Violence In Bengal : ‘बंगालमध्ये वाघीण जिंकली म्हणणारे, हिंसाचाराच्या घटनेवर मुग गिळून गप्प’, प्रवीण दरेकरांचा शिवसेनेवर निशाणा

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शिवसेनेवर आणि पर्यायाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. बं

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 17:03 PM, 4 May 2021
Violence In Bengal : 'बंगालमध्ये वाघीण जिंकली म्हणणारे, हिंसाचाराच्या घटनेवर मुग गिळून गप्प', प्रवीण दरेकरांचा शिवसेनेवर निशाणा
विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा तृणमूल काँग्रेसची सत्ता आल्यानंतर तिथे मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरु आहे. निवडणूक निकालानंतर भाजप कार्यकर्त्यांच्या हत्या, त्यांच्या घरांवर हल्ला, घरांना आग लावणं, लूटमारीच्या अनेक घटना घडत आहे. या पार्श्वभूमीवर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शिवसेनेवर आणि पर्यायाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. बंगालमध्ये वाघीण जिंकली म्हणणारे हिंसाचाराच्या घटनेवर मुग गिळून गप्प आहेत, अशा शब्दात दरेकरांनी शिवसेनेवर टीका केलीय. (Praveen Darekar criticizes Shiv Sena on the backdrop of violence in West Bengal)

‘विचारांची लढाई विचारांनी लढली जावी,तिथे हिंसाचारास थारा नसावा! निवडणुकीनंतर बंगालमध्ये सुरू असलेला हिंसाचार अतिशय निंदनीय असून, हे थांबले पाहिजे! बंगालमध्ये वाघीण जिंकली म्हणणारे, हिंसाचाराच्या घटनेवर मुग गिळून गप्प आहेत! अशा घटनांचे समर्थन होऊ शकते का?’ असा सवाल दरेकर यांनी केलाय. त्याचबरोबर ‘बंगालमध्ये भाजपकडे गमावण्यासारखं काहीही नव्हतं! आज जेवढे आमदार निवडून आले आहेत, त्यामागे स्थानिक कार्यकर्त्यांचे समर्पन आहे. बंगालमध्ये वाढलेल्या जागा व मतांची वाढलेली टक्केवारी ही कार्यकर्त्यांना समर्पित आहे. परंतु ही हिंसा थांबली पाहिजे! जय श्रीराम!’ असं ट्विटही दरेकर यांनी केलंय.

उद्धव ठाकरेंकडून ममता बॅनर्जींचा वाघिणी म्हणून उल्लेख

“ममता बॅनर्जी या बंगाली जनतेच्या स्वाभिमानाचा लढा एकाकी लढत होत्या. त्यांच्या हिमतीला दाद द्यावीच लागेल. अखेर त्यांचा विजय झालाच आहे. या विजयाचे संपूर्ण श्रेय बंगालच्या या वाघिणीलाच द्यावे लागेल. पंतप्रधानांपासून गृहमंत्र्यांपर्यंत संपूर्ण केंद्र सरकार, राज्यांची सरकारे ममता दीदींच्या पराभवासाठी पश्चिम बंगालच्या भूमीवर एकवटली. त्या सर्व शक्तींची धूळदाण उडवत ममता दीदींनी विजय मिळवला. मी त्यांचे व हिंमतबाज पश्चिम बंगाली जनेतेचे मनापासून अभिनंदन करतो. आता राजकारण संपले असेल तर सगळ्यांनी मिळून कोरोनाविरुद्धच्या लढाईकडे लक्ष देऊया”, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली होती.

भाजपाध्यक्ष कोलकातामध्ये दाखल

दरम्यान, बंगाल हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा मंगळवारी कोलकाता इथं पोहोचले. हिंसाचाराबाबत चिंता व्यक्त करताना भाजप लोकशाही पद्धतीनेच तृणमूल काँग्रेसच्या अराजकतेचा सामना करेल आणि भाजप कार्यकर्त्यांचा मृत्यू व्यर्थ जाणार नाही, अशा शब्दात त्यांनी हिंसाचाराचा निषेध व्यक्त केलाय. नड्डा मंगळवारी दुपारी कोलकाता इथं पोहोचले. त्यानंतर त्यांनी भाजपचे केंद्रीय प्रभारी कैलास विजयवर्गीय, प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष, केंद्रीय सह प्रभारी शिवप्रकाश, माजी अध्यक्ष राहुल सिन्हा आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकुल रॉयसह राज्यातील अन्य नेत्यांसोबत चर्चा केली. त्यानंतर जे. पी. नड्डा भाजप कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी रवाना झाले.

संबंधित बातम्या :

बंगालनंतर भाजपला उत्तर प्रदेशातही झटका; पंचायत निवडणुकीत अखिलेशच्या सपाचा बोलबाला

West Bengal CM 2021: ममता बॅनर्जी यांची विधीमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड, 5 मे रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ

Praveen Darekar criticizes Shiv Sena on the backdrop of violence in West Bengal