उजनीचे पाणी तापले, जयंत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करा, अन्यथा…

जयंत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी केली आहे. (Ujani Dam Water Dispute)

उजनीचे पाणी तापले, जयंत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करा, अन्यथा...
उजनी नदीपात्र
Follow us
| Updated on: May 27, 2021 | 1:00 PM

पंढरपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंधारण मंत्री जयंत पाटील यांनी उजनी जलाशयातून इंदापूर तालुक्याचा पाच टीएमसी पाणी देण्याचा निर्णय रद्द केला. मात्र अद्याप याचा अध्यादेश काढण्यात आलेला नाही. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. त्यामुळे याविरोधात जयंत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी केली आहे. (Ujani Dam Water Dispute File a case against Jayant Patil demand from Farmers Association)

आंदोलनाची दखल घेऊन अध्यादेश रद्द

उजनी धरणातून इंदापूर तालुक्यातील 22 गावांच्या पिण्याच्या पाण्यासाठी पाच टीएमसी पाणी मंजूर केलेला अध्यादेश रद्द करा, या मागणीसाठी जनहित शेतकरी संघटनेकडून उजनी धरण परिसरातील भिमानगर येथे 16 दिवसांपासून आंदोलन करत आहोत. त्या आंदोलनाची दखल घेऊन राज्याचे जलसंधारण मंत्री जयंत पाटील यांनी 19 मे रोजी पाच टीएमसी पाण्याचा अध्यादेश रद्द केला होता. याबाबतची माहिती सोशल मीडियातून देण्यात आली.

सात दिवस उलटून नवा अध्यादेश नाही 

मात्र सात दिवस उलटून गेल्यानंतरही अद्याप राज्य सरकारकडून उजनी संदर्भातील अध्यादेश काढण्यात आलेला नाही. त्यामुळे जयंत पाटील यांनी सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. यामुळे त्यांच्या विरोधात त्वरित टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात येत आहे. या मागणीचे निवेदन टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक केंद्रे यांच्याकडे देण्यात आले आहे.

अन्यथा जयंत पाटील यांच्या बंगल्यात घुसू 

जयंत पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा, अन्यथा जनहित शेतकरी संघटना गनिमी काव्याने मंत्रालय किंवा त्यांच्या बंगल्यात घुसल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी राज्य शासनाला दिला आहे.

नेमकं प्रकरण काय?

सोलापूरच्या उजनी धरणातील 5 टीएमसी पाणी इंदापूरला वळवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. उजनीतून पाणी उचलून इंदापुरात नेण्यासाठी लाकडी निंबोळी योजनेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंजुरी दिली आहे. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्तक्षेपामुळेच हे पाणी वळवण्यात आल्याचं सांगितलं जात होतं. त्याला सोलापूरकरांनी विरोध केला.

संबंधित बातम्या : 

उजनीचा पाणीप्रश्न पेटला, जयंत पाटलांच्या पुतळ्याचे दहन, पवारांच्या घराबाहेर सुरक्षेत वाढ

उजनीच्या पाण्याचा वाद: इंदापूरमध्ये टायर जाळून रास्ता रोको तर पंढरपूरमध्ये आनंदोत्सव

उजनीच्या धरणातील पाण्याचा आदेश रद्द, जलसंपदा मंत्री जयंत पाटलांचा निर्णय

सोलापूरचं पाणी आधी बारामती, आता इंदापूरला पळवलं, राष्ट्रवादी पाणी चोर, भाजपचा हल्ला; वाचा काय आहे वाद

Non Stop LIVE Update
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.