मोदीजी आय एम सॉरी, मी शपथग्रहण सोहळ्याला येणार नाही : ममता बॅनर्जी

नवी दिल्‍ली : पश्चिम बंगालच्या मुख्‍यमंत्री ममता बनर्जी या नरेंद्र मोदी यांच्या शपथग्रहण कार्यक्रमाला हजर राहणार नाहीत. बंगालमध्ये झालेल्या राजकीय हिंसाचारात 54 जणांचा मृत्यू झाला, असा दावा भापज कार्यकर्त्यांनी केला होता. या आरोपांमुळे ममता यांनी मोदींच्या शपथग्रहण कार्यक्रमाला उपस्थित न राहाण्याचा निर्णय घेतला आहे. ममता बॅनर्जी यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली. त्यांनी मोदींना पुन्हा एकदा […]

मोदीजी आय एम सॉरी, मी शपथग्रहण सोहळ्याला येणार नाही : ममता बॅनर्जी
Follow us
| Updated on: May 29, 2019 | 6:58 PM

नवी दिल्‍ली : पश्चिम बंगालच्या मुख्‍यमंत्री ममता बनर्जी या नरेंद्र मोदी यांच्या शपथग्रहण कार्यक्रमाला हजर राहणार नाहीत. बंगालमध्ये झालेल्या राजकीय हिंसाचारात 54 जणांचा मृत्यू झाला, असा दावा भापज कार्यकर्त्यांनी केला होता. या आरोपांमुळे ममता यांनी मोदींच्या शपथग्रहण कार्यक्रमाला उपस्थित न राहाण्याचा निर्णय घेतला आहे.

ममता बॅनर्जी यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली. त्यांनी मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच, बंगाल हिंसाचार प्रकरणी करण्यात येत असलेले सर्व आरोप हे तथ्यहीन आहेत, त्यामुळे त्या नाईलाजाने मोदींच्या शपथग्रहण कार्यक्रमात सहभागी होऊ शकणार नाहीत, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या.

“बंगालमध्ये कुठलीही राजकीय हत्या झालेली नाही. या हत्या वैयक्तिक शत्रूता, कौटुंबीक वाद आणि इतर विवादांमुळे झाल्या असाव्या. यांचा राजकारणाशी संबंध नाही. आमच्याजवळ असा कुठलाही रेकॉर्ड नाही”, असं स्पष्टीकरण ममता बॅनर्जींनी दिलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मंत्रिमंडळातील काही सदस्य गुरुवारी 30 मे रोजी शपथ ग्रहण करतील. यावेळी बिम्सटेक देशांचे प्रतिनिधी, ख्यातनाम लोक, राजकारणी आणि 54 विशेष पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आलं आहे. त्याशिवाय किर्गिस्तानचे राष्ट्रपती सुरोन्बे जीनबेकोव आणि मॉरिशअसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जगन्नाथ हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. तसेच, गेल्या काही वर्षात पश्चिम बंगालमध्ये राजकीय हिंसाचारात मृत्यू पावलेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांना आवर्जून आमंत्रित करण्यात आलं आहे, अशी माहिती भारतीय जनता पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याने दिली.

नरेंद्र मोदींच्या शपथग्रहण सोहळ्याला कोण-कोण येणार

  • सर्व भाजप मुख्यमंत्री
  • सर्व एनडीए मुख्यमंत्री
  • प्रत्येक राज्याची लोकसभा निवडणूक नियोजन समिती
  • भारतातील सर्व देशाचे राजदूत
  • माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग
  • माजी राष्ट्रपती प्रतिभा सिंग पाटील
  • माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी
  • सर्व भाजप खासदार
  • पंजाब मुख्यमंत्री कॅप्टन अमेन्द्रसिंग
  • दिल्ली मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल
  • काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी
  • रजनीकांत
  • कमल हसन

शपथग्रहण सोहळ्याला कोण गैरहजर राहणार

  • पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी
  • तामिळनाडूचे मुख्यमंत्री पलमीस्वामी

पश्चिम बंगालमध्ये भाजपची स्थिती

नुकत्याचं पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपने ऐतिहासिक असा विजय मिळवला. देशात भाजपप्रणित एनडीएने 542 पैकी 352 जागांवर विजय मिळवला. पश्चिम बंगालमध्येही पक्षाची कामगिरी उल्लेखनिय ठरली. तृणमूल काँग्रेसची एकहाती सत्ता असलेल्या पश्चिम बंगालमध्ये भाजपने 18 जागा जिंकल्या. गेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये ही संख्या केवळ दोन होती.

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.