AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rida Rashid : ‘भाजप म्हणून मला कमी ओळखतात, खरी तर…’ विनयभंगाची तक्रार करणाऱ्या रीदा राशीद म्हणाल्या

जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात विनयभंगाची तक्रार करणाऱ्या रीदा राशीद यांनी घेतली पत्रकार परिषद, पाहा काय म्हणाल्या

Rida Rashid : 'भाजप म्हणून मला कमी ओळखतात, खरी तर...' विनयभंगाची तक्रार करणाऱ्या रीदा राशीद म्हणाल्या
रीदा राशीद, जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाची तक्रार करणारी महिलाImage Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Nov 14, 2022 | 1:53 PM
Share

मुंबई : राष्ट्रवादी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात विनयभंगाची (Jitendra Awhad Resign) तक्रार देणाऱ्या रीदा राशीद (Rida Rashid) यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेतून त्यांनी जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्यावर विनयभंग केल्याप्रकरणी तक्रार का दिली, हे स्पष्ट केलं. दरम्यान, या तक्रारीवरुन आता राजकारणही सुरु झालंय. रीदा राशीद या भाजपच्या आहेत. भाजपकडूनच हे सगळं प्रकरण वाढवलं गेलं का, असाही एक प्रश्न उपस्थित केला जातोय. त्यावरही रीदा राशीद यांनी आपलं सविस्तर म्हणणं मांडलं.

‘मी भाजपची जरी असले, तरी भाजप म्हणून मला कमी लोकं ओळखतात, माझी खरी ओळख एक सामाजिक संस्था चालवणारी महिली, अशी आहे’, असं रीदा राशीद यांनी यावेळी म्हटलं. भाजप कार्यालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

पाहा व्हिडीओ :

रीदा राशीद या मुंब्रा कळवा भागात एक सामाजिक संस्था चालवतात. या भागातील लोकं एक सामाजिक कार्य करणारी आणि एक एनजीओ चालणारी महिला म्हणूनच मला जास्त ओळखतात, असंही राशीद यांनी यावेळी नमूद केलं.

जितेंद्र आव्हाड यांनी मला दोन्ही हाताने धरुन पुरुषांवर ठकललं, या आरोपाचाही राशीद यांनी पुनरुच्चार केला. त्यामुळे मी अवघडले होते, असं म्हणत त्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या कृतीचा निषेध केला.

जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात दाखल झालेल्या विनयभंगाच्या गुन्ह्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून काही व्हिडीओ व्हायरल केल्याचाही दावा केला जातोय.

यातील एका व्हिडीओत रीदा राशीद स्वतः दादागिरी करताना दिसल्यात. तर दुसऱ्या व्हिडीओ जितेंद्र आव्हाड आणि रीदा राशीद एका मंचावर दिसून आलेत. यावेळी जितेंद्र आव्हाड हे चक्क रीदा राशीद यांची तारीफ करताना दिसलेत.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओवरुनही राशीद यांना पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला. मात्र त्यावर त्यांनी भाष्य करणं टाळलं. योग्य वेळी व्हायरल केल्या जाणाऱ्या व्हिडीओवर बोलेन, असं त्या म्हणाल्या.

आता महिला आयोगानेही आपल्यासोबत घडलेल्या प्रसंगाची दखल घ्यावी, असंही राशीद यांनी म्हटलं. तर सुप्रिया सुळे यांना टोला लगावत, राष्ट्रवादी पक्षामध्येही महिलांना असच बाजुला केलं जातं का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

शेवटी बाप हा बाप असतो! उदय सामंत यांचं ते विधान चर्चेत
शेवटी बाप हा बाप असतो! उदय सामंत यांचं ते विधान चर्चेत.
सुरेश धसांकडून तीन हल्ले! मेहबूब शेख यांचा गंभीर आरोप
सुरेश धसांकडून तीन हल्ले! मेहबूब शेख यांचा गंभीर आरोप.
इंडिगोला दणका! डीजीसीएची कारणे दाखवा नोटीस
इंडिगोला दणका! डीजीसीएची कारणे दाखवा नोटीस.
तो एक व्हिजन असलेला प्रतिनिधी! शिंदेंकडून लेकाचं कौतुक
तो एक व्हिजन असलेला प्रतिनिधी! शिंदेंकडून लेकाचं कौतुक.
सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार
सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार.
रवींद्र चव्हाणांशी चर्चेनंतर शिंदेंची आक्रमक देहबोली!
रवींद्र चव्हाणांशी चर्चेनंतर शिंदेंची आक्रमक देहबोली!.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.