Photo : बनारसी सिल्क साडी, गळ्यात साज, बाळासाहेबांना वंदन; उर्मिलाच्या हाती शिवबंधन!

बॉलिवूडची ‘रंगीला गर्ल’ आणि प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी आज‘मातोश्री’वर शिवसेनेत अधिकृत पक्षप्रवेश केला.(Banarasi Silk Saree, Necklace, Tribute to Balasaheb; Shivbandhan in Urmila’s hands!)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 13:56 PM, 1 Dec 2020
बॉलिवूडची 'रंगीला गर्ल' आणि प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी आज‘मातोश्री’वर शिवसेनेत अधिकृत पक्षप्रवेश केला.
शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी, महापौर किशोरी पेडणेकर आणि मिसेस मुख्यमंत्री रश्मी ठाकरे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला.
महत्वाचं म्हणजे रश्मी ठाकरे यांनी उर्मिला मातोंडकर यांच्या हातावर स्वत: शिवबंधन बांधलं. पक्षप्रवेशानंतर त्यांनी शिवसेनाप्रमुख, दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला अभिवादन केलं.
या पक्षप्रवेशावेळी उर्मिला यांचा भगवा मास्क लक्षवेधी ठरला. बनारसी साडी, गळ्यात साज अशा मराठमोळ्या पेहरावात त्या आल्या होत्या.
उर्मिला मातोंडकर यांचे वक्तृत्त्व, मराठी चेहरा, लोकप्रियता, अनेक भाषांवरील प्रभुत्व, राजकीय समज आदी कारणांमुळे त्यांना शिवसेनेत प्रवेश देण्यात आला आहे. तसेच राज्यपाल नियुक्त सदस्यपदासाठी शिवसेनेने त्यांच्या नावाची शिफारस केली आहे.