Eknath Shinde : एकनाथ शिंदे हेच महाराष्ट्राचे ‘बाहुबली’; आता शिवसेनेच्या दक्षिण भारतीय विभागाचाही शिंदेंना पाठिंबा

आता शिवसेनेच्या (Shiv Sena) दक्षिण विभागाने देखील एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. शिंदे हेच महाराष्ट्राचे बाहुबली असल्याचे पोस्टर लावण्यात आले आहेत.

Eknath Shinde : एकनाथ शिंदे हेच महाराष्ट्राचे 'बाहुबली'; आता शिवसेनेच्या दक्षिण भारतीय विभागाचाही शिंदेंना पाठिंबा
गणेश थोरात

| Edited By: अजय देशपांडे

Jun 29, 2022 | 3:37 PM

ठाणे: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या समर्थकांमध्ये वाढच होताना दिसत आहे. एकनाथ शिंदे हे शिवसेनेमधून (shiv sena) बंडखोरी करत बाहेर पडल्यानंतर सुरुवातीला त्यांना 13 आमदारांनी (MLAS) पाठिंबा दिल्याची माहिती समोर येत होती. मात्र हा आकडा आता 40 वर पोहोचला आहे. शिवसेनेच्या 40 पेक्षा अधिक आमदारांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. आमदारांसोबतच कार्यकर्त्यांच्या समर्थनात देखील वाढ होत आहे. एकीकडे ठाण्यात एकनाथ शिंदे यांच्या समर्थनाथ जोरदार शक्तिप्रदर्शन सुरू असताना आता दुसरीकडे शिवसेनेच्या दक्षिण भारतीय विभागाने देखील शिंदेंना पाठिंबा दिला आहे. दक्षिण भारतीय विभागाच्या कार्यकर्त्यांकडून शिंदे यांना थेट बाहुबलीची पदवी देण्यात आली आहे. केवळ पदवीच देण्यात आली नाही तर तसे बॅनर देखील उभारण्यात आले आहेत. हे बॅनर शिंदे यांच्या निवासस्थानाबाहेरच लावण्यात आले आहेत.

शिंदे महाराष्ट्रातील बाहुबली

शिवसेनेच्या दक्षिण भारतीय विभागाने एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. शिंदे यांच्या समर्थनार्थ दक्षिण भारतीय विभागाकडून शिंदे यांच्या निवासस्थानाबाहेर बॅनर उभारण्यात आले आहेत. या बॅनरमध्ये एकनाथ शिंदे हेच महाराष्ट्राचे  बाहुबली असल्याचे म्हटले आहे. शिंदे यांचे बाहुबली स्वरुपात उभारण्यात आलेले हे बॅनर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत.  या बॅनरच्या माध्यमातून विजयी भवं असा संदेश देखील देण्यात आला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना दक्षिण भारतीयांचा देखील पाठिंबा  असल्याचे या निमित्ताने समोर आले आहे. दुसरीकडे राज्यभरात शिवसैनिक आणि एकनाथ शिंदे समर्थक आमने-सामने येत असल्याचे पहायाला मिळत आहेत. ठाण्यात शिंदे समर्थकांकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येत आहे. तर काही ठिकाणी संतप्त शिवसैनिकांकडून बंडखोर आमदारांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा

राज्यपालांकडून मुख्यमंत्र्यांना पत्र

महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढून घेत असल्याचे एकनाथ शिंदे गटाने जाहीर करताच मंगळवारी देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची भेट घेतली. त्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला असून, राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले आहे. राज्यपालांचा हा निर्णय अयोग्य असल्याचे सांगत आता त्याविरोधात महाविकास आघाडीच्या वतीने सुप्रीम कोर्टात धाव घेण्यात आली आहे. आज पाच वाजता या याचिकेवर सुनावणी होणार आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें