AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सरकार स्थापन करताना आमच्या फक्त आग्रही भूमिका, चर्चेला वादविवादाचं स्वरुप नव्हतं; राऊतांच्या गौप्यस्फोटावर काँग्रेसचं स्पष्टीकरण

त्यावेळी आम्ही काही गोष्टी आग्रहाने मागत होते. या चर्चेला वाद-विवादाचं स्वरुप नाही तर आग्रही स्वरुप असायचं, असं स्पष्टीकरण बाळासाहेब थोरात यांनी दिलं आहे. (Balasaheb Thorat Mahavikas Aghadi)

सरकार स्थापन करताना आमच्या फक्त आग्रही भूमिका, चर्चेला वादविवादाचं स्वरुप नव्हतं; राऊतांच्या गौप्यस्फोटावर काँग्रेसचं स्पष्टीकरण
| Updated on: Nov 29, 2020 | 11:03 PM
Share

मुंबई : “सरकार स्थापन करण्यात येत होतं ते 36 दिवस ऐतिहासिक आहेत. यावेळी सरकार स्थापन करताना अनेक वेळा बैठका झाल्या. त्यावेळी काही गोष्टी आम्ही आग्रहाने मागत होते.  या चर्चेला वादविवादाचं स्वरुप नाही तर आग्रही स्वरुप असायचं,” असं स्पष्टीकरण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी दिलं. काँग्रेस नेते मल्लीकार्जून खर्गे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करताना शाब्दिक चकमक झाली होती, असा गौप्यस्फोट खासदार संजय राऊत यांनी केला. याविषीयी ते मुंबईत ”टीव्ही 9 मराठी’शी बोलत होते. (statement of Balasaheb Thorat on clash in Mahavikas Aghadi while forming government)

महाविकास आघाडी सरकारला स्थापन होऊन 28 नोव्हेंबरला एक वर्ष पूर्ण झालं. त्यानिमित्त शिवसेना खासदार आणि ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत (Sanjay Raut) यांनी महाविकासआघाडी सरकार स्थापनेच्या काळातील मोठे गौप्यस्फोट केले आहेत. ‘सामना’तील रोखठोक या सदरात राऊतांनी ‘मुंबईत नेहरू सेंटरमध्ये झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि तत्कालीन काँग्रेस प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांच्यात शाब्दिक चकमक झाली होती. विधानसभेचे अध्यक्षपद कुणाकडे? हा यातील शाब्दिक चकमकीचा मुद्दा होता, असा मोठा गौप्यस्फोट संजय राऊतांनी केला. त्यांच्या या गौप्यस्फोटानंतर राज्याच्या राजकीय पटलावर अनेक चर्चा रंगल्या आहेत. यावर बोलताना आमच्यात वादविवाद नाही झाला, तर आमच्या मागण्या आग्रही स्वरुपाच्या होत्या, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.

“सरकार स्थापन करतानाचे ते 36 दिवस ऐतिहासिक आहेत. या दिवसांवर चार पुस्तकं येतात. याचा अर्थ या दिवसांचे महत्त्व सर्वांनी ओळखून घ्यायला पाहिजे. तीन पक्षांच्या विचारधारा वेगवेगळ्या आहेत. वेगळी विचारधार असणारे पक्ष एकत्र येतात त्यावेळी संवाद होणार हे साहजिक आहे. हे सरकार स्थापन करताना अनेक वेळा बैठका झाल्या. या बैठकांमध्ये आम्ही काही गोष्टी आग्रहाने मागत होतो. तर काही गोष्टींसाठी राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा आग्रह होता. आमच्यातील चर्चा वादविवाद स्वरूपाच्या नसायच्या. चर्चांमध्ये आमच्या मागण्यांना आग्रही स्वरूप असायचं. चर्चेला कुणी चकमक का म्हटलं हे मला माहीत नाही.” असं बालासाहेब थोरात म्हणाले. तसेच, या आधीच सरकार स्थापनेवर चार पुस्तकं आलेली आहेत. त्यामुळे आणखी काही नवीन बोलून नवा इतिहास तयार करायची मला गरज नाही, असे म्हणत थोरात यांनी त्यांची भूमिका मांडली.

संजय राऊत यांच्या रोखठोकमध्ये नेमकं काय?

मुंबईत नेहरू सेंटरमध्ये झालेल्या महाविकासआघाडीच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि तत्कालीन काँग्रेस प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांच्यात शाब्दिक चकमक झाली होती. विधानसभेचे अध्यक्ष पद कुणाकडे? हा यातील शाब्दिक चकमकीचा मुद्दा होता, असा मोठा गौप्यस्फोट संजय राऊतांनी केला आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात इतका रंगतदार आणि अखेरच्या चेंडूपर्यंत खेळला जाणारा सामना कधीच झाला नव्हता. नेहरू सेंटरमधील ठिणगी असे एखादे सरकार येईल असा विश्वास जसा काँग्रेसला नव्हता तसा शिवसेनेच्या नवनियुक्त आमदारांनाही नव्हता. शरद पवार आणि माझ्यात 35 दिवस सुरू असलेल्या गाठीभेटी हा निव्वळ टाईमपास आहे असा अपप्रचार सुरू झाला. 17 नोव्हेंबरला सकाळी पत्रकारांनी मला विचारले, ‘‘तुमच्याकडे किती आमदारांचे पाठबळ आहे?’’ तेव्हा ‘‘आमचा आकडा 170 आहे’’ असे मी सांगितले. त्या 170 आकडय़ाची खिल्ली उडवण्यात आली. तोपर्यंत सरकार स्थापनेसंदर्भात काँगेसचा स्पष्ट होकार आला नव्हता, पण अहमद पटेलांसारखे नेते सकारात्मक बोलत होते, असेही राऊत म्हणाले.

संबंधित बातम्या :

‘देवेंद्र फडणवीसांच्या हातात सत्ता द्या’; उदयनराजेंनी मराठा समाजाच्या मनातील भावना बोलून दाखवली: दरेकर

शरद पवार-मल्लिकार्जुन खरगेंमध्ये वाद; संजय राऊतांच्या ‘त्या’ गौप्यस्फोटावर रोहित पवार म्हणतात…

संजय राऊत यांच्या नातेवाईकांनाही ईडीच्या नोटिसा, नितेश राणेंचा खळबळजनक दावा

(statement of Balasaheb Thorat on clash in Mahavikas Aghadi while forming government)

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

पेपरफुटी हा चौकशीचा विषय, सरकार चर्चेसाठी तयार – जे पी नड्डा.

पेपरफुटी हा चौकशीचा विषय, सरकार चर्चेसाठी तयार – जे पी नड्डा

Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!.

Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!

इंग्लंड दौऱ्यात छोट्या भावाकडून पराभव, झिम्बाब्वेत मोठ्या भावाची भीती! श्रेयसचं टेन्शन वाढलं.

इंग्लंड दौऱ्यात छोट्या भावाकडून पराभव, झिम्बाब्वेत मोठ्या भावाची भीती! श्रेयसचं टेन्शन वाढलं

मोठी बातमी! …तर सोनम वागंचूक आजच उपोषण मागे घेणार, मोठी घोषणा, सरकारसमोर दोन अटी, रुग्णालयातून पहिला व्हिडीओ.

मोठी बातमी! …तर सोनम वागंचूक आजच उपोषण मागे घेणार, मोठी घोषणा, सरकारसमोर दोन अटी, रुग्णालयातून पहिला व्हिडीओ

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा.

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा