Devendra Fadnavis : शिवसेना-राष्ट्रवादीचं आधीच ठरलं होतं, फडणवीसांनी सांगितली विधानसभा निवडणुकीतील पडद्यामागची गोष्ट

राज्यात सध्या सत्ता परिवर्तन झाले असले तरी 2019 च्या निवडणुकीनंतर नेमकं काय झालं हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. दरम्यानच्या काळात सत्ता स्थापनेची गणित जुळताच पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आपला फोनही घेतला नाही. कारण शिवसेना आणि राष्ट्रवादीचं हे सत्ता स्थापनेचे आगोदरच ठरले असल्याचे फडवणीसांनी सांगितले आहे.

Devendra Fadnavis : शिवसेना-राष्ट्रवादीचं आधीच ठरलं होतं, फडणवीसांनी सांगितली विधानसभा निवडणुकीतील पडद्यामागची गोष्ट
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पक्षप्रमुख उध्दव ठाकरेImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 23, 2022 | 5:50 PM

मुंबई : 2019 च्या विधानसभा निवडणुकीत सर्वकाही ठरल्याप्रमाणे झाले होते. केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह हेच नाहीतर खुद्द (Shivsena) शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी देखील अनेक सभांध्ये ही निवडणुक (Devendra Fadnavis) देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात होत असल्याचे सांगितले होते. असे असताना निवडणुकीचे निकाल येण्यापूर्वीच शिवसेना-राष्ट्रवादीचं ठरलं होतं त्यांना केवळ नंबरची जुळवाजुळव करायची होती. निकालानंतर चित्र स्पष्ट होताच शिवसेनेने आमच्याकडे सर्व पर्याय खुले असल्याचे सांगत (Rashtrawadi Congress) राष्ट्रवादीचा पर्याय निवडला आणि त्याच एका निर्णयामुळे आज पक्षावर ही वेळ आल्याची घणाघाती टीका देवेंद्र फडणवीस यांनी पक्षप्रमुखांवर केली आहे. त्यामुळे पाठीत कोणी खंजीर खुपसला हे आता नव्याने सांगायची गरज नाहीतर सध्याची एकनाथ शिंदे यांची शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

पर्याय खुले होताच चर्चा बंद

राज्यात सध्या सत्ता परिवर्तन झाले असले तरी 2019 च्या निवडणुकीनंतर नेमकं काय झालं हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. दरम्यानच्या काळात सत्ता स्थापनेची गणित जुळताच पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आपला फोनही घेतला नाही. कारण शिवसेना आणि राष्ट्रवादीचं हे सत्ता स्थापनेचे आगोदरच ठरले असल्याचे फडवणीसांनी सांगितले आहे. नैसर्गिक युती बाजूला सारुन त्यांनी घेतलेला निर्णय हा ना जनतेला मान्य नव्हता ना नियतीला. म्हणूनच अडीच वर्ष ही केवळ सूडाचे राजकारण करण्यात गेली. आता राज्य खऱ्या अर्थाने प्रगतीपथावर असल्याचे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतुक केले.

शिवसेनेकडूनच बेईमानी, भाजपाच्या जागा कमी

विधानसभा निवडणुकीत शिवसेनेनेभ बेईमानी केल्यानेच भाजपाच्या जागा कमी आल्या तर दुसरीकडे भाजपाने पक्षातील नाराजी दूर करुन सेनेला मदत केली. पक्षाचा विश्वास आणि आमच्या भोळेपणाचा फायदा हा सेनेने घेतला. कारण त्यांचं आणि राष्ट्रवादीचं आगोदरच ठरलं होते. युतीचे उमेदवार निवडुण यावेत म्हणून झालेले बंड आम्ही जागोजागी मिटवले. एवढेच नाहीतर सर्व ती मदत करण्यात आली. पण त्यांचं आगोदरच ठरल्याने ही अनैसर्गिक युती जनतेच्या नशिबाला आल्याचे त्यांनी सांगितले.

‘त्या’ निर्णयामुळेच आज ही वेळ

केवळ सत्तेसाठी शिवसेनेने अनैसर्गिक युती केली. ही युती म्हणजे केवळ सत्तास्थापन एवढेच नाहीतर बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या विरोधात घेतलेला निर्णय होता. त्यामुळेच आज ही पक्षावर वेळ आली आहे. त्याचे बिजारोपण हे 2019 साली घेतलेल्या निर्णयाचतच होते असेही फडणवीस यांनी सांगितले आहे. त्यामुळे अनैसर्गिक युतीचे सरकार टिकले नाही. आता खऱ्या अर्थाने जनतेच्या मनातले सरकार सत्तेत आल्याचेही ते म्हणाले.

Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.