वडेट्टीवारांच्या वक्तव्याने नवी चर्चा, दुसऱ्या टर्ममध्ये राष्ट्रवादीला मुख्यमंत्रिपद मिळण्याची चिन्हं

विजय वडेट्टीवार म्हणाले, “सरकार स्थापनेबाबत सकारात्मक वाटचाला सुरु आहे त्यानिमित्ताने बैठका सुरु आहेत. सरकार बनतंय हे सकारात्मक आहे. किमान समान कार्यक्रमावर चर्चा होईल. तीनही पक्ष बसून चर्चा करतील”

वडेट्टीवारांच्या वक्तव्याने नवी चर्चा, दुसऱ्या टर्ममध्ये राष्ट्रवादीला मुख्यमंत्रिपद मिळण्याची चिन्हं

नवी दिल्ली :  राजधानी दिल्लीत महाराष्ट्रातील सत्तास्थापनेच्या घडामोडी घडत आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीची काल पाच तास बैठक झाल्यानंतर आज पुन्हा बैठक होणार आहे. आधी दोन्ही पक्षांची स्वतंत्र आणि नंतर एकत्र बैठक होणार आहे. काँग्रेस कार्यकारिणीची (Vijay Wadettiwar on Maharashtra CM formula ) बैठक सकाळी साडेदहाच्या सुमारास सुरु झाली. या बैठकीसाठी काँग्रेस नेते अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, नसीम खान, नितीन राऊत, मल्लिकार्जुन खर्गे, के सी वेणूगोपाल, बाळासाहेब थोरात हे उपस्थित आहेत.

या बैठकीला पोहोचण्यापूर्वी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी टीव्ही 9 मराठीशी संवाद साधला.  विजय वडेट्टीवार म्हणाले, सरकार स्थापनेबाबत सकारात्मक वाटचाला सुरु आहे त्यानिमित्ताने बैठका सुरु आहेत. सरकार बनतंय हे सकारात्मक आहे. किमान समान कार्यक्रमावर चर्चा होईल. तीनही पक्ष बसून चर्चा करतील”

यावेळी वडेट्टीवार यांना मुख्यमंत्रीपद, उपमुख्यमंत्रीपद आणि मंत्रिपदाच्या वाटपाबाबत विचारण्यात आलं.

मुख्यमंत्रिपद नेमकं कोणाकडे असावं, अडीच-अडीच वर्ष राष्ट्रवादी आणि काँग्रेस म्हणतंय, काँग्रेसकडे उपमुख्यमंत्रिपद अशी चर्चा आहे, असं वडेट्टीवार यांना विचारण्यात आलं. त्यावर वडेट्टीवार म्हणाले, “पहिल्या टर्ममध्ये शिवसेनेकडे असावं अशी चर्चा आहे. आणि या संदर्भात कुणाकडे किती कालावधी असावा मला वाटतं हे राष्ट्रवादी चांगल्यापद्धतीने सांगू शकते”

वडेट्टीवार यांच्या या उत्तरामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये मुख्यमंत्रिपदावरुन वाटाघाटी सुरु आहेत का अशी चर्चा पुन्हा जोर धरु लागली आहे. पहिल्या टर्ममध्ये शिवसेनेकडे मुख्यमंत्रिपद म्हणजे दुसऱ्या टर्ममध्ये राष्ट्रवादीकडे मुख्यमंत्रिपद असेल का अशी विचारणा होणं साहजिक आहे. म्हणजे शिवसेनेला अडीच आणि राष्ट्रवादीला अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद मिळण्याची चिन्हं आहे.

राष्ट्रवादीला अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा योग्य नाही : संजय राऊत

राष्ट्रवादीला अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद देण्याविषयी आमच्याकडे कोणतीही माहिती नाही. ही चर्चा योग्य नसून त्यातून काहीही निष्पन्न होणार नाही, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. हिवाळी अधिवेशनानिमित्त दिल्लीत गेलेल्या राऊतांनी राजधानीतूनही पत्रकार परिषद घेण्याचा शिरस्ता (Sanjay Raut on NCP CM) कायम ठेवला आहे.

राष्ट्रवादीचा प्रस्ताव, अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद?

राष्ट्रवादी काँग्रेसने यापूर्वीच शिवसेनेला मुख्यमंत्रिपदाबाबत प्रस्ताव दिला होता. राष्ट्रवादीच्या प्रस्तावानुसार मुख्यमंत्रिपद हे अडीच-अडीच वर्षांसाठी असेल. पहिली अडीच वर्षे शिवसेनेचा तर दुसरी अडीच वर्षे राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री असेल. उपमुख्यमंत्रिपद पाचही वर्षे काँग्रेसकडे राहील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रस्तावावर (NCP proposal to Shivsena for Government Formation) काय प्रतिसाद देते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

(Vijay Wadettiwar on Maharashtra CM formula)

संबंधित बातम्या 

राष्ट्रवादीला अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा योग्य नाही : संजय राऊत 

पहिली अडीच वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री, मग राष्ट्रवादीचा, 5 वर्ष काँग्रेसचा उपमुख्यमंत्री? 

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI