपंथाची मुहुर्तमेढ सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर (Pandharpur) येथेच रोवली. वारकऱ्यांच्या भागवतधर्माने वर्ण, जातीच्या भिंती गाडून टाकल्या. वारकऱ्यांनी समतेची पताका खाद्यांवर घेतली. आता तिथेच लोकशाहीचा उत्सव होत आहे.

सोलापूरच्या राजकारणात काँग्रेसची घट्ट पकड राहिली. तसे कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर निढळ ध्रुव तारा राहिले. त्यांच्या रुपाने माकपने राज्यातील एक जागा कायम ठेवली होती. त्यानंतर देशाच्या राजकारणात 2014 पासून भाजपचे आक्रमक स्वरुप दिसून आले. त्याचा परिणाम सर्वाधिक नगर आणि सोलापूर जिल्ह्यात प्रकर्षाने दिसून आला. 2017 मध्ये महानगर पालिकेत अमरावतीसारखीच भाजपने दांडगाई दाखवली आणि सर्वात मोठा पक्ष म्हणून जागा जिंकल्या. यामध्ये माकप, राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना यांना आणखी एक धक्का बसला तो एमआयएमच्या दणक्यात झालेल्या प्रवेशाने. एमआयएमने नांदेड, औरंगाबाद, मालेगावनंतर सोलापूरमध्ये ठसठशीत एंट्री केली. महाविकास आघाडीत असताना भाजपासोबतच राष्ट्रवादीने आक्रमकपणे संघटन केल्याने यावेळी भाजपासमोर राष्ट्रवादीचे तगडे आव्हान राहणार आहे. 2017 मधील महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 22 मध्ये तीन जागांवर राष्ट्रवादीने तर एका जागेवर एमआयएमने सत्ता काबीज केली होती.

पालिकेचा सोनेरी इतिहास

1 ऑगस्ट 1852 रोजी सोलापूर नगरपालिकेची स्थापना झाली होती. पुढे 1 मे 1964 मध्ये सोलापूर नगरपालिकेचे महापालिकेत रूपांतर झाले. शेवटचे नगराध्यक्ष पारसमल जोशीच पहिले महापौर झाले. जवळपास 57 वर्षांच्या इतिहासात सोलापूर महानगरपालिकेचे महापौर म्हणून 37 जणांना मान दिला. शेवटच्या महापौर या भाजपच्या श्रीकांचना यन्नम होत्या. 8 मार्च 2022 रोजी महापालिकेची मुदत संपली.

सोलापूर महापालिका निवडणूक 2017 मध्ये विजयी उमेदवार

22 अ राष्ट्रवादीचे नागेश गायकवाड 22 ब राष्ट्रवादीचे किसान जाधव 22 क राष्ट्रवादीचे सुवर्ण जाधव 22 ड एमआयएमच्या पूनम बनसोडे

सोलापूर महानगर पालिकेतील वॉर्डनिहाय लोकसंख्या

सोलापूर महानगर पालिकेतंर्गत एकूण लोकसंख्या 2011 च्या जणगणनेनुसार, 9 लाख 51 हजार 558 इतकी आहे. त्यात एक लाख 38 हजार 78 इतके अनुसूचित जाती आणि 17,982 अनुसूचित जमातीची लोकसंख्या आहे. या लोकसंख्येत आता वाढ झाली आहे. प्रभाग क्रमांक 22 मध्ये एकूण 24,569 लोकसंख्या आहे. त्यात 5,245 अनुसूचित जाती आणि 521 अनुसूचित जमातीची लोकसंख्या आहे.

सोलापूर महानगर पालिकेतील वॉर्ड संख्या

सोलापूर महानगर पालिकेत पूर्वी 26 प्रभाग होते. आता 38 आहेत. आता 37 प्रभागात तीन वॉर्ड आहेत. तर एकाच म्हणजे 38 क्रमांकाच्या प्रभागात दोन वॉर्ड आहेत. महापालिकेत एकूण 113 जागांसाठी मतदान होणार आहे.

वॉर्डनिहाय आरक्षण

सोलापूर महानगर पालिकेतील वॉर्ड क्रमांक 22 मधील आरक्षण

22 अ अनुसूचित जाती 22 ब सर्वसाधारण महिला 22 क सर्वसाधारण

सोलापूर महानगर पालिकेतील वॉर्ड क्रमांक 22 परिसर

सेटलमेंट फ्री कॉलनीचा भाग, लिमयेवाडी, भैरु वस्ती भाग, भूषण नगर, गरिबी हटाव झोपडपट्टी क्रमांक 2, महात्मा गांधी प्राणी संग्रहालय. रेवणसिद्धेश्वर मंदिर व परिसर

कालावधी आरक्षण महापौर

2009-12 सर्वसाधारण आरिफ शेख 2012-14 ओबीसी महिला अलका राठोड 2014-17 अनुसूचित जाती महिला प्रा. सुशीला आबुटे 2017-19 सर्वसाधारण महिला शोभा बनशेट्टी

पक्षउमेदवारविजयी
शिवसेना
भाजप
राष्ट्रवादी काँग्रेस
काँग्रेस
एमआयएम
अपक्ष
पक्षउमेदवारविजयी
शिवसेना
भाजप
राष्ट्रवादी काँग्रेस
काँग्रेस
एमआयएम
अपक्ष
पक्षउमेदवारविजयी
शिवसेना
भाजप
राष्ट्रवादी काँग्रेस
काँग्रेस
एमआयएम
अपक्ष
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.