कुणी मुख्यमंत्रिपदाचा अमरपट्टा घालून आला नाही, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

उद्धव ठाकरे म्हणाले, “तुमच्या सर्वांचं मी अभिनंदन करतो. खूप काही अफवा सुरु आहेत त्यांच्यावर विश्वास ठेऊ नका. शिवसेनेकडे कोणताही प्रस्ताव आलेला नाही.

कुणी मुख्यमंत्रिपदाचा अमरपट्टा घालून आला नाही, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray on Devendra Fadnavis) यांनी सेना आमदारांचं अभिनंदन केलं. शिवसेनेच्या बैठकीत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची विधानसभा गटनेतेपदी निवड करण्यात आली. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत (Uddhav Thackeray on Devendra Fadnavis) नवनियुक्त आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी एकनाथ शिंदेंच्या नावाचा प्रस्ताव मांडला, त्याला अन्य आमदारांनी हात वर करुन अनुमोदन दिलं.

एकनाथ शिंदे यांच्या निवडीनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्व आमदारांना संबोधित केलं. उद्धव ठाकरे म्हणाले, तुमच्या सर्वांचं मी अभिनंदन करतो. खूप काही अफवा सुरु आहेत त्यांच्यावर विश्वास ठेऊ नका. शिवसेनेकडे कोणताही प्रस्ताव आलेला नाही. मीडियाच्या माध्यमातूम काही प्रस्ताव सुरु आहेत”.

यावेळी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सणसणीत टीकास्त्र सोडलं. कुणी मुख्यमंत्रीपदाचा अमरपट्टा घालून आला असल्याचं समजण्याचं कारण नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
‘मुख्यमंत्र्यांनी ते विधान करायला नको होतं’

“आपण मित्रपक्षाला शत्रूपक्ष मानत नाही. भाजप अध्यक्ष अमित शाहांबरोबर माझं जे ठरलंय ते करावं एवढंच माझं म्हणणं आहे. आम्ही स्थिर सरकार देऊ.  मुख्यमंत्र्यांनी दिवाळीदिवशी अनौपचारिक गप्पांमध्ये ‘ते’ वक्तव्य करायला नको होतं. मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर चर्चा फिस्कटलीय. पण मला खात्री आहे सगळं सुरळीत होईल. जे ठरलं त्याच्या सुईच्या टोकापेक्षा अधिक नको”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

मुख्यमंत्री काय म्हणाले होते

“पुढील 5 वर्ष आमचं सरकार स्थिर राहील.  कोणी काही बोललं तरी चिंता करण्याचं कारण नाही. मी मिळालेल्या जागांवर खुश आहे. अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदाचा फॉर्म्युला ठरलाच नव्हता, असा दावा करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला चांगलंच अडचणीत आणलं.

दिवाळी दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis informal chat) यांनी अनौपचारिक गप्पादरम्यान, अनेक औपचारिक बाबी पत्रकारांसोबत शेअर केल्या. मी 5 वर्ष मुख्यमंत्री राहिल याबाबत काही शंका नाही. आमचा ए प्लॅन आहे त्यामुळे बी प्लॅनची गरज नाही, असंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या  

मी 5 वर्ष मुख्यमंत्री राहील याबाबत काहीही शंका नाही : देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ विधानानंतर शिवसेना-भाजपची बैठक रद्द  

शिवसेना की भाजप, कोण खोटं बोलतंय? लोकसभेपूर्वी कोणता फॉर्म्युला ठरला?

मुख्यमंत्री म्हणाले 50-50 ठरलंच नाही, संजय राऊत यांनी ‘तो’ व्हिडीओच लावला

मीच मुख्यमंत्री, आदित्यला काय ते शिवसेना ठरवेल, मुख्यमंत्र्यांची महत्त्वाची 10 विधाने

अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदाचा फॉर्म्युला ठरलाच नव्हता : मुख्यमंत्री

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI