विधानसभेत महिला आमदारांच्या संख्येत वाढ, कोणत्या पक्षाच्या किती महिला आमदार?

विधानसभेत महिला आमदारांच्या संख्येत वाढ, कोणत्या पक्षाच्या किती महिला आमदार?

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत जवळपास 24 महिला आमदार निवडून आल्या आहेत. विशेष म्हणजे 2014 च्या निवडणुकीपेक्षा यंदा महिला आमदारांची संख्या चारने वाढली (Women MLA In Vidhansabha) आहे.

Namrata Patil

|

Oct 26, 2019 | 8:55 AM

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये (Maharashtra Vidhansabha Election Result) भाजपने मुसंडी मारत 105 जागा मिळवल्या आहेत. त्यानंतर शिवसेना 56, राष्ट्रवादी 54 आणि काँग्रेसला 44 जागा (Maharashtra assembly election result 2019) मिळाल्या आहेत. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत जवळपास 24 महिला आमदार निवडून आल्या आहेत. विशेष म्हणजे 2014 च्या निवडणुकीपेक्षा यंदा महिला आमदारांची संख्या चारने वाढली (Women MLA In Vidhansabha) आहे.

यात सत्ताधारी भाजपच्या 12 महिला निवडून आल्या आहेत. तर शिवसेनेच्या 2, काँग्रेसच्या 2, राष्ट्रवादीच्या 3 महिला आमदारा निवडून आल्या आहेत. यंदा जवळपास 235 महिला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात  (Women MLA In Vidhansabha) होत्या. यातील 24 महिला उमेदवार निवडून आल्या आहेत.

विधानसभा निवडणुकीत सर्वात जास्त जागा मिळवत भाजप मोठा पक्ष ठरला. तर शिवसेना-भाजप युतीला 161 तर काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला 98 जागा मिळाल्या. मात्र 145 ची मॅजिक फिगर एकहाती गाठण्यात भाजपला अपयश आलं (Women MLA In Vidhansabha) आहे. शिवसेना 56 जागांसह (Shivsena MLA List) दुसऱ्या स्थानावर आहे.

विधानसभेतील महिला आमदार (Women MLA In Vidhansabha)

भाजपच्या महिला आमदार

1. मंदा म्हात्रे – बेलापूर 2. मनिषा चौधरी – दहिसर 3. विद्या ठाकूर – गोरेगाव 4. भारती लव्हेकर – वर्सोवा 5. माधुरी मिसाळ – पर्वती 6. मुक्ता टिळक – कसबापेठ 7. देवयानी फरांदे – नाशिक मध्य 8. सीमा हिरे – नाशिक पश्चिम 9. श्वेता महाले – चिखली 10. मेघना बोर्डीकर – जिंतूर 11. नमिता मुंदडा – केज 12. मोनिका राजळे – शेवगाव

शिवसेनेच्या महिला आमदार

1. यामिनी जाधव – भायखळा 2. लता सोनवणे – चोपडा

काँग्रेसच्या महिला आमदार

1. वर्षा गायकवाड – धारावी 2. प्रणिती शिंदे – सोलापूर मध्य 3. प्रतिभा धानोरकर – वरोरा 4. सुलभा खोडके – अमरावती 5. यशोमती ठाकूर – तिवसा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आमदार

1. सरोज अहिरे – देवळाली 2. सुमनताई पाटील – तासगाव-कवठेमहंकाळ* 3. अदिती तटकरे – श्रीवर्धन

अपक्ष महिला आमदार

1. गीता जैन, भाजप बंडखोर – मीरा-भाईंदर 2. मंजुळा गावित – साक्री

संबंधित बातम्या :

BJP MLA List | भाजप आमदारांची संपूर्ण यादी

भाजपला मेटाकुटीला आणणाऱ्या 40 मतदारसंघांचा निकाल

Shivsena MLA List | शिवसेना आमदारांची संपूर्ण यादी

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें