‘हिंमत असेल तर धनगर, मुस्लिम समाजाला आरक्षण देऊन बघा’, मेटेंचा मुख्यमंत्री ठाकरेंना इशारा

उद्धव ठाकरे यांच्या भाषणात फक्त पोकळ गप्पा होत्या. हे सरकार कुणालाही न्याय देऊ शकत नाही, अशी टीका विनायक मेटेंनी उद्धव ठाकरेंवर केली.

'हिंमत असेल तर धनगर, मुस्लिम समाजाला आरक्षण देऊन बघा', मेटेंचा मुख्यमंत्री ठाकरेंना इशारा
विनायक मेटे, अध्यक्ष, शिवसंग्राम संघटना

पुणे : ‘हे सरकार कुणालाही न्याय देऊ शकत नाही’, असं म्हणत (Vinayak Mete Criticize CM Uddhav Thackeray) शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात झालेल्या शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी अनेक मुद्यांवर भाष्य केलं. मात्र, त्यांच्या भाषणात निव्वळ पोकळ गप्पा होत्या, असंही ते म्हणाले (Vinayak Mete Criticize CM Uddhav Thackeray).

“उद्धव ठाकरे यांच्या भाषणात फक्त पोकळ गप्पा होत्या. हे सरकार कुणालाही न्याय देऊ शकत नाही. तुमच्यात हिंमत असेल तर धनगर समाजाला, मुस्लिम समाजाला आरक्षण देऊन बघा”, असं आव्हान मेंटेनी महाविकास आघाडी सरकारला दिला आहे.

“मराठा आरक्षणाबाबत सरकारच्या भूमिकेबाबत मला शंका आहे. सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे पण ऐकत नाही. मग ऐकतंय तरी कुणाचं?”, असा सवालही मेंटेंनी सरकारला विचारला आहे.

“अन्यायग्रस्त विद्यार्थ्यांनी एकत्र सरकारविरोधात आवाज उठवला पाहिजे”, असंही ते म्हणाले. पुण्यात आज मराठा आरक्षण स्थगितीपूर्व नोकर भरती अन्यायग्रस्त विद्यार्थ्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते तेव्हा ते बोलत होते (Vinayak Mete Criticize CM Uddhav Thackeray).

दरम्यान, शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपर चौफेर टीका केली. मुख्यमंत्री झाल्यापासून अनेक जण सरकार पाडण्याच्या मागे आहेत, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर केला. तसेच हिम्मत असेल तर हे सरकार पाडून दाखवा असं आव्हानही त्यांनी विरोधकांना दिलं. त्यांनतर विरोधकांनाही ठाकरेंच्या टीकेला चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

Vinayak Mete Criticize CM Uddhav Thackeray

संबंधित बातम्या :

बाळासाहेबांचा वारस असल्याचे सिद्ध करा, अन्यथा खुर्ची सोडा; विनायक मेटेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

मुख्यमंत्रिपदासाठी राम मंदिर विरोधकांसमोर गुडघे टेकणाऱ्यांनी हिंदू धर्माची चेष्टा करु नये; किरीट सोमय्यांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार

उद्धव ठाकरे धमकी कोणाला देता; राणेंचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान