सुजय विखे-गिरीश महाजन भेट, राजकीय वर्तुळात खळबळ

मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील यांनी भाजपचे नेते आणि राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली. सुजय विखे पाटील हे दक्षिण अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे सुजय विखे आणि गिरीश महाजन यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. …

sujay vikhe patil, सुजय विखे-गिरीश महाजन भेट, राजकीय वर्तुळात खळबळ

मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील यांनी भाजपचे नेते आणि राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली. सुजय विखे पाटील हे दक्षिण अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे सुजय विखे आणि गिरीश महाजन यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

सुजय विखे पाटील हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र आहेत. दक्षिण अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून सुजय विखे लढण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाल्याने, सुजय विखे यांची मोठी गोची झाली आहे. कारण दक्षिण अहमदनगर लोकसभेची जागा आघाडीच्या परंपरेनुसार राष्ट्रवादीच्या वाट्याला येते आणि यावेळीही राष्ट्रवादी ही जागा सोडण्यास तयार नाही.

दक्षिण नगरच्या लोकसभा जागेसाठी राष्ट्रवादी ठाम आहे. त्यामुळे आघाडीत ज्या दोन-तीन जागांबाबत अद्याप तिढा आहे, त्यात दक्षिण नगरच्या जागेचा समावेश आहे. किंबहुना, याच जागेवरुन सर्वाधिक तिढा आहे. त्यात थेट विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्याच्या मुलानेच निवडणूक लढण्यासाठी इच्छा व्यक्त केल्याने काँग्रेसचीही मोठी गोची झाली आहे. मात्र, दुसरीकडे राष्ट्रवादीही जागा सोडण्यास तयार नाही.

त्यात आता सुजय विखे यांनी भाजपच्या नेत्यांच्या गाठीभेटी सुरु केल्याने, काँग्रेस-राष्ट्रवादीवर आपसूक दबाव वाढणार आहे. त्यामुळे भाजप नेते आणि राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबतच्या बैठकीत लोकसभा जागेसंदर्भात सुजय विखेंनी चर्चा केली असो वा नसो, आघाडीच्या जागावाटपावर या भेटीचा नक्कीच परिणाम होईल. शिवाय, या भेटीमुळे राजकीय वर्तुळातही चर्चांना उधाण आणलं आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *