tv9 Marathi Poll: शिंदेंनी बंडासाठी दिलेलं हिंदुत्वाचं कारण आणि भाजपसोबत सत्ता स्थापन हे तुम्हाला पटतं का? 7 लाख व्होटर्सचा धक्कादायक कौल

बंडखोरी केल्यानंतर शिंदे म्हणाले की, राज्यातील महाविकास आघाडी सरकारची युती ही अनैसर्गिक आहे. भाजपसोबत युती करून हिंदुत्व टिकवता येईल. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये शिवसेनेचे मात्र पद्धतशीर खच्चीकरण होत आहे. पक्ष आणि हिंदुत्व टिकविण्यासाठी अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडणे अत्यावश्यक आहे, असे शिंदे म्हणाले होते.

tv9 Marathi Poll: शिंदेंनी बंडासाठी दिलेलं हिंदुत्वाचं कारण आणि भाजपसोबत सत्ता स्थापन हे तुम्हाला पटतं का? 7 लाख व्होटर्सचा धक्कादायक कौल
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 23, 2022 | 12:47 PM

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडखोरीनंतर राज्यात एकच गोंधळ निर्माण झालायं. शिंदेंनी त्यांच्यासोबत 41 आमदार शिवसेनेचे असल्याचा दावा केल्याने महाविकास आघाडी सरकार धोक्यात आहे. काल रात्री मुख्यमंत्र्यांनी भावनिक भाषण करून वर्षा निवासस्थान सोडले. इतकेच नाही तर माझ्यासोबत असलेली शिवसेना (Shivsena) हीच खरी शिवसेना आहे, असेही एकनाथ शिंदे म्हटंले आहेत. शिंदे यांनी आपल्यासोबतच्या आमदारांना (MLA) विश्वासात घेत स्वतःला गटनेता असल्याचं म्हटलंय. शिंदेंनी बंडासाठी हिंदुत्वाचे कारण दिले आहे. यासंदर्भात tv9 Marathi ने व्होटर्सचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न केलायं.

शिंदेंनी बंडासाठी सांगितले हिंदुत्वाचे कारण

बंडखोरी केल्यानंतर शिंदे म्हणाले की, राज्यातील महाविकास आघाडी सरकारची युती ही अनैसर्गिक आहे. भाजपसोबत युती करून हिंदुत्व टिकवता येईल. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये शिवसेनेचे मात्र पद्धतशीर खच्चीकरण होत आहे. पक्ष आणि हिंदुत्व टिकविण्यासाठी अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडणे अत्यावश्यक आहे, असे शिंदे म्हणाले. याच विषयावर tv9 Marathi ने एक पोल घेतला, यामध्ये विचारण्यात आले की, शिंदेंनी बंडासाठी सांगितलेलं हिंदुत्वाचं कारण आणि भाजपसोबत सरकार तुम्हाला पटतं का ?, यावर 7 लाख व्होटर्सने धक्कादायक कौल दिलायं.

हे सुद्धा वाचा

Poll

व्होटर्सने दिला धक्कादायक काैल

tv9 Marathi च्या पोलमध्ये 7 लाख 156 व्होटर्स सहभागी झाले आणि ही संख्या सातत्याने वाढते आहे. यापैकी 47 टक्के लोकांना, शिंदेंनी बंडासाठी सांगितलेलं हिंदुत्वाचं कारण आणि भाजपसोबत सरकार हे पटत नाही. तर 44 टक्के लोकांना शिंदेंनी बंडासाठी सांगितलेलं हिंदुत्वाचं कारण आणि भाजपसोबत सरकार हे बरोबर वाटते. 8 टक्के लोकांनी यावर काही सांगता येत नाही, असे म्हटंले आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे महाराष्ट्रातील दोन तृतीयांशपेक्षा जास्त आमदार झाले आहेत. उद्धव ठाकरेंची शिवसेना ही बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना उरलेली नाही, असं ठामपणे शिंदे सांगत आहेत.

Non Stop LIVE Update
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?.
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ.
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात.
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश.
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप.
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?.
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?.
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?.
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं.