भीषण | नेत्याच्या सभेपूर्वी मोठा बॉम्बस्फोट, बूथ अध्यक्षासह तिघे मृत्यूमुखी, कुठे घडली घटना?

बूथ अध्यक्षाच्या घरी बॉम्ब तयार करण्याचे काम सुरु होते. यामुळे तेथे स्फोट झाल्याचा गंभीर आरोप भाजपने केला आहे.

भीषण | नेत्याच्या सभेपूर्वी मोठा बॉम्बस्फोट, बूथ अध्यक्षासह तिघे मृत्यूमुखी, कुठे घडली घटना?
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Dec 03, 2022 | 11:32 AM

नेत्याच्या सभेपूर्वीच एका गावात बॉम्बस्फोट (Bombblast) झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला. शुक्रवारी रात्री ही घटना घडली. पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) झालेल्या या स्फोटाची तीव्रता एवढी भयंकर होती की आजूबाजूची अनेक घरं उध्वस्त झाली. या स्फोटात बूथ अध्यक्षाचं पूर्ण घर ढासळलं. बूथ अध्यक्षासह तिघांचा मृत्यू झाला.

पश्चिम बंगालमधील पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील कांथी परिसरात तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव अभिषेक बॅनर्जी यांची आज शनिवारी सभा आयोजित करण्यात आली होती. यापूर्वीच शुक्रवारी रात्री या गावात भीषण बॉम्बस्फोट झाला. या स्फोटात टीएमसीचे बूथ अध्यक्ष राजकुमार मन्ना यांचे घर पूर्णपणे उध्वस्त झाले.

या घटनेत बूथ अध्यक्ष राजकुमार मन्ना यांच्यासह तिघांचा मृत्यू झाला. तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले. या स्फोटांचे आवाज ऐकून लोक घटनास्थळी दाखल झाले. घटनेची महिती तत्काळ भूपतिनगर पोलीस स्टेशनला देण्यात आली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. शुक्रवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. अर्जुन नगर ग्रामपंचायतीच्या नरयाबिला गावात ही घटना घडली.

राजकुमार मन्ना, त्यांचा भाऊ देवकुमार मन्ना आणि विश्वजीत गायेन या तिघांचा घटनेत मृत्यू झाला. राजकुमार मन्ना हे या परिसरात तृणमूल काँग्रेसचे जणू अध्यक्षच मानले जातात.

तृणमूल खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या सभास्थळापासून 40 किलोमीटर अंतरावरच हा स्फोट झाला. तर टीएमसी बूथ अध्यक्ष राजकुमार मन्ना यांचे घर उध्वस्त झाल्यानंतर भाजपानेच गंभीर आरोप लावलेत.

भाजपाचा आणखी गंभीर आरोप

या स्फोटांवरून भाजपने अधिक आक्रमक भूमिका मांडली. बूथ अध्यक्षाच्या घरी बॉम्ब तयार करण्याचे काम सुरु होते. यामुळे तेथे स्फोट झाल्याचा गंभीर आरोप भाजपने केला आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.