पराभव राहुल गांधींचा, राजीनामा यूपीचे प्रदेश अध्यक्ष आणि अमेठीच्या जिल्हाध्यक्षाचा

लखनऊ : लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला पुन्हा एकदा मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवामुळे काँग्रेसमध्ये मोठी उलथापालथ बघायला मिळत आहे. देशासह उत्तर प्रदेशातही काँग्रेसचा दारुण पराभव झाला. तर अमेठी जो काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो तिथेही काँग्रेस हरली. उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसच्या पराभवाची जबाबदारी घेत प्रदेश अध्यक्ष राज बब्बर यांनी त्यांचा राजीनामा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना …

Congress Rahul Gandhi, पराभव राहुल गांधींचा, राजीनामा यूपीचे प्रदेश अध्यक्ष आणि अमेठीच्या जिल्हाध्यक्षाचा

लखनऊ : लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला पुन्हा एकदा मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवामुळे काँग्रेसमध्ये मोठी उलथापालथ बघायला मिळत आहे. देशासह उत्तर प्रदेशातही काँग्रेसचा दारुण पराभव झाला. तर अमेठी जो काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो तिथेही काँग्रेस हरली. उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसच्या पराभवाची जबाबदारी घेत प्रदेश अध्यक्ष राज बब्बर यांनी त्यांचा राजीनामा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना पाठवला आहे. दुसरीकडे अमेठीतून स्वत: राहुल गांधी निवडणुकीच्या रिंगणात होते. मात्र इथेही काँग्रेस हरली. त्यामुळे अमेठीच्या काँग्रेस जिल्हा अध्यक्ष योगेश मिश्रा यांनी या पराभवाची जबाबदारी घेत त्यांनीही राजीनामा राहुल गांधींना पाठवला आहे. तर लोकसभा आणि विधानसभेत पक्षाच्या खराब प्रदर्शानामुळे ओदिशाच्या प्रदेश अध्यक्ष निरंजन पटनायक यांनीही राजीनामा दिला आहे.

उत्तर प्रदेशात काँग्रेस केवळ एक जागा जिंकू शकली. फतेहपूर सिक्री येथून काँग्रेस उमेदवार असलेले राज बब्बर यांनाही पराभवाचा सामना करावा लागला. भाजप उमेदवार राजकुमार चाहर यांनी राज बब्बर यांना तीन लाखापेक्षा जास्त मतांनी पराभूत केलं. काँग्रेसने राज बब्बर यांना पहिले मुरादाबाद या मतदार संघातून तिकीट देण्याचा विचार केला होता, मात्र राज बब्बर यांनी मुरादाबाद येथून निवडणूक लढण्यास नकार दिला होता.

त्यानंतर राज बब्बर यांना फतेहपूर सिक्री येथून निवडणूकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं. तर भाजपने या मतदारसंघात विद्यमान खासदार चौधरी बाबूलाल यांना तिकीट न देता राजकुमार चाहर यांना राज बब्बर विरोधात उभं केलं. चौधरी बाबूलाल यांनी या निर्णयाचा विरोध केला होता. तेव्हा भाजपच्या निर्णयामुळे पक्षाला नुकसान हेऊ शकतं असं मानलं जात होतं. मात्र, निकाल काही वेगळेच लागले.

राज बब्बरने ट्वीट केलं की, “जनतेचा विश्वास मिळवण्यासाठी विजेत्यांना शुभेच्छा. यूपी काँग्रेसचे निकाल निराशाजनक आहेत. जबाबदारीला यशस्वीपणे पार न पाडण्यासाठी मी स्वत:ला जबाबदार समजतो. अध्यक्षांना भेटून मी माझा पक्ष ठेवील.”


अमेठीतच्या जिल्हाध्यक्षांचा राजीनामा

अमेठी हा काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो. मात्र, यंदाच्या निवडणुकीत अमेठीने काँग्रेसविरोधात निर्णय देऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. अमेठीत काँग्रेस उमेदवार राहुल गांधी यांना भाजपच्या स्मृती इराणींचं आव्हानं होतं. प्रत्येकवेळी काँग्रेसच्या बाजूने निर्णय देणाऱ्या अमेठीच्या जनतेने यावेळी भाजपवर विश्वास दाखवला आणि स्मृती इराणी या जिंकून आल्या. राहुल गांधी यांच्या या पराभवाची जबाबदारी जिल्हा अध्यक्ष योगेश मिश्रा यांनी घेतली. त्यांनीही त्यांचा राजीनामा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना पाठवला आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *