Video : नेतेमंडळींसाठी मोबाईल सर्वात मोठी अडचण! सुप्रिया सुळेंनाही का वाटतेय भीती?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनीच जाहीर भाषणात वक्तव्य केलंय. अनेक कार्यकर्ते मोबाईल घेऊन चित्रिकरण (Mobile Shooting) करत असतात. त्यामुळे मन कुठे मन मोकळंच करता येत नाही, असं सुप्रियाताई म्हणाल्या.

Video : नेतेमंडळींसाठी मोबाईल सर्वात मोठी अडचण! सुप्रिया सुळेंनाही का वाटतेय भीती?
सुप्रिया सुळे, खासदार, राष्ट्रवादी काँग्रेस
Follow us
| Updated on: Jan 29, 2022 | 7:14 PM

पुणे : एखादा नेता आपल्या मतदारसंघात, कार्यकर्त्यांसोबत काहीतरी बोलत असतो. त्याचा व्हिडीओ दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी बाहेर येतो आणि तो मोठ्या अडचणीत सापडतो. याचंच ताजं उदाहरण म्हणजे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole). भंडाऱ्यातील एका गावात नाना तथाकथित गावगुंड मोदीबाबत काहीतरी बोलले आणि अख्खी भाजप त्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरली! सांगायचा मुद्दा हा की मोबाईल हा जेवढा सोयीचा तेवढाच तो अडचणीचा ठरतोय. त्याबाबत खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनीच जाहीर भाषणात वक्तव्य केलंय. अनेक कार्यकर्ते मोबाईल घेऊन चित्रिकरण (Mobile Shooting) करत असतात. त्यामुळे मन कुठे मन मोकळंच करता येत नाही, असं सुप्रियाताई म्हणाल्या.

नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

एका कार्यक्रमाच्या निमित्ताने खासदार सुप्रिया सुळे मावळमधील देहू इथं व्यासपीठावरुन बोलत होत्या. ‘कालच मला कुणीतरी गमतीनं सांगितलं. आता मी त्यांचं नाव घेणार नाही. आपली महाराजांची पालखी ज्या रस्त्याने जाते त्याच दौंड रस्त्याने मी जात होते. ट्राफिक जॅम झाला. मला सवय आहे की मतदारसंघात काय झालं असेल तर उतरुन बघायची. लोकांच्या गाठीभेठीही होतात आणि प्रश्नही समजतो की नेमकं काय चाललंय. त्यावेळी आपल्याच पक्षाचे एक गृहस्थ… आपल्या पक्षात होते, ते येत होते. आता शहर सांगू की नको मी द्विधा मनस्थितीत आहे. सांगूनच टाकते घरचेच लोक आहेत. प्रॉब्लेम काय आहे भाषण करायला आजकाल हे सगळंच सारखं असतंय (मोबाईलवरुन चित्रिकरण करणाऱ्यांकडे हात करुन). त्यामुळे मन कुठे मोकळंच करता येत नाही इच्छा असली तरी. घरात पण अडचण आहे. घरात मदत करणाऱ्यांनी फोन लावला तर मी आणि सदानंद काय बोलतोय ते ही बाहेर जायचं. आता काय बोलावं सगळी अडचण झालीय’, अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी मोबाईलमुळे नेतेमंडळींसमोर कशाप्रकारे अडचण निर्माण झाली आहे ते बोलून दाखवलं. सुप्रिया सुळे यांच्या या वक्तव्यानंतर उपस्थितांमध्ये मात्र चांगलाच हशा पिकला होता.

सायबर तज्ज्ञांचाही पुढाऱ्यांना मोलाचा सल्ला

नेत्यांच्या व्हायरल झालेल्या ॲाडीओ, व्हिडीओ क्लीप त्यांच्यासाठी अडचणीच्या ठरत आहेत. गेल्या काही काळात राज्यातील आणि देशातील अनेक नेत्यांच्या क्लिप व्हायरल झाल्या आणि त्या वाऱ्याच्या वेगानं सोशल माध्यमात फिरत राहिल्या. याचा फटका त्या नेत्यांना बसला. त्याचबरोबर त्यांच्या वक्तव्यामुळे समाजात तणाव निर्माण झाल्याचेही उदाहरणं आहेत. त्यामुळे नेते, पुढारी, मंत्री, आमदार, खासदार अशा मंडळींनी बोलताना काळजी घेणं गरजेचं आहे. काही वेळा लोकांशी संवाद साधताना नेते आपल्या बोलीभाषेत बोलतात, त्याचे दुसऱ्या ठिकाणी वेगळे अर्थ होतात. तसंच दुसऱ्या नेत्यांबाबत किंवा महिलांबाबत असंसदीय वक्तव्य केलं जातं. असं विवादीत वक्तव्य कुणी चोरुन मोबाईलवर रेकॅार्ड केलं आणि ते सोशल मिडियावर व्हायरल झाल्यास, संबंधित नेत्याला त्याचा फटका बसू शकतो, त्यामुळे नेत्यांनो तोलून मापून बोला, असा सल्ला नागपुरातील सायबर तज्ज्ञ अजित पारसे यांनी नेतेमंडळींना दिलाय.

नाना पटोले मोबाईल चित्रिकरणामुळेच आले अडचणीत!

नाना पटोले यांचा एक व्हिडीओ 17 जानेवारी रोजी समोर आला होता. या व्हिडीओमध्ये पटोले मोदीबाबत बोलत असल्याचं पाहायला मिळतं. “मी का भांडतो? मी आता मागील 30 वर्षापासून राजकारणात आहे. लोकं पाच वर्षात आपल्या एका पिढीचा उद्धार करुन टाकतात. शाळा, कॉलेज हे करुन आपल्या एक-दोन पिढीचा उद्धार करुन टाकतात. मी एवढ्या वर्षाच्या राजकारणात एक शाळा नाही घेतली. एक ठेकेदारी नाही केली. जो आला त्याला मदत करतो. म्हणून मी मोदीला मारु शकतो, त्याला शिव्या देऊ शकतो आणि म्हणून मोदी माझ्या विरोधात प्रचाराला आला. एक प्रमाणिक नेतृत्व तुमच्या इथे आहे….”असं आक्षेपार्ह आणि वादग्रस्त वक्तव्य नाना पटोले यांनी केल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला आणि ऐकायला मिळत आहे. या वक्तव्यामुळे नाना पटोले चांगलेच वादात सापडले होते.

इतर बातम्या :

‘ओल्ड मॅन इन वॉर’ पवारांची कन्या, बापासारखीच कणखर, राष्ट्रीय राजकारणात रस; पण लक्ष महाराष्ट्रात; वाचा सविस्तर

झेपत नसेल तर राजीनामा द्या, पुण्याच्या महापौरांवर सुप्रिया सुळे कडाडल्या

VIDEO: भाजपकडून ईडी, सीबीआयच्या धमक्या, सुप्रिया सुळे का म्हणाल्या ईडीच्या कारवायांचं स्वागत?; वाचा सविस्तर

Non Stop LIVE Update
... आम्हाला गाफील ठेवलं गेलं, अजितदादांचा त्या गुप्तभेटीवर गौप्यस्फोट
... आम्हाला गाफील ठेवलं गेलं, अजितदादांचा त्या गुप्तभेटीवर गौप्यस्फोट.
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी या जागा लढवणार, अजित दांदानी थेट म्हटलं..
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी या जागा लढवणार, अजित दांदानी थेट म्हटलं...
छगन भुजबळ यांच्या जीवाला धोका? सलग आले १२ धमकीचे मॅसेज अन्...
छगन भुजबळ यांच्या जीवाला धोका? सलग आले १२ धमकीचे मॅसेज अन्....
मुख्यमंत्र्यांसंबंधित प्रकरणात दत्ता दळवींना जामीन, का झाली होती अटक?
मुख्यमंत्र्यांसंबंधित प्रकरणात दत्ता दळवींना जामीन, का झाली होती अटक?.
मोदी Vs गांधींची लढाई, ५ राज्यांच्या निकालाआधीचा Exit Poll काय सांगतो
मोदी Vs गांधींची लढाई, ५ राज्यांच्या निकालाआधीचा Exit Poll काय सांगतो.
छगन भुजबळ यांचा थेट शरद पवार यांनाच सवाल; थेट म्हणाले...
छगन भुजबळ यांचा थेट शरद पवार यांनाच सवाल; थेट म्हणाले....
असला बुके कधी पाहिलाय? अजितदादांना १,३६९ गुलाबांच्या फुलांचा गुच्छ खास
असला बुके कधी पाहिलाय? अजितदादांना १,३६९ गुलाबांच्या फुलांचा गुच्छ खास.
२०२४ ला भाजपपासून भारताला मुक्ती मिळणार, संजय राऊत यांची जहरी टीका काय
२०२४ ला भाजपपासून भारताला मुक्ती मिळणार, संजय राऊत यांची जहरी टीका काय.
जरांगेंच्या दौऱ्याचा चौथा टप्पा, सभेची जय्यत तयारी, अवघं जालना भगवंमय
जरांगेंच्या दौऱ्याचा चौथा टप्पा, सभेची जय्यत तयारी, अवघं जालना भगवंमय.
गुणरत्न सदावर्तेंना सर्वात मोठा झटका, ST कर्मचारी बँकेतील 17 संचालक...
गुणरत्न सदावर्तेंना सर्वात मोठा झटका, ST कर्मचारी बँकेतील 17 संचालक....