..तरच उदयनराजेंविरोधात शिवसेना लढेल, अन्यथा नाही : दिवाकर रावते

सातारा : साताऱ्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांची मतदारसंघावर एकहाती पकड आहे. मात्र, तरीही अनेक पक्ष त्यांच्याविरोधात उमेदवार उभे करतातच. अनेकदा प्रतिस्पर्धी उमेदवारांचे डिपॉझिट जप्तही झालं आहे. मात्र, यावेळी अनेक पक्षांनी एक-एक खासदार निवडून आणण्यासाठी कंबर कसली असल्याने उदयनराजेंविरोधातही साताऱ्यातून कुणी बलाढ्य उमेदवार उभा करेल का, याची उत्सुकता शिगेला पोहोचली असताना, शिवसेनेचे नेते आणि […]

..तरच उदयनराजेंविरोधात शिवसेना लढेल, अन्यथा नाही : दिवाकर रावते
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:29 PM

सातारा : साताऱ्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांची मतदारसंघावर एकहाती पकड आहे. मात्र, तरीही अनेक पक्ष त्यांच्याविरोधात उमेदवार उभे करतातच. अनेकदा प्रतिस्पर्धी उमेदवारांचे डिपॉझिट जप्तही झालं आहे. मात्र, यावेळी अनेक पक्षांनी एक-एक खासदार निवडून आणण्यासाठी कंबर कसली असल्याने उदयनराजेंविरोधातही साताऱ्यातून कुणी बलाढ्य उमेदवार उभा करेल का, याची उत्सुकता शिगेला पोहोचली असताना, शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी एक घोषणा केली आहे. खरंतर ही घोषणा आहे की ऑफर, हे तुम्हीच ठरवा.

शिवसेनेचे नेते आणि मंत्री दिवाकर रावते काय म्हणाले?

“राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले हे जर अपक्ष निवडणूक लढणार असतील, तर त्यांच्या विरोधात शिवसेना उमेदवार देणार नाही. शिवाय, त्यांना बिनविरोध निवडून देण्यासाठी प्रयत्न करु. मात्र, राष्ट्रवादीकडून ते लढले तर त्यांच्या विरोधात नक्की शिवसेना उमेदवार देईल.” – शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते

एकंदरीत शिवसेनेला उदयनराजे भोसले हे साताऱ्यातून खासदार असण्याला काहीच हरकत नाही, मात्र ते राष्ट्रवादी काँग्रेसकडून खासदार असतील, तर सेनेला हरकत असल्याचे दिसून येते आहे. कारण अपक्ष लढल्यास उमेदवार नाही आणि राष्ट्रवादीकडून लढल्यास विरोधात उमेदवार, अशी काहीशी ऑफरयुक्त इशारा शिवसेनेकडून देण्यात आला आहे.

दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसकडून उदयनराजे भोसले यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या ऑफरयुक्त इशाऱ्याची दखल उदयनराजे भोसले घेतील का, याबाबत शंका आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.