शिवसेनेत येण्यासाठी उद्धव ठाकरेंनी फोन केला आणि म्हणाले…. उर्मिला मातोंडकरांनी सांगितली INSIDE STORY

हाती शिवबंधन बांधल्यानंतर उर्मिला मातोंडकर यांनी पहिल्यांदा पत्रकार परिषद घेते दणदणीत आणि खणखणीत मुलाखत दिली.

शिवसेनेत येण्यासाठी उद्धव ठाकरेंनी फोन केला आणि म्हणाले.... उर्मिला मातोंडकरांनी सांगितली INSIDE STORY
Follow us
| Updated on: Dec 01, 2020 | 5:06 PM

मुंबई : ‘रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) तर सोबत आहेच पण शिवसेनेत (Shivsena) प्रवेश करण्यासाठी मला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडून फोन आला होता. त्यावेळी ते इतकं सुंदर बोलले आणि मला त्यांचे विचार पटल्याचं’ अभिनेत्री उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) यांनी म्हटलं आहे. पक्षात प्रवेश करण्याआधी उद्धव ठाकरेंनी फोनवर काय सांगितलं हेदेखील उर्मिला यांनी सांगितलं आहे. त्या आयोजित पत्रकार परिषदेमध्ये (press conference) बोलत होत्या. हाती शिवबंधन बांधल्यानंतर उर्मिला मातोंडकर यांनी पहिल्यांदा पत्रकार परिषद घेते दणदणीत आणि खणखणीत मुलाखत दिली. यावेळी त्यांनी काँग्रेस ते कंगना अशा अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं. (Uddhav Thackeray called to join ShivSena Urmila Matondkar told INSIDE STORY)

शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी तुम्हाला कोणी अप्रोच केला होता? असा प्रश्न विचारला असता रश्मी ठाकरे तर सोबत आहेतच पण उद्धव ठाकरेंनीदेखील मला फोन केला होता. यावेळी त्यांनी अतिशय सुंदर गोष्ट बोलली होती. ती म्हणजे, ‘महाराष्ट्राची परंपरा इतकी मोठी आहे की त्यामुळे विधान परिषदेचा सांस्कृतिक आणि सामाजिक दर्जा वाढावा अशी माझी मनोमन इच्छा आहे. या जागा आणि भवनांपर्यंत जाण्यासाठी लोकांना खूप मोठा प्रवास करावा लागतो. त्यामुळे याचा दर्जा कुठेतरी वाढवला गेला पाहिजे. त्याकरता तुमच्यासारख्या लोकांची गरज आहे.’ असं उद्धव ठाकरेंनी फोनवर म्हटल्याचं उर्मिला मातोंडकर यांनी सांगितलं.

इतकंच नाही तर, ‘उद्धव ठाकरेंचे हे विचार मला खूप आवडले. विधान परिषदेसारख्या जागांवर महाराष्ट्रासारखं राज्य आपल्या आपच सगळ्यात पुढे आहे. त्यामुळे यासाठी त्यांनी माझा विचार केला. यामुळे मी स्वत:ला खूप भाग्यवान समजते’ असंही उर्मिला मातोंडकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, राज्यपाल नियुक्त आमदारकीच्या कोट्यातून विधान परिषदेवरील शिवसेना उमेदवार आणि प्रख्यात अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी ‘मातोश्री’वर शिवसेनेत अधिकृत पक्षप्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray), राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi), महापौर किशोरी पेडणेकर यांच्या उपस्थितीत मिसेस मुख्यमंत्री रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांनी उर्मिला यांच्या हाती शिवबंधन बांधले. उर्मिला यांचा भगवा मास्क यावेळी लक्षवेधी ठरला. (Uddhav Thackeray called to join ShivSena Urmila Matondkar told INSIDE STORY)

विधान परिषदेत शिवसेनेचा आवाज उर्मिला मातोंडकर यांच्या रुपाने अधिक बुलंद होणार आहे. अभिनेत्री कंगना रनौतने शिवसेना नेते आणि मुंबई महापालिकेवर हल्लाबोल चढवला असताना उर्मिला यांनी ठाम भूमिका घेत कंगना सुनावलं होतं. त्यानंतर काही महिन्यातच उर्मिला मातोंडकर यांना खुद्द उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेची ऑफर दिली असल्याचं बोललं जात आहे.

इतर बातम्या –

कितीही ट्रोल करा, मी मराठी मुलगी आहे, मागे हटणार नाही; उर्मिला मातोंडकरांचा इशारा

शिवसेनेत प्रवेश करताच उर्मिलाचा मराठी बाणा, कंगनाला सॉलिड टोला

(Uddhav Thackeray called to join ShivSena Urmila Matondkar told INSIDE STORY)

Non Stop LIVE Update
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.