नारायण राणेंनी भविष्य सांगण्याचा धंदा सुरु केलाय, त्यांना शुभेच्छा : अनिल परब

भाजप नेते नारायण राणे यांनी महाविकासआघाडीचे सरकार ऑगस्टनंतर पडेल, असे वक्तव्य केले (Anil Parab on Narayan Rane) होते.

नारायण राणेंनी भविष्य सांगण्याचा धंदा सुरु केलाय, त्यांना शुभेच्छा : अनिल परब

सिंधुदुर्ग :भाजप नेते नारायण राणे यांना काहीच काम नसल्यामुळे त्यांनी भविष्य सांगण्याचा धंदा सुरु केला आहे. हे मला माहिती नव्हते, त्यांना या धंद्यासाठी शुभेच्छा,” असे वक्तव्य परिवहनमंत्री अनिल परब यांनी केले आहे. काही दिवसांपूर्वी नारायण राणे यांनी महाविकासआघाडीचे सरकार ऑगस्टनंतर पडेल, असे वक्तव्य केले होते. त्यावर अनिल परब यांनी प्रतिक्रिया दिली. अनिल परब यांनी कणकवलीत पत्रकारांशी बोलताना राणेंना उपरोधिक शुभेच्छा दिल्या. (Anil Parab on Narayan Rane)

अनिल परब यांनी आज कणकवली एसटी आगाराची पाहणी केली. कणकवली आगार कात टाकणार असून त्याचे पुनर्जीवन करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. एसटी गाडीमध्ये चढून परिवहनमंत्र्यांनी गाडीची ही पाहणी केली.

तोट्यात असलेली एसटी नफ्यात आणण्यासाठी परिवहन विभागाकडून काही आगारांचे पुनर्जीवन करण्यात येणार आहे.त्याचपद्धतीने कणकवली आगाराचे पुनर्जीवन करण्याच्या दृष्टीने परिवहन मंत्र्यांचा हा पाहणी दौरा होता. यावेळी त्यांच्या सोबत आमदार वैभव नाईक व एसटीचे अधिकारी ही सोबत होते.

“कामांसाठी निधी मिळत नसल्यामुळे काँग्रेसचे आमदार नाराज आहे. त्यातील 11 आमदार उपोषणला बसणार असल्यामुळे परिवहन मंत्र्यांना विचारले. त्यांनी चौथ्या स्तंभाकडून आपल्याला हे कळत असल्याची कबुली अनिल परबांनी दिली.” (Anil Parab on Narayan Rane)

संबंधित बातम्या :

फडणवीसांना महाराष्ट्रात खूप कामे, मी मोकळाच; संजय राऊत, कधी येता कर्नाटकला? : नारायण राणे

SSR Case to CBI | सामनाचे संपादक तोंडावर पडले, एवढं बोलायला कोणी सांगितलं होतं : नारायण राणे

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *