AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘त्या’ पत्राची दखल उद्धव ठाकरेंनी घेतली नाही; म्हणून आम्ही उठाव केला, प्रताप सरनाईकांनी सांगितलं कारण

आपली मंत मांडण्याचा अधिकार सर्वांना आहे. मात्र त्यांनी हा विचार करावा की आम्ही बाहेर का पडलो, बाळासाहेबांचे विचार आम्ही पुढे घेऊन का जात आहोत, असं प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे.

'त्या' पत्राची दखल उद्धव ठाकरेंनी घेतली नाही; म्हणून आम्ही उठाव केला, प्रताप सरनाईकांनी सांगितलं कारण
प्रताप सरनाईक, आमदार, Image Credit source: Google
| Updated on: Oct 06, 2022 | 8:26 AM
Share

मुंबई :  बुधवारी बेकेसीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा दसरा मेळावा पार पडला. तर दुसरीकडे शिवाजी पार्कवर शिवसेना (Shiv sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा दसरा मेळावा झाला. दोन्ही गटाकडून एकोमेंकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. त्यानंतर आता शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी उद्धव ठाकरेंचे सर्व आरोप खोडून काढत त्यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. आम्ही बाहेर का पडलो? बाळासाहेबांचे विचार घेऊन का पुढे जात आहोत? याचा विचार उद्धव ठाकरेंनी करावा असं प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हटले सरनाईक?

आपली मंत मांडण्याचा अधिकार सर्वांना आहे. मात्र त्यांनी हा विचार करावा की आम्ही बाहेर का पडलो, बाळासाहेबांचे विचार आम्ही पुढे घेऊन का जात आहोत.

मी 9  जून 2021 रोजी त्यांना एक पत्र पाठवलं होतं. मी त्या पत्रात म्हटलं होतं की काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून शिवसेना संपवण्याचं काम सुरू आहे. मात्र माझ्या त्या पत्राची दखल घेण्यात आली नाही. त्यानंत हा उठाव झाल्याचं प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे.

कोणताही मेळावा खर्चाशिवाय होत नाही

सध्या शिंदे गटाकडून दसरा मेळाव्यावर केलेल्या खर्चाची जोरदार चर्चा सुरू आहे. याबाबत प्रताप सरनाईक यांना विचारले असता त्यांनी म्हटलं की, कोणताही मेळावा हा खर्चाशिवाय होत नाही. आमच्याकडे 40 आमदार आहेत, 12 खासदार आहेत, असंख्य कार्यकर्ते आहेत या सर्वांनी मिळून हा खर्च केला आहे. शिवाजी पार्कवर झालेला मेळाव्यासाठी खर्च झालाच नाही का असा सवालही सरनाईक यांनी उपस्थित केला आहे.

Follow Us
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी राज-उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी