शिवसेनेने उद्याही प्रस्ताव दिला, तरी भाजप सरकार स्थापनेसाठी तयार : सुधीर मुनगंटीवार

शिवसेना आमचा नैसर्गिक मित्र आहे. शिवसेनेने उद्याही प्रस्ताव दिला, तर सरकार स्थापनेसाठी भाजपकडून अडचण नाही, असं विधान भाजप नेते आणि माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे (Sudhir Mungatiwar on Government formation).

शिवसेनेने उद्याही प्रस्ताव दिला, तरी भाजप सरकार स्थापनेसाठी तयार : सुधीर मुनगंटीवार
Follow us
| Updated on: Jan 29, 2020 | 10:59 PM

नांदेड : शिवसेना आमचा नैसर्गिक मित्र आहे. शिवसेनेने उद्याही प्रस्ताव दिला, तर सरकार स्थापनेसाठी भाजपकडून अडचण नाही, असं विधान भाजप नेते आणि माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे (Sudhir Mungatiwar on Government formation). सुधीर मुनगंटीवार यांनी नांदेडमध्ये बोलताना हे विधान केलं. यावेळी त्यांनी इतरही विषयांवर भाष्य केलं. शिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्याची तयारी दाखवल्यानंतर पुन्हा एकदा राजकीय चर्चेला सुरुवात झाली आहे. सत्तेमध्ये भाजप काहीही करण्यास तयार असल्याचीही टीका मुनगंटीवार यांच्या विधानानंतर होत आहे.

सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “शिवसेना आमचा नैसर्गिक मित्र आहे. आत्ताही शिवसेनेने प्रस्ताव दिला, तर सरकार स्थापनेसाठी भाजपकडून अडचण नाही. ‘देर आये दुरुस्त आये, सुबह का भुला श्याम को आया’ आम्ही असं समजू. मनसेला सोबत घ्यायची आज तरी आवश्यकता नाही. तसा प्रस्ताव देखील मनसेकडून आलेला नाही. पण समविचारी पक्षांना सोबत घेण्याची भाजपची भूमिका असल्याचंही मुनगंटीवार म्हणाले.

मुंबईच्या शक्तीशाली मातोश्रीचा शक्तीपात झाला आणि दिल्लीची मातोश्री शक्तिशाली झाली असं म्हणत सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेवर जहरी टीका केली. शिवसेनेकडून लिहून घेतल्याच्या अशोक चव्हाण यांच्या वक्त्यावर प्रतिक्रिया देत मुनगंटीवार म्हणाले, “शिवसेनेला काँग्रेसचा पाठींबा म्हणजे 21 व्या शतकातील आश्चर्य आहे. अशोक चव्हाण म्हणाल्याप्रमाणे फक्त भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी मुस्लिमांच्या सांगण्यावरुन ते सत्तेत गेले.”

“सरकारची परिस्थिती व्हेंटिलेटरवरच्या रुग्णासारखी”

या सरकारची परिस्थिती व्हेंटिलेटरवरच्या रुग्णासारखी आहे. सरकार किती दिवस चालेल हे सांगता येणार नाही असं वक्तव्य माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलं. भिन्न विचाराचे सरकार दीर्घकाळ टिकत नसल्याचा इतिहास आहे. हे तीन पक्ष रागापोटी एकत्र आले आहेत. तेव्हा काय होईल हे सांगता येणार नाही, असंही मुनगंटीवार म्हणाले.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.