11 दिवसात सरकार पडेल, नारायण राणेंचं भाकित

चांगल्याला चांगलं म्हणणं माणूसकीचा धर्म आहे," असे वक्तव्य भाजप नेते आणि राज्यसभा खासदार नारायण राणे यांनी (Narayan rane on maha vikas aghadi) केलं.

Narayan rane on maha vikas aghadi, 11 दिवसात सरकार पडेल, नारायण राणेंचं भाकित

भिवंडी : “जेव्हा लोकसभेत CAA बील आलं तेव्हा त्यांनी पाठिंबा दिला. त्यानंतर सभात्याग करुन बाहेर केले. पण सुरुवातीला पाठिंबा दिला. राज्यसभेत विरोध केला. सुरुवातीला पाठिंब्यानंतर विरोध होता. पण आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट झाल्यावर त्यांनी याला पाठिंबा दिला आहे. ही चांगली गोष्ट आहे. चांगल्याला चांगलं म्हणणं माणूसकीचा धर्म आहे,” असे वक्तव्य भाजप नेते आणि राज्यसभा खासदार नारायण राणे यांनी (Narayan rane on maha vikas aghadi) केलं.

खासदार कपिल पाटील यांनी भिवंडीमध्ये चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे. नारायण राणे यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन पार पडले. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी महाविकासआघाडीवर टीका केली.

“राज्यातील चालू घडामोडी पाहता सरकार आज पडेल की उद्या पडेल. पण मी त्याची मर्यादा 11 दिवसांपर्यत वाढवलेली आहे. त्यामुळे 11 दिवसात सरकार पडेल की नाही हे प्रसारमाध्यमांनी पाहावं,” असे भाकित नारायण राणे यांनी (Narayan rane on maha vikas aghadi) वर्तवले.

“आम्हाला असं वाटत की कुठल्याही क्षणी हे सरकार पडू शकतं. असे हे सरकार आहे. हे सरकार कोणत्याही प्रकारे महाराष्ट्रातील जनतेच्या अपेक्षा पूर्ण करु शकत नाही. कोणत्याही प्रकारचं विकास काम किंवा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसारखा विषय सोडवू शकत नाही. आश्वासन दिली आहेत.”

“पण पूर्तता करण्याची क्षमता मुख्यमंत्री किंवा या सरकारमध्ये नाही. फक्त सत्तेसाठी आणि पदासाठी एकत्र आलेली मंडळी आहेत. पदासाठी पैसा आणि पैशासाठी पद हे समीकरण आताचे सत्तेवरील लोकं करत आहे. म्हणून हे भाकित मी वर्तवले आहे,” असेही राणे (Narayan rane on maha vikas aghadi) म्हणाले.

“भविष्यात भाजप-शिवसेना पुन्हा एकत्र येतील की नाही हे मी सांगू शकत नाही. हे ज्योतिष सांगू शकेल. त्यासाठी ज्योतिषाकडे जावं लागेल. भविष्यात काहीही होऊ शकतं. अशी लक्षण तुमच्या म्हणण्याप्रमाणे दिसतात. बघू 11 दिवसात काय होतं ते,” असे वक्तव्यही नारायण राणेंनी केलं.

जर उद्धव ठाकरे एकत्र आले तर तुम्ही विरोध कराल का? असे विचारले असता राणे म्हणाले, “माझा विरोध नाही. जो पक्षाचा निर्णय तो माझा निर्णय असेल.”

Narayan rane on maha vikas aghadi

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *