AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Uddhav Thackeray : ऑगस्टमध्ये उद्धव ठाकरेंचा महाराष्ट्र दौरा, जबरदस्त कमबॅक करण्याच्या प्लॅनचे पाच मुद्दे, वाचा सविस्तर

सरकार पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांचा हा पहिलाच महाराष्ट्र दौरा असल्याने त्यांच्या या दौऱ्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष असणार आहे. उद्धव ठाकरे हे या दौऱ्यात पाच मुद्द्यांवर जास्त भर देण्याची शक्यता आहे.

Uddhav Thackeray : ऑगस्टमध्ये उद्धव ठाकरेंचा महाराष्ट्र दौरा, जबरदस्त कमबॅक करण्याच्या प्लॅनचे पाच मुद्दे, वाचा सविस्तर
ऑगस्टमध्ये उद्धव ठाकरेंचा महाराष्ट्र दौरा, जबरदस्त कमबॅक करण्याच्या प्लॅनचे पाच मुद्दे, वाचा सविस्तरImage Credit source: TV9 Marathi
| Updated on: Jul 15, 2022 | 3:29 PM
Share

मुंबई : राज्यात यशस्वी झालेल्या बंडामुळे सध्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे राज्याच्या राजकारणातले किंग ठरले आहेत. त्यांनी अचानक ठाकरेंना (Uddhav Thackeray) धक्का देत फडणवीसांसोबत (Devendra Fadnavis) सरकार स्थापन करत सर्वांनाच जबरदस्त शॉक दिला. त्यानंतर शिवसेनेतले अनेक पदाधिकारी आणि नेते ही एकनाथ शिंदे गटाच्या वाटेवर असताना, अनेक पदाधिकारी नेते हे आधीच शिंदे गटात गेले असताना उद्धव ठाकरे हे पुन्हा पक्ष बांधणीसाठी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्र दौरा करणार असल्याची माहिती समोर आली आहे. सरकार पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांचा हा पहिलाच महाराष्ट्र दौरा असल्याने त्यांच्या या दौऱ्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष असणार आहे. उद्धव ठाकरे हे या दौऱ्यात पाच मुद्द्यांवर जास्त भर देण्याची शक्यता आहे. त्या पाच मुद्द्यांवरही एक नजर टाकूया…

  1. उद्धव ठाकरे यांच्या समोरचं पहिलं सर्वात मोठं आव्हान असणार आहे ते म्हणजे शिवसेनेतली सध्याची गळती रोखणे आणि पक्षाची पुन्हा बांधणी करणे. कारण सध्या पक्षातली पडझड काही केल्यात थांबायचं नाव घेत नाहीये.
  2. उद्धव ठाकरे यांच्या समोरचं दुसरं सर्वात मोठं आव्हान असणार आहे ते म्हणजे आगामी महापालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचं, काही महिन्यातच राज्यातल्या बड्या महापालिकांच्या निवडणुका लागत आहेत. तसेच अनेक नगरपंचायती, जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागत आहेत. त्यात शिवसेनेला पुन्हा जोमाने उतरवणे हे उद्धव ठाकरे यांचं टार्गेट असणार आहे.
  3. उद्धव ठाकरे यांच्या या महाराष्ट्र दौऱ्यात आणखी एक मोठी परीक्षा पणाला लागली आहे ती म्हणजे ग्राउंड वरचा शिवसैनिक नेमका कुणासोबत? एकनाथ शिंदे यांच्यासोबत? की उद्धव ठाकरे यांच्यासोबत? या प्रश्नाचे उत्तरही काहीसे उद्धव ठाकरे यांना या दौऱ्यात सापडणार आहे.
  4. उद्धव ठाकरे यांच्या समोरचं तिसरे सगळ्यात मोठं टार्गेट असणार आहे ते म्हणजे बंडखोरांना जागा दाखवून देण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे करणार आहेत. बंडखोरांची राजकीय कारकीर्द जास्त नाही अशी टीका वारंवार शिवसेना नेत्यांकडून होतेय आणि आगामी निवडणुकीत तेच दाखवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे करताना दिसून येतील असा अंदाज राजकीय पंडितांकडून वर्तवण्यात येत आहे.
  5. तसेच मी अजून मैदान सोडलं नाही, मी मैदानात आहे हे दाखवण्यासाठी हे उद्धव ठाकरे यांचा हा दौरा अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. तसेच उद्धव ठाकरे या दौऱ्यात तरुणाईला आकर्षित करतानाही दिसून येतील, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.