उज्ज्वल निकम शिवसेनेत प्रवेश करणार? राऊतांनंतर एकनाथ शिंदेंसोबत बंद दाराआड चर्चा

Advocate Ujjwal Nikam | विशेष म्हणजे गेल्या महिन्यात जळगाव दौऱ्यावर असताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही उज्वल निकम यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता पुन्हा एकनाथ शिंदे अ‍ॅ. उज्वल निकम यांना भेटल्याने शिवसेनेकडून जोरदार प्रयत्न सुरु असल्याचे स्पष्ट झाले आहे.

उज्ज्वल निकम शिवसेनेत प्रवेश करणार? राऊतांनंतर एकनाथ शिंदेंसोबत बंद दाराआड चर्चा
उज्वल निकम आणि एकनाथ शिंदे

मुंबई: राज्याचे विशेष सरकारी वकील अ‍ॅ. उज्ज्वल निकम यांनी शिवसेनेत प्रवेश करावा, यासाठी जोरदार प्रयत्न सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. जळगाव दौऱ्यावर असलेले नगरविकासमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी शनिवारी अ‍ॅ.उज्ज्वल निकम (Advocate Ujjwal Nikam) यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. अ‍ॅ. उज्ज्वल निकम आणि एकनाथ शिंदे यांच्यात बंद दाराआड बराचवेळ चर्चाही सुरु होती. या चर्चेचा नेमका तपशील अद्याप समोर आलेला नाही. मात्र, त्यामुळे उज्ज्वल निकम शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात जोर धरला आहे. (Speculations about Advocate Ujjwal Nikam may join Shiv Sena)

विशेष म्हणजे गेल्या महिन्यात जळगाव दौऱ्यावर असताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही उज्ज्वल निकम यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता पुन्हा एकनाथ शिंदे अ‍ॅ. उज्वल निकम यांना भेटल्याने शिवसेनेकडून जोरदार प्रयत्न सुरु असल्याचे स्पष्ट झाले आहे.
यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही अ‍ॅ. उज्ज्वल निकम यांना राजकारणात येण्याची ऑफर दिली होती. राष्ट्रवादी काँग्रेसकडून अ‍ॅ. उज्वल निकम यांना राज्यसभेवर पाठवण्याचा मानस होता. मात्र, अ‍ॅ. उज्ज्वल निकम यांनी हा प्रस्ताव दोनवेळा नाकारला होता. आतादेखील उज्वल निकम यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यास त्यांना पक्षातर्फे राज्यसभेवर पाठवले जाऊ शकते. तसेच चोपडा विधानसभा मतदारसंघाचे आरक्षण उठल्यास तिकडून निवडणूक लढवण्याचा पर्यायही उपलब्ध होऊ शकतो, अशी सूत्रांची माहिती आहे.

उज्ज्वल निकम काय म्हणाले?

मी अद्याप राजकारणात येण्याचा विचार केलेला नाही. एकनाथ शिंदे यांच्यासोबत माझी बंद दाराआड चर्चा झाली. मात्र, त्याचा तपशील आत्ताच सांगता येणार नाही. यापूर्वी मी शरद पवार यांचा प्रस्तावही नाकारला होता. खासदार संजय राऊत आणि माझी गेल्या महिन्यातील भेट ही केवळ सदिच्छा भेट होती. माझे सर्वच पक्षातील नेत्यांशी चांगले संबंध असल्याने ते घरी येतात, असे उज्ज्वल निकम यांनी म्हटले.

संबंधित बातम्या:

…तर कंगनाला त्वरित अटक करण्याचे मुंबई पोलिसांना अधिकार : उज्ज्वल निकम

व्हॉट्सअ‍ॅप चॅट उत्तम पुरावा असू शकत नाही : उज्ज्वल निकम

दोन राज्यांच्या पोलिसांची विधाने भारत-पाक युद्धासारखी, सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणी उज्ज्वल निकम यांची उद्विग्नता

(Speculations about Advocate Ujjwal Nikam may join Shiv Sena)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI