Maharashtra politics : खुर्ची तुटेपर्यंत मुख्यमंत्री खुर्ची अडवून बसले; आम्हाला जनतेची काळजी, मुनगंटीवारांचा ठाकरेंवर निशाणा

भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार ( Sudhir Mungantiwar) यांनी उद्धव ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. भाडेकरू घर सोडून जाताना ज्याप्रकारे तोटी व नळी घेऊन जातो, त्याप्रमाणे पडणाऱ्या सरकारकडून मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेतले जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Maharashtra politics : खुर्ची तुटेपर्यंत मुख्यमंत्री खुर्ची अडवून बसले; आम्हाला जनतेची काळजी, मुनगंटीवारांचा ठाकरेंवर निशाणा
भाजप नेते सुधीर मुनगंटीवारImage Credit source: facebook
Follow us
| Updated on: Jun 29, 2022 | 4:18 PM

मुंबई : भाजप (BJP) नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. भाडेकरू घर सोडून जाताना ज्याप्रकारे तोटी व नळी घेऊन जातो, त्याप्रमाणे पडणाऱ्या सरकारकडून मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेतले जात असल्याचे मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.  खुर्ची तुटेपर्यंत मुख्यमंत्री खुर्ची अडवून बसले आहेत. खुर्ची तोडण्यापेक्षा आम्हाला बारा कोटी जनतेच्या प्रश्नांची अधिक चिंता आहे. तुम्ही काय शोलेचे ठाकूर आहात का? ज्याला दोन हात नाहीत. बहुमत असेल तर दोन्ही हातांनी दाखवा असे आव्हान देखील यावेळी मुनगंटीवार यांनी केले आहे. सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सुधीर मुनगंटीवार यांनी  विधानमंडळ सचिव राजेंद्र भागवत आणि उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (Narhari Jirwal) यांची भेट घेतली त्यानंतर ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.

 लोकशाही पद्धतीने मतदानाचा हक्क बजावता यावा

राज्यपालांनी उद्या विशेष अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्यास सांगितले आहे. त्यामुळे आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर  सुधीर मुनगंटीवार यांनी विधानमंडळ सचिव राजेंद्र भागवत आणि उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मी आज विधानसभा उपाध्यक्ष आणि विधानमंडळ सचिव  राजेंद्र भागवत यांची भेट घेतली. त्यांनी आमच्या सूचनांवर कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. काही लोक धमक्या देत आहेत. अशांतता निर्माण करण्याची भाषा करत आहेत.अशा वातावरणात लोकशाही पद्धतीने मतदानाचा हक्क बजावता यावा, ही मागणी मी उपाध्यक्षांकडे केली आहे. आसन व्यवस्था बदलेली नाही. संविधानाने दिलेला अधिकार आहे. सद्सदविवेकबद्धीने मतदान करता यावे ही भाजपाची भूमिका असल्याचे त्यांनी म्हटले.

हे सुद्धा वाचा

उद्या बहुमत सिद्ध करण्याचे आव्हान

राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्याबाबत पत्र पाठवले आहे. उद्या विशेष अधिवेशनामध्ये बहुमत सिद्ध करावे असे सांगण्यात आले आहे. दरम्यान सध्याची परिस्थिती पहाता उद्धव ठाकरे सरकारकडे सरकार वाचू शकेल इतक्या आमदारांचे संख्याबळ नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या गोटात खळबळ उडाली आहे. याच पार्श्वभूमीवर आता महाविकास आघाडीच्या वतीने सुप्रीम कोर्टात धाव घेण्यात आली  आहे.  आज पाच वाजता या याचिकेवर सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतरच सर्व चित्र स्पष्ट होणार आहे.

महाराष्ट्र राज्य विधानसभासत्तेचं गणित
विधानसभेचे एकूण सदस्य288
दिवंगत सदस्य01
कारगृहात सदस्य02
सध्याची सदस्य संख्या285
एकनाथ शिंदे गटाकडे किती आमदार39
आता सभागृहाची सदस्य संख्या285
बहुमताचा आकडा143
भाजपचं संख्याबळभाजप (106)+शिंदे गट (39)+अपक्ष (27)=172
मविआचं संख्याबळशिवसेना (16)+ राष्ट्रवादी (51)+ काँग्रेस (44)= 111
शिंदे गट भाजपसोबत न गेल्यास भाजपकडे किती संख्याबळ?भाजप (106)+ अपक्ष (27) = 133
Non Stop LIVE Update
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.