Sudhir Mungantiwar : ‘वंदे मातरम’वरुन वाद पेटणार? रझा अकादमीच्या आक्षेपावर मंत्री सुधीर मुनगंटीवारांचं प्रत्युत्तर

रझा अकादमीचे सईद नुरी यांनी सरकारच्या निर्णयाला विरोध दर्शवत आमच्यात फक्त अल्लाहची पूजा करतात. म्हणून त्याऐवजी सरकारने काही दुसरा पर्याय द्यावा जो सर्वाना मान्य असेल. याबाबत आम्ही उलेमा आणि इतर संबंधितांशी चर्चा करून सरकारला पत्र लिहिणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. रझा अकादमीच्या आक्षेपाला आता मुनगंटीवार यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे.

Sudhir Mungantiwar : 'वंदे मातरम'वरुन वाद पेटणार? रझा अकादमीच्या आक्षेपावर मंत्री सुधीर मुनगंटीवारांचं प्रत्युत्तर
सुधीर मुनगंटीवारImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Aug 15, 2022 | 4:14 PM

मुंबई : महाराष्ट्रातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी आणि कर्मचारी फोनवर हॅलो न म्हणता वंदे मातरम् (Vande Mataram) म्हणत संभाषणाला सुरुवात करतील, अशी घोषणा वन आणि सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी केलीय. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मुनगंटीवार यांनी ही घोषणा केली आहे. मात्र, त्यांच्या या घोषणेवरुन आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झालीय. कारण मुनगंटीवारांची या घोषणेला रझा अकादमीने (Rajha Akadami) विरोध दर्शवला आहे. रझा अकादमीचे सईद नुरी यांनी सरकारच्या निर्णयाला विरोध दर्शवत आमच्यात फक्त अल्लाहची पूजा करतात. म्हणून त्याऐवजी सरकारने काही दुसरा पर्याय द्यावा जो सर्वाना मान्य असेल. याबाबत आम्ही उलेमा आणि इतर संबंधितांशी चर्चा करून सरकारला पत्र लिहिणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. रझा अकादमीच्या आक्षेपाला आता मुनगंटीवार यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे.

देशप्रेमी नागरिकांचा अधिकार रझा अकादमी नाकारू शकते का?

वंदे मातरम् वर व्यक्त होण्याचा रझा अकादमीला जसा अधिकार आहे. तसाच देशप्रेमी नागरिकांना वंदे मातरम म्हणण्याचाही अधिकारी आहे. मग देशप्रेमी नागरिकांचा अधिकार रझा अकादमी नाकारू शकते का? असा सवाल सुधीर मुनगंटीवार यांनी केलाय. मुनगंटीवार यांच्या या प्रश्नाला आता रझा अकादमीकडून काय उत्तर दिले जाते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सुधीर मुनगंटीवारांचा नेमका शासन आदेश काय?

वंदे मातरम् हे आपले राष्‍ट्रगान आहे. हा केवळ एक शब्‍द नसून भारतीयांच्‍या भारतमातेविषयीच्या भावनांचे प्रतिक आहे. 1875 मध्‍ये बंकीमचंद्र चटर्जी यांनी लिहिलेले हे गीत त्‍याकाळात स्‍वातंत्र्यासाठी लढणाऱ्यांना उर्जा देण्‍याचं काम करत होते. ‘हे माते मी तुला प्रणाम करतो’ अशी भावना व्‍यक्‍त करत बंकीमचंद्रांनी मनामनात देशभक्‍तीचे स्‍फुल्‍लींग चेतविले. भारतीय मनाचा मानबिंदू असलेल्‍या या रचनेतील एकेक शब्द उच्‍चारताच देशभक्‍तीची भावना जागृत होते. भारतीय स्‍वातंत्र्याच्‍या अमृत महोत्‍सवी वर्षात आपण हॅलो हा विदेशी शब्‍द त्‍यागत त्‍याऐवजी शासकीय कार्यालयांमध्‍ये यापुढे वंदे मातरम् म्‍हणत संभाषण सुरु करणार आहोत. 1800 साली टेलिफोन अस्‍तित्‍वात आल्‍यापासून आपण हॅलो या शब्‍दाने संभाषण सुरु करतोय. आता हॅलो ऐवजी वंदे मातरम् ने संभाषण सुरु करण्‍याचा निर्णय सांस्‍कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केले आहे.

राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप आज जाहीर केले. मंत्रिमंडळ विस्तारानंतर तीन दिवसांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खातेवाटप केले. यात भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांना वन, सांस्कृतिक विभाग आणि मत्स व्यवसाय विभागाचे मंत्रिपद देण्यात आले आहे. खातेवाटप जाहीर झाल्यानंतर मुनगंटीवार यांनी शासकीय कार्यालयांमध्ये वंदे मातरम् म्‍हणत संभाषणाला सुरुवात करण्याची घोषणा केली.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.