पश्चिम बंगालनंतर महाराष्ट्राचा नंबर, सरकार तीन महिन्यात पडेल, सुधीर मुनगंटीवार यांचा दावा

पश्चिम बंगालनंतर महाराष्ट्राचा नंबर आहे," असेही मुनगंटीवार यांनी सांगितले. (Sudhir Mungantiwar On Mahavikasaghdi Government) 

पश्चिम बंगालनंतर महाराष्ट्राचा नंबर, सरकार तीन महिन्यात पडेल, सुधीर मुनगंटीवार यांचा दावा
Sudhir Mungantiwar

मुंबई : “राज्यातील महाविकासआघाडीचे सरकार तीन महिन्यात पडेल. तीन महिन्यापेक्षा जास्त वेळ हे सरकार टिकणं आणि टिकवणं ही कोणत्याही राजकीय पक्षाची घोडचूक आहे, असा दावा भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. कोशिश करने वालों की हार नहीं होती, लहरों से डर कर नौका पार नहीं होती,” असेही मुनगंटीवार म्हणाले. (Sudhir Mungantiwar On Mahavikasaghdi Government)

“राज्यात शुभकार्य कधी ना कधी व्हायचंच आहे. तीन महिन्यापेक्षा जास्त वेळ हे सरकार टिकणं आणि टिकवणं ही कोणत्याही राजकीय पक्षाची घोडचूक आहे. जेव्हा अशापद्धतीने सूडाचे राजकारण वाढतं, तेव्हा सत्तेचा प्रलय येतो. पश्चिम बंगालनंतर महाराष्ट्राचा नंबर आहे,” असेही मुनगंटीवार यांनी सांगितले.

“फक्त सुडाचे राजकारण सुरु”

“शुभकार्य कधी ना कधी व्हायचंच आहे. जनहित विरोधी सरकार, अधिवेशन घ्यायचं नाही. जर तुम्ही बघितलं तर मागच्या वर्षभरात 116 तास 39 मिनिटे अधिवेशन झालं. यावेळी 47 तास अधिवेशन झालं. शेकडो प्रश्न कोरोना काळात तयार झाले. असाधारण परिस्थिती होते. अशापरिस्थितीही फक्त सुडाचे राजकारण सुरु आहे,” असेही मुनगंटीवारांनी सांगितले. (Sudhir Mungantiwar On Mahavikasaghdi Government)

“अधिवेशनात कोणत्याही मुद्द्यावर चर्चा नाही”

” प्रश्न उपस्थित केला की मोहन डेलकर आत्महत्या सांगायचे. वीजबिलावर चर्चा नाही, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा नाही. भाडे थकीत आहे, सरकारी इमारतीवर, गोरगरीबांसाठी काहीही पॅकेज नाही. आत्मनिर्भर, शक्तीमान, वैभवशाली महाराष्ट्र उभा करण्यासाठी अनेक उद्योगांना प्रोत्साहन देण्याची भूमिका नाही. असं सरकार टिकवणं तेही राजकीय दृष्टीने सर्वात मोठी घोडचूक होईल,” असा दावाही मुनगंटीवारांनी केली.

संजय राऊतांकडून टीका 

राज्यातील महाविकासआघाडीचा महासिनेमा 2024 पर्यंत नक्की चालेल. भाजपने पुढील साडेतीन वर्षे विरोधी पक्षाची भूमिका आतासारखीच उत्तमपणे पार पाडत राहावी. कोणत्याही सिनेमात नायकासोबत तितकाच खंदा खलनायकही लागतो. त्यांच्यामुळेही सिनेमा जोरात चालतो. महाविकासआघाडीच्या सिनेमात देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार त्यांची पात्रं उत्तमपणे वठवत आहेत, असे संजय राऊत यांनी म्हटले.

महाराष्ट्रातील सरकारचं 2024 नंतर बघू. तोपर्यंत भाजपने विरोधी पक्षाची भूमिका भक्कमपणे पार पाडावी. सरकार एवढ्या दिवसांत किंवा महिन्यात पडेल, ही धमकी देणं बंद करावं. नुकत्याच पार पडलेल्या अधिवेशनात भाजपने विरोधी पक्ष म्हणून उत्तम काम केले. खरं खोटं नंतर बघू, पण पुढची साडेतीन वर्ष विरोधी पक्ष म्हणून असंच काम करत राहा, असा टोला संजय राऊत यांनी लगावला. (Sudhir Mungantiwar On Mahavikasaghdi Government)

संबंधित बातम्या : 

खलनायकही ताकदीचा असावा, भाजपने विरोधी पक्षाची भूमिका उत्तम वठवली: संजय राऊत

महावितरण ही जनतेची कंपनी, आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी थकबाकी भरा : उर्जामंत्री नितीन राऊत

सामनात अग्रलेख आला याचा अर्थ घाव वर्मी बसला, देवेंद्र फडणवीसांचा टोला

Published On - 10:48 am, Thu, 11 March 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI