लोकसभा निवडणुकांच्या तारखांचा संभ्रम दूर

नवी दिल्ली:भारत -पाकिस्तान यांच्यात वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतातील लोकसभा निवडणुकांबाबत संभ्रम निर्माण केला जात होता. मात्र केंद्रीय निवडणूक आ योगाने हा संभ्रम दूर केला. लोकसभा निवडणूक 2019 ही नियोजित वेळेतच होईल, असं म्हणत निवडणूक आयोगाने लोकसभेच्या तारखा पुढे ढकलण्याची शक्यता फेटाळली. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी याबाबतची माहिती दिली. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये निवडणूक …

लोकसभा निवडणुकांच्या तारखांचा संभ्रम दूर

नवी दिल्ली:भारत -पाकिस्तान यांच्यात वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतातील लोकसभा निवडणुकांबाबत संभ्रम निर्माण केला जात होता. मात्र केंद्रीय निवडणूक आ योगाने हा संभ्रम दूर केला. लोकसभा निवडणूक 2019 ही नियोजित वेळेतच होईल, असं म्हणत निवडणूक आयोगाने लोकसभेच्या तारखा पुढे ढकलण्याची शक्यता फेटाळली.

मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी याबाबतची माहिती दिली. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये निवडणूक आयोगाची बैठक झाली, या बैठकीनंतर अरोरा यांनी लोकसभा तारखांचा संभ्रम दूर केला. शिवाय उत्तर प्रदेशातील सर्व 80 लोकसभा मतदारसंघात VVPAT मशिनचा वापर केला जाईल असंही त्यांनी सांगितलं.

लोकांनी EVM ला फुटबॉल बनवलंय – निवडणूक आयोग

मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशिन अर्थात ईव्हीएमवरुन राजकीय पक्षांवर निशाणा साधला. देशात ईव्हीएमला फुटबॉल बनवण्यात आला आहे, असं अरोरा म्हणाले.

ईव्हीएम पूर्णत: सुरक्षित आहेत. सुप्रीम कोर्टानेही बॅलेट पेपरने निवडणूक होणार नाही हे स्पष्ट केलं आहे. 2014 मध्ये लोकसभा निवडणुकीत ईव्हीएमने एक निकाल लागला, मात्र त्याच्या चारच महिन्यांनी दिल्ली विधानसभेत दुसरा निकाल लागला, त्यामुळे ईव्हीएमवर संशय व्यक्त करणं चुकीचं आहे, असं अरोरा म्हणाले.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *