Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्वात मोठी बातमी ! वाल्मिक कराडला अखेर मकोका; खूनाचा गुन्हा दाखल होणार?

आताची मोठी बातमी समोर येत आहे. वाल्मिक कराड याच्यावर मकोका लावण्यात आला आहे. त्याचा ताबा सीआयडीने मागितला आहे.

सर्वात मोठी बातमी ! वाल्मिक कराडला अखेर मकोका; खूनाचा गुन्हा दाखल होणार?
वाल्मिक कराडचा पाय खोलात
Follow us
| Updated on: Jan 15, 2025 | 3:46 PM

आताची मोठी बातमी समोर येत आहे. वाल्मिक कराड याच्यावर मकोका लावण्यात आला आहे. त्याचा ताबा सीआयडीने मागितला आहे. कराडचा ताबा मिळावा यासाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे. यामुळे वाल्मिक कराड याच्या अडचणीत वाढ झाली आहे.  मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात त्याचा ताबा मिळवण्यासाठी सीआयडीने कोर्टासमोर अर्ज दाखल केला आहे.

दरम्यान, वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आल्यानंतर आता सीआडीने कोर्टात अर्ज केला आहे. सीआयडीने खुनाच्या गुन्ह्यासाठी वाल्मिक कराडची चौकशी करायची आहे. त्यासाठी वाल्मिक कराडला ताब्यात द्या अशी विनंती सीआयडीने केली आहे. त्यामुळे वाल्मिक कराडला सीआयडीच्या ताब्यात देणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

सीआयडी लिंक तपासणार?

वाल्मिक कराड याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल आहे. तर संतोष देशमुख मर्डर प्रकरणातील आरोपी हे कराडशी संबंधित आहे. त्यामुळे संतोष देशमुख मर्डर प्रकरणात वाल्मिक कराडचा काही संबंध आहे का? याचा तपास सीआयडीला करायचा आहे. आरोपी आणि वाल्मिक कराड यांना समोरासमोर बसवून चौकशी करण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे.

हत्येचा कट रचल्याचा आरोप

वाल्मिक कराडवर हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे. त्यामुळे आम्हाला त्याचा तपास करायचा आहे, असं एसआयटीने कोर्टात म्हटलं आहे. त्यामुळे आता कोर्ट का निर्णय देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

काय म्हणाले ॲड. सिद्धेश्वर ठोंबरे?

आज केवळ खंडणी प्रकरणात दोन्ही बाजूने युक्तीवाद करण्यात आला. कुठे ही तपासात वाल्मिक कराड यांचा कुठलाही सहभाग नाही असा युक्तीवाद कराडचे वकील सिद्धेश्वर ठोंबरे यांनी केला. त्यांच्यावर मकोका लावण्याचा कोणताही युक्तीवाद झाला नसल्याची माहिती ॲड ठोंबरे यांनी दिली.

आज कोर्टापुढे युक्तीवाद झाला. त्यांनी १० मुद्द्यावर पोलीस कोठडी मागितली. दहा दिवसाची कोठडी मागितली होती. त्या आधीच्या वेळीही पोलीस कस्टडी मागितली होती. मात्र न्यायालयीन कोठडी लावण्यात आली आहे. मकोका लावण्यात आल्याचं आमच्यासमोर काही आलं नाही. आज फक्त खंडणीचं प्रकरण होतं. मकोकाचा अर्ज आलेला नाही. आम्ही पुढच्यावेळी सांगू. आतापर्यंत तपास आला आहे. दुसऱ्या गुन्ह्यात तपास करायचं आहे, असं पोलिसांनी सांगितलं. गुन्ह्यता कराड याचा सहभाग दिसून आला नाही. पोलिसांनी परत दहा दिवसाचा कोठडी मागितली.

आम्ही जामिनाचा अर्ज केला आहे. दोन चार दिवसात सुनावणी होणार आहे. मकोकाची प्रक्रिया वेगळी आहे. सरकारी वकिलाचे नवीन मुद्दे काही नव्हते. त्यांनी कुठे कुठे मालमत्ता घेतली, ॲट्रोसिटी वगैरे मुद्दे मांडले. त्यांनी अनेक मुद्दे मांडले. पण कोर्टाने सर्व मुद्दे ग्राह्य धरले नाही, असे ॲड. ठोंबरे यांनी सांगितले.

परळी बंदची हाक

वाल्मिक कराड याला मकोका लागल्यानंतर समर्थक आक्रमक झाले. त्यांनी सकाळपासूनच तीव्र आंदोलन केले होते. समर्थक आता आक्रमक झाले आहे. त्यांनी परळी बंदची हाक दिली आहे. आज वाल्मिक कराड यांच्या आईने सुद्धा पोलीस ठाण्याबाहेर त्यांना सोडवे यासाठी ठिय्या आंदोलन केले. शहरातील विविध दुकानं आणि आस्थापनं बंद करण्यात आली आहे. परळीचे सर्व व्यवहार हे ठप्प झाले आहेत.

कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार
कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार.
शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण...
शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण....
युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही..
युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही...
'मी सिनिअर मंत्री आता...', चंद्रकांत पाटलांचं लक्ष फडणवीसांच्या पदावर?
'मी सिनिअर मंत्री आता...', चंद्रकांत पाटलांचं लक्ष फडणवीसांच्या पदावर?.
'हिंदी' भाषा सक्तीवरून सरकारची माघार, घेतला मोठा निर्णय; यापुढे...
'हिंदी' भाषा सक्तीवरून सरकारची माघार, घेतला मोठा निर्णय; यापुढे....
राज-उद्धव एकत्र आल्यास मुंबई कोणाची? युती सत्ताधार्‍यांसाठी डोकेदुखी?
राज-उद्धव एकत्र आल्यास मुंबई कोणाची? युती सत्ताधार्‍यांसाठी डोकेदुखी?.
हिंदीची सक्ती केली तर मी तर मरेनच...नितेश राणेंचं मिश्कील वक्तव्य काय?
हिंदीची सक्ती केली तर मी तर मरेनच...नितेश राणेंचं मिश्कील वक्तव्य काय?.
ठाकरे बंधू परदेशात पण चर्चा मात्र महाराष्ट्रात, सेना भवनासमोर बॅनरबाजी
ठाकरे बंधू परदेशात पण चर्चा मात्र महाराष्ट्रात, सेना भवनासमोर बॅनरबाजी.
हुसैन दलवाई यांना नाशिक पोलिसांनी घेतलं ताब्यात
हुसैन दलवाई यांना नाशिक पोलिसांनी घेतलं ताब्यात.
पाणीबाणी! लातूरमध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती
पाणीबाणी! लातूरमध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती.