संसदेत कृषी कायदा मांडला तेव्हा शिवसेना तटस्थ, मग आता विरोध कसा? विनोद तावडेंचा सवाल

भाजप आणि मनसेची युती होईल का? या प्रश्नावर विनोद तावडेंनी मौन पाळलं. त्यासाठी अजून भरपूर वेळ अल्याचं सांगत त्यांनी प्रश्नाला उत्तर देणं टाळलं (Vinod Tawde slams Shiv Sena). 

संसदेत कृषी कायदा मांडला तेव्हा शिवसेना तटस्थ, मग आता विरोध कसा? विनोद तावडेंचा सवाल
Follow us
| Updated on: Dec 07, 2020 | 3:47 PM

रत्नागिरी : संसदेत कृषी कायदा मांडला तेव्हा त्याला पाठिंबा दिला गेला. त्यानंतर भूमिका कशी बदलते? काही पक्ष तटस्थ राहिले ते पक्ष आज विरोध कसा करु शकतात? असा सवाल करत भाजप नेते विनोद तावडे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. “आधीच्या सरकारमध्ये कायदा मांडताना काही लोकं सरकारमध्ये होते. मात्र, आज ते विरोध कसे करतात? असा जर विरोध असेल आणि त्यासाठी भारत बंदला पाठिंबा असेल तर या मुद्यावरून राजकारण केलं जातंय”, असं तावडे म्हणाले (Vinod Tawde slams Shiv Sena).

शिरोमणी अकाली दलाचे उपाध्यक्ष आणि खासदार प्रेमसिंग चंदू माजरा यांनी काल (7 डिसेंबर) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. याबाबत विनोद तावडे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी अकाली दल आणि शिवसेनेवर टीका केली. “पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीं आणि उद्धव ठाकरेंना भेटले होते, अगदी तशाच प्रकारची ही भेट आहे. विरोधी पक्षाला मोदी सरकारला विरोधी करायला संधी मिळत नाही. एखादी संधी आली तर त्यात आपल्याला कसं जाता येईल हे पहाण्याचा दोन्ही पक्षांचा प्रयत्न आहे. मात्र जनता जनार्दन फायनल आहेत. शेवटी काय करायचं ते जनता ठरवेल”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस सुरु असल्याचा दावा केला आहे. मात्र, त्यांच्या या दाव्यात तथ्य नसल्याचं तावडे म्हणाले. “गेहलोत यांचा हा गौप्यस्फोट नाही. गौप्यस्फोट करण्यासाठी पुरावे लागतात. राजकीय नेते आणि विरोधक अशी वक्तव्ये करत असतात”, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं.

दरम्यान, भाजप आणि मनसेची युती होईल का? या प्रश्नावर विनोद तावडेंनी मौन पाळलं. त्यासाठी अजून भरपूर वेळ अल्याचं सांगत त्यांनी प्रश्नाला उत्तर देणं टाळलं (Vinod Tawde slams Shiv Sena).

“घटनेप्रमाणे केंद्राने केलेला कायदा राज्याला लागू असतो. राज्याला त्यापेक्षा कडक करायचा असेल तर राज्य सरकार कायदा बदलू शकतं. हे अधिकार घटनेने नेमून दिलेले अधिकारी आहेत. कायद्यात बदल करायचे असतील तर राष्ट्रपतींची अनुमती मिळते”, असं तावडे म्हणाले.

राज्यातील विधान परिषदेच्या सहा जागांच्या निवडणुकीत भाजपचा पराभव झाला. यावरदेखील तावडेंनी प्रतिक्रिया दिली. “पराभव एक झाला तरी सर्वच संपले किंवा त्यांच्या बाजूनी सर्व आहे असं नाही. थोडंफार मागे-पुढे होतं. याशिवाय त्यातून नवीन गोष्टी चांगल्या पद्धतीने उभ्या राहतील. महाविकास आघाडीची तीन पक्षांची ताकदीचाअंदाज चुकला हे फडणवीसांचे म्हणणे बरोबर आहे”, असं विनोद तावडे म्हणाले.

हेही वाचा :

FARMER PROTEST | कृषी कायद्यावर विरोधी पक्षांची भूमिका दुतोंडी ? केंद्रीय कायदा मंत्र्यांचा हल्लाबोल 

FARMER PROTEST | शरद पवार ‘वाहत्या गंगेत’ हात धुवून घेतायत?

FARMER PROTEST | भाजपचा अजून एक मित्रपक्ष NDAतून बाहेर पडणार? 8 डिसेंबरनंतर निर्णय!

FARMER PROTEST | शेतकऱ्यांनी पुकारलेल्या ‘भारत बंद’ला काँग्रेस, टीआरएस आणि ‘आप’चा पाठिंबा

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.