त्या दिवशी जाणते राजे घरी पळून गेले, सुजात आंबेडकरांची शरद पवारांवर घणाघाती टीका

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांचे सुपुत्र सुजात आंबेडकर (Sujat Ambedkar on Sharad Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर घणाघाती टीका केली.

त्या दिवशी जाणते राजे घरी पळून गेले, सुजात आंबेडकरांची शरद पवारांवर घणाघाती टीका
Follow us
| Updated on: Sep 25, 2019 | 8:26 PM

औरंगाबाद :  वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांचे सुपुत्र सुजात आंबेडकर (Sujat Ambedkar on Sharad Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर घणाघाती टीका केली. वंचित आघाडीचा युवा संवाद मेळावा औरंगाबादमध्ये झाला, या मेळाव्यात सुजात आंबेडकर यांनी विविध मुद्द्याला स्पर्श केला.

शरद पवारांवर टीकास्त्र

सुजात आंबेडकर म्हणाले, “संसदेत गदारोळ सुरु आहे, UAPA कायदा आणला. अनेक दलितविरोधी कायदे आणले, त्यावेळी जाणते राजे गप्प का होते? उलट ज्या दिवशी हे कायदे संसदेत आले होते, त्या दिवशी हे जाणते राजे घरी पळून गेले होते. जाणत्या राजाला ईडीची नोटीस आली, मला वाटलं हे राज्यभर बंद पाळतील, पण यांनी फक्त बारामतीत बंद पळाला”

वाचा : UAPA Bill : राज्यसभेत मंजूर झालेल्या UAPA विधेयकाची इतकी धास्ती का? 

देशातील दुर्घटनांना मोदी जबाबदार

“देशातल्या सगळ्या दुर्घटनांना फक्त नरेंद्र मोदी कारणीभूत आहेत. ज्या राष्ट्रीय बँका बंद पडत आहेत त्याला नरेंद्र मोदी जबाबदार आहेत. या सरकारच्या कार्यकाळात इतकी कर्ज बुडवली गेली आहेत की लोकांना आता स्वतःचे पैसे फक्त महिन्याकाठी हजार रुपये देत आहेत. खुल्या दिवसातली ही लूटमार आहे”, असा हल्लाबोल सुजात आंबेडकर यांनी केला.

पाकिस्तानचा जीडीपी भारतापेक्षा जास्त

भारताचा जीडीपी फक्त पाच टक्क्यांवर आहे. आज बांगलादेश, पाकिस्तानचा जीडीपी भारतापेक्षा जास्त आहे. इतकं या सरकारने आपल्याला डुबवलं आहे, असं सुजात आंबेडकर म्हणाले.

संघाने काय त्याग केला?

स्वातंत्र्यापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपने देशासाठी केलेले त्याग सांगावा, मग देशाला त्याग शिकवा. देशात आलेल्या आर्थिक मंदिवरुन हे सरकार आपली दिशाभूल करत आहे, असं सुजातने नमूद केलं.

महाजनादेश यात्रा

महाजनादेश यात्रा निघाली, गाव गल्ली शहरात गेली. काश्मीर, पुलवामा हल्ल्यावर बोलले, पण इथले पाणी, रस्ते, आणि पुलांवर बोलत नाहीत. ज्या पाकिस्तानला हे लोक शिव्या घालतात, त्याच पाकिस्तानकडून आपल्याला कांदा विकत घ्यावा लागतो, इतकी वाईट वेळ या लोकांनी आपल्यावर आणली आहे. हे सरकार दौरे, यात्रा काढतात, पण इथल्या मूलभूत प्रश्नावर बोलत नाहीत. हे फक्त धार्मिक आणि भारताबाहेरचे मुद्दे काढत आहेत. महाराष्ट्राचे लोक त्रस्त आहेत, वैतागले आहेत, असं सुजात आंबेडकर म्हणाले.

लोकशाही धोक्यात

नरेंद्र मोदी यांनी आपली लोकशाही धोक्यात टाकली आहे. जो कोणी आपलं मत मांडत आहेत, त्यांना दाबलं जात आहे. गौरी लंकेश यांचा खून करण्यात आला. आरएसएस- भाजपने त्यांना मारून टाकलं. तेच कलबुर्गी, पानसरे आणि दाभोळकर यांच्यासोबत घडलं आहे, असं सुजात आंबेडकरांनी नमूद केलं.

भाजपला फक्त वंचित हरवेल

आपण काय खायचं, काय बोलायचे, काय कपडे घालायचे, कुणाला मत द्यायचं, हे सर्व हे लोक ठरवायला लागतील आणि मग आपण देशाचे नागरिक आहोत की नाही हे अमित शहा ठरवतील. पुन्हा आपण या देशात राहायचे की नाही हे मोहन भागवत ठरवतील. हे सरकार अनेक लोकांना ईडी सीबी च्या नोटीस लावत आहे  अशा परिस्थितीत भाजपाला फक्त एकच पक्ष हरवू शकतो तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी, असा विश्वास सुजात आंबेडकरने व्यक्त केला.

मोहन भागवतांना जेलमध्ये टाकू

त्यासाठीच बाळासाहेब सांगतात, की या RSS ला येणाऱ्या पैशांवर टॅक्स लावू आणि ते वापरत असलेल्या शस्त्रांची चौकशी करु. मोहन भागवत यांना मोक्का लावून जेलमध्ये टाकू, हे बाळासाहेब सांगत असतात, असं सुजात आंबेडकरांनी नमूद केलं.

पुरात ईव्हीएम ट्रान्सपोर्टसाठी वाहने

जेव्हा राज्यात पूर होता, तेव्हा भाजपचे लोक आपली वाहने पूरग्रस्तांना वाचवण्यासाठी न वापरता ईव्हीएम ट्रान्सपोर्ट करण्यासाठी वापरत होते, असा आरोप सुजातने केला.

या सरकारच्या काळात दलित आणि अल्पसंख्याक समाजावर अत्याचार वाढले आहेत. भाजपने विद्यार्थ्यांवर क्रूर हल्ला केला आहे. गुंडाची टोळी असलेल्या एबीव्हीपीने वेगवेगळ्या विद्यापीठात विद्यार्थ्यांवर हल्ले केले आहेत, असं सुजातने सांगितलं.

शिवसेनेवर हल्लाबोल

शिवसेना वाले म्हणतात अयोध्येत जाऊन मंदिर बनवू. अरे बाबा तुम्ही औरंगबादचा कचरा साफ केला नाही, तुम्ही काय घं XX मंदिर बांधणार? असा सवाल करत सुजात आंबेडकर यांनी  शिवसेनेवर घणाघाती टीका केली.

VIDEO :

संबंधित बातम्या 

UAPA Bill : राज्यसभेत मंजूर झालेल्या UAPA विधेयकाची इतकी धास्ती का?   

… म्हणून मी विधानसभा निवडणूक लढणार नाही: सुजात आंबेडकर   

आदित्य ठाकरे विरुद्ध सुजात आंबेडकर, वरळीतील व्हॉट्सअप ग्रुपवर एकच चर्चा! 

Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.