AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोनियांच्या जवळचा मंत्री दिल्लीत जाऊन म्हणाला, महाराष्ट्रात उद्धव बाळासाहेब ठाकरेंचं सरकार, सहजा-सहजी पडणार नाही!

महाराष्ट्रात (Maharashtra) उद्धव बाळासाहेब ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वात हे सरकार काम करत राहिल, असं राज्याचे ऊर्जामंत्री नेते नितीन राऊत (Nitin Raut) म्हणाले.

सोनियांच्या जवळचा मंत्री दिल्लीत जाऊन म्हणाला, महाराष्ट्रात उद्धव बाळासाहेब ठाकरेंचं सरकार, सहजा-सहजी पडणार नाही!
| Updated on: Apr 09, 2021 | 12:14 PM
Share

नवी दिल्ली : “कोरोनात राजकारण आणून याची विकेट जाईल त्याची विकेट जाईल हे बंद करा. मध्यप्रदेशात सरकार पाडलं तसं महाराष्ट्राचं सरकार इतक्या सहजा सहजी पडणार नाही. महाराष्ट्रात (Maharashtra) उद्धव बाळासाहेब ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वात हे सरकार काम करत राहिल, असं राज्याचे ऊर्जामंत्री आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींच्या (Sonia Gandhi) जवळचे नेते नितीन राऊत (Nitin Raut) म्हणाले. ते दिल्लीत टीव्ही 9 मराठीशी बोलत होते. (Uddhav Balasaheb Thackeray’s government in Maharashtra will not fall easily, said congress leader and minister Nitin Raut)

जोवर आरोप सिद्ध होत नाहीत तोवर कुणी वसुली मंत्री होत नाही. अनिल देशमुखांचं (Anil Deshmukh) प्रकरण आता न्यायालयात आहे, तेव्हा त्यांना त्यांचं काम करू द्यावं, असं राऊत म्हणाले.

लसीवरुन राजकारण थांबवा 

लसीवरुन राजकारण थांबवा (Maharashtra corona vaccination, ) सध्या सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. केंद्राने सत्य परिस्थिती सर्वासमोर ठेवावी. राजकारण करायचं असेल तर सांगावं एकदा की महाराष्ट्रात भाजपचं सरकार नाही त्यामुळे आम्ही तुम्हाला लस देणार नाही, सापत्न वागणूक देत आहोत असं म्हणा, असा हल्लाबोल नितीन राऊत यांनी केला.

लसीकरणाचा उत्सव म्हणजे निव्वळ राजकारण

केंद्रानं त्यांच्या नेत्यांवर विश्वास ठेवावा. कोरोनाचा विषय कोणत्याही पक्षाचा नाही. हा सध्या महाराष्ट्राचा प्रश्न झाला आहे. लसीकरणाचा उत्सव म्हणजे निव्वळ राजकारण आहे. महापुरुषांचे नाव घेता तसं वागत कधीच नाही, असं टीकास्त्र नितीन राऊत यांनी सोडलं.

यांचे दैवत हे केवळ आर एस एस आणि गोळवलकर गुरूजी आहेत. केवळ बंगालची निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून महापुरूषांची नावं घेतली जात आहेत. महाविकास आघाडी हा उत्सव साजरा करण्याचा प्रश्नच नाही. लसीकरणाचं अभियान मोठ्या प्रमाणावर करण्याचं उद्दीष्ट आहे, असं नितीन राऊत म्हणाले.

महाराष्ट्रात कोरोना लसीचा तुटवडा

राज्यात सध्या कोरोना लसीचा (Corona Vaccine) तुटवडा जाणवतोय. राज्यातल्या शहरी आणि ग्रामीण इथून पुढचे 2 ते 3 दिवस पुरेल इतकाच कोरोना लसीचा साठा शिल्लक आहे, अशी माहिती खुद्द राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनीच दिली आहे. राज्यात कालपासून अनेक भागात कोरोना लसीचा तुटवडा भासतोय. सातारा, सांगली, कोल्हापूर, पनवेलमध्ये लसीअभावी कोरोना लसीकरण केंद्र बंद ठेवण्याची नामुष्की ओढावली आहे. तर पुण्यातही काही लसीकरण केंद्रावर लसीचा साठा संपल्यामुळे अनेक नागरिकांना लस न घेताच परतावं लागत आहे. याच सगळ्या पार्श्वभूमीवर #MaharashtraNeedsVaccine असा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड होतोय.

मुंबईतील 72 पैकी 26 खासगी व्हॅक्सीनसेंटर बंद

मुंबईतील 72 पैकी 26 खासगी व्हॅक्सीनसेंटरमधील लस संपल्याने या 26 ठिकाणचं लसीकरण बंद करण्यात आलं आहे. मुंबईतील सर्वात मोठं लसीकरण केंद्र असलेल्या बीकेसी कोविड सेंटरमध्येही लस संपल्याने या ठिकाणचंही लसीकरण बंद करण्यात आलं आहे. (

संबंधित बातम्या 

बीकेसीसह मुंबईतील 26 लसीकरण केंद्र बंद; वाचा, सविस्तर लिस्ट

महाराष्ट्राला कोरोना लसीचा मुबलक पुरवठा का नाही?, सोशल मीडियावर #MaharashtraNeedsVaccine हॅशटॅग ट्रेंडमध्ये

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.