तेजस ठाकरे राजकारणात येत पद घेणार का? जाणून घ्या युवासेनेचे वरुण सरदेसाई काय म्हणाले

शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी तेजस ठाकरे यांना खास शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या या शुभेच्छांमुळे तेजस ठाकरेही सक्रिय राजकारणात येणार का? असा सवाल विचारला जात आहे. याबाबत युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनाही प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी दिलेलं उत्तर कान टवकारणारं होतं.

तेजस ठाकरे राजकारणात येत पद घेणार का? जाणून घ्या युवासेनेचे वरुण सरदेसाई काय म्हणाले
वरुण सरदेसाई, तेजस ठाकरे


नाशिक : शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव तेजस ठाकरे यांचा वाढदिवस. त्यानिमित्तानं त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अशावेळी शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी तेजस ठाकरे यांना खास शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या या शुभेच्छांमुळे तेजस ठाकरेही सक्रिय राजकारणात येणार का? असा सवाल विचारला जात आहे. याबाबत युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनाही प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी दिलेलं उत्तर कान टवकारणारं होतं. (Varun Sardesai’s reaction to Tejas Thackeray’s entry into politics)

तेजस ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना अनेक कार्यकर्त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत. तेजस ठाकरे राजकारणात येतील का? पद घेतील का? हे मला सांगता येणार नाही. मात्र, तेजस ठाकरे जेव्हा स्वत: ठरवतील, पक्षप्रमुखांना वाटेल, तेव्हा ते राजकारणात येतील याबद्दल शंका नाही. ते योग्यवेळी निर्णय घेतील, असं वरुण सरदेसाई यांनी म्हटलंय. आदित्य ठाकरे मोठी जबाबदारी सांभाळत आहेत. ते सर्व जबाबदारी अतिशय चांगल्या पद्धतीनं पार पाडत आहेत. सर्व शिवसेना नेते, युवा सेना त्यांच्यासोबत आहे. मुंबईचे पालकमंत्री म्हणूनही ते उत्तम काम करत आहेत. आगामी वर्षात युवासेना सिनेटच्या सर्व निवडणुका ताकदीने लढवणार असल्याचंही वरुण सरदेसाई यांनी सांगितलं आहे.

मिलिंद नार्वेकरांच्या हटके शुभेच्छा

शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी तेजस ठाकरेंना दिलेल्या शुभेच्छा सध्या चर्चेचा विषय ठरतोय. नार्वेकर यांनी तेजस ठाकरे यांना ठाकरे कुटुंबाचे व्हिव्हियन रिचर्ड्स असं म्हटलं आहे. त्याचबरोबर ‘एक घाव दोन तुकडे, तेजस उद्धव ठाकरे’ असंही नार्वेकर यांनी म्हटलंय. इतकंच नाही तर टीव्ही 9 मराठीशी बोलताना आदित्य आणि उद्धव ठाकरे हे संयमी आहेत. मात्र, कुटुंबात तेजससारखा एखादा स्फोटक असावाच, असं नार्वेकर म्हणाले. सामनातील जाहिरात आणि ट्विटबाबत टीव्ही 9 मराठीशी बोलताना मिलिंद नार्वेकर म्हणाले, “मी फक्त शुभेच्छा दिल्या आहेत. तो माझा अधिकार नाही. त्यांचं कुटुंब आणि त्यांचा तो अधिकार आहे. विव्ह रिचर्ड्स यांच्या स्वभावावरुन तेजस यांना मी तसं म्हटलं आहे. त्याचा राजकारणाशी संबंध नाही. कुटुंबातील एखादा व्यक्ती असा स्फोटक असावा. आदित्य, उद्धव ठाकरे हे संयमी आहेत. कुटुंबातील एखादा स्फोटक असावाच लागतो”.

‘ठाकरे कुटुंबाचे व्हिव्हियन रिचर्डस्’

शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी तेजस यांच्या वाढदिवसानिमित्ताने दैनिक ‘सामना’च्या पहिल्या पानावर जाहिरात दिली आहे. त्यात त्यांनी तेजस ठाकरे यांची तुलना महान क्रिकेटपटून व्हिव्हियन रिचर्डस यांच्याशी केली आहे. ठाकरे कुटुंबाचे व्हिव्हियन रिचर्डस् तेजस उद्धव ठाकरे यांना जन्म दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा… असं या जाहिरातीत नार्वेकर यांनी म्हटलं आहे. तेजस यांचा क्रिकेटशी संबंध नसतानाही त्यांची व्हिव्हियन रिचर्डस यांच्याशी तुलना केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. इतकंच नाही तर ‘एक घाव दोन तुकडे, तेजस उद्धव ठाकरे’ असं ट्वीटही नार्वेकर यांनी केलं आहे.

संबंधित बातम्या : 

उद्धव ठाकरेंनी नार्वेकरांना विचारलेला पहिला प्रश्न कोणता होता? नक्की वाचा, नार्वेकरांनीच उलगडलेला प्रसंग

तेजस ठाकरे म्हणजे ठाकरे कुटुंबाचे व्हिव्हियन रिचर्डस्; ‘या’ नेत्यानं केलं कौतुक

Varun Sardesai’s reaction to Tejas Thackeray’s entry into politics

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI