AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘वार्षिक कर भरणाऱ्या वाहन मालकांना करमाफी’, ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीतील 6 मोठे निर्णय

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महाविकासआघाडी सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत आज महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत (Thackeray Government cabinet meeting decisions).

'वार्षिक कर भरणाऱ्या वाहन मालकांना करमाफी', ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीतील 6 मोठे निर्णय
| Updated on: Aug 26, 2020 | 8:32 PM
Share

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महाविकासआघाडी सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत आज महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत (Thackeray Government cabinet meeting decisions). यात टाळेबंदीच्या (लॉकडाऊन) पार्श्वभूमीवर वार्षिक कर भरणाऱ्या वाहन मालकांना करमाफीपासून नाशिक जिल्ह्यात कृषि विज्ञान संकुल निर्मितीपर्यंत अनेक निर्णयांचा समावेश आहे. कोरोनामुळे राज्यात तयार झालेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी देखील काही उपाययोजना या बैठकीत करण्यात आल्या.

राज्याच्या शहरी भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम व्हावी म्हणून मंत्रिमंडळाने शहरी भागातील आरोग्य विभागात 7 नियमित पदांच्या निर्मिती करण्यासाठी मान्यता दिली आहे. या निर्णयानुसार संचालक, उपसंचालक आणि सहाय्यक संचालकांसह 7 पदांची निर्मिती होईल. यामुळे आरोग्य विभागाच्या व्यवस्थापनात मोठी मदत होणार आहे. याशिवाय राज्यातील मच्छिमारांना विशेष सानुग्रह अनुदान देण्याचाही निर्णय घेण्यात आला. अनुदान देण्याच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाकडून मान्यता मिळाली आहे. मागील मोठ्या काळापासून कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या टाळेबंदीत मच्छिमारी व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे.

वार्षिक कर भरणाऱ्या सार्वजनिक वाहतूक आणि मालवाहतूक वाहनांना 1 एप्रिल ते 30 सप्टेंबर 2020 या कालावधीसाठी करमाफी देण्याचाही मोठा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. टाळेबंदीमुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर वाहन चालकांना मदत व्हावी म्हणून हा निर्णय घेण्यात आला. टाळेबंदीमुळे अतिरीक्त होणाऱ्या दूधापैकी प्रतिदिन 10 लाख लिटर दूध स्वीकारणे आणि त्याचं रुपांतर करण्याच्या योजनेला देखील ऑक्टोबरपर्यंत मान्यता देण्यात आली. मुंबई महापालिका वगळून मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील 8 महानगरपालिका आणि 7 नगरपालिका क्षेत्रांसाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण स्थापन करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिलीय.

नाशिक जिल्ह्यातील काष्टी (ता.मालेगाव) येथे कृषि विज्ञान संकुल निर्मिती होणार आहे. यालाही बैठकीत मान्यता मिळाली आहे. याअंतर्गत शासकीय कृषि महाविद्यालय, उद्यानविद्या महाविद्यालय, अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय, कृषि व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय आणि कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयांची स्थापना होणार आहे.

मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय

  • राज्याच्या शहरी भागातील आरोग्य सेवेसाठी ७ नियमित पदांच्या निर्मितीस मान्यता. संचालक, उपसंचालक आणि सहाय्यक संचालक या पदांचा समावेश.
  • राज्यातील मच्छिमारांना मिळणार विशेष सानुग्रह अनुदान, मंत्रिमंडळाकडून अनुदान देण्यास मान्यता.
  • वार्षिक कर भरणाऱ्या सार्वजनिक वाहतूक आणि मालवाहतूक वाहनांना 1 एप्रिल ते 30 सप्टेंबर 2020 या कालावधीसाठी मिळणार करमाफी. टाळेबंदीमुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर निर्णय.
  • टाळेबंदीमुळे अतिरीक्त होणाऱ्या दूधापैकी प्रतिदिन 10 लाख लिटर दुध स्विकारणे आणि रुपांतर योजना ऑक्टोबरपर्यंत राबविण्यास मान्यता.
  • मुंबई महापालिका वगळून मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील 8 महानगरपालिका व 7 नगरपालिका क्षेत्राकरिता झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण स्थापन करण्यास मान्यता.
  • नाशिक जिल्ह्यातील काष्टी (ता.मालेगाव) येथे कृषि विज्ञान संकुल निर्मितीस मान्यता. याअंतर्गत शासकीय कृषि महाविद्यालय, उद्यानविद्या महाविद्यालय, अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय, कृषि व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय आणि कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयांची होणार स्थापना.

इतर महत्त्वाचे निर्णय :

लोकसेवा आयोगाच्या सर्व परीक्षा पुढे ढकलणार

कोव्हिड 19 च्या संसर्गाच्या परिस्थितीमुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती मुख्य सचिवांनी आज मंत्रिमंडळ बैठकीत दिली. सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

महाड दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये

महाड येथे झालेल्या इमारत दुर्घटनेत 14 जण मृत्युमुखी पडले. या मृतांच्या वारसांना राज्य आपत्ती सहायता निधीतून (एसडीआरएफ) प्रत्येकी 4 लाख रुपये आणि मुख्यमंत्री सहायता निधीतून 1 लाख असे 5 लाख रुपये मदत देण्यात येणार असल्याची माहिती मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आली.

संबंधित बातम्या :

घर घेणाऱ्यांसाठी ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, 31 डिसेंबरपर्यंत स्टॅम्प ड्युटीत मोठी कपात

IAS Transfer | तुकाराम मुंढे यांची बदली, नागपूर महापालिका आयुक्तपदी कोण?

तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली, नागपूरचे धडाकेबाज महापालिका आयुक्त आता मुंबईत!

Thackeray Government cabinet meeting decisions

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.