संजय राठोड यांचा राजीनामा, आता वनमंत्रिपदाची धुरा कोणाला?

वनमंत्रिपद मिळावं यासाठी संजय रायमुलकर, गोपीकिशन बाजोरिया हे विदर्भातील शिवसेनेचे आमदार प्रयत्न करत असल्याचं कळत आहे (Who will be Forest Minister if Sanjay Rathod Resigns)

संजय राठोड यांचा राजीनामा, आता वनमंत्रिपदाची धुरा कोणाला?
संजय रायमुलकर, संजय राठोड, गोपीकिशन बाजोरिया
Follow us
| Updated on: Feb 28, 2021 | 3:38 PM

मुंबई : पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात (Pooja Chavan Death Case) वाढत्या दबावानंतर वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांची सपत्नीक भेट घेऊन कॅबिनेट बैठकीपूर्वीच संजय राठोड यांनी राजीनामा दिला. संजय राठोड यांनी राजीनामा दिल्यामुळे वनमंत्रिपदी कोणाची वर्णी लागणार? याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. (Who will be Forest Minister if Maharashtra Minister Sanjay Rathod Resigns)

संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर आता त्यांच्या मंत्रिपदाचा तात्पुरता कारभार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ठरवतील त्याच मंत्र्याकडे जाईल. मंत्रिमंडळ विस्तारात वनमंत्री म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ज्याचं नाव निश्चित करतील, त्यालाच वनमंत्री पदाची लॉटरी लागेल.

शिवसेनेत लॉबिंग चालत नाही, असं म्हटलं जातं. पण वनमंत्रिपद मिळावं यासाठी संजय रायमुलकर, गोपीकिशन बाजोरिया हे विदर्भातील शिवसेनेचे आमदार प्रयत्न करत असल्याचं कळत आहे. तर मुंबई-ठाण्यातील आमदारही वनमंत्रीपद मिळेल का यासाठी प्रयत्न करत असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

संजय रायमुलकर यांचा परिचय

– संजय रायमुलकर सलग तिसऱ्यांदा शिवसेना आमदार – बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर विधानसभा मतदारसंघातून आमदार – शिवसेनेच्या विदर्भातील बड्या नेत्यांपैकी एक

गोपीकिशन बाजोरिया यांची कारकीर्द

– गोपीकिशन बाजोरिया हे शिवसेनेचे विधानपरिषद आमदार – अकोला वाशिम बुलडाणा मतदारसंघातून विधानपरिषदेवर – 2004, 2010 आणि 2016 असे सलग तिसऱ्यांदा शिवसेना आमदार – अकोट, हिवरखेडमध्ये कापूस आणि लघु उद्योग विकासात मोठा हातभार – शिवसेनेच्या विदर्भातील बड्या नेत्यांपैकी एक

वर्षा बंगल्यावर काय घडलं?

दुपारी अडीचच्या सुमारास संजय राठोड पत्नी शीतल आणि मेहुणे सचिन नाईक यांच्यासह वर्षा बंगल्यावर गेले. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाच्या चौकशीनंतरच राजीनामा स्वीकारण्याची विनंती राठोड यांनी केली. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री एकनाथ शिंदे यांची स्वतंत्र दालनात चर्चा झाली. संजय राठोड यांचा राजीनामा घेण्यास एकनाथ शिंदे यांनी विरोध केला. राठोड यांनी पोहरादेवीच्या महंतांशी बोलण्याची विनंती केली, परंतु मुख्यमंत्र्यांनी चर्चेला नकार दिला. मला माझा निर्णय घ्यावा लागेल, अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी घेतली होती.

सपत्नीक भेटण्यामागे कारण काय?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज संध्याकाळी 5.30 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर कॅबिनेटची बैठक होणार आहे. या बैठकीपूर्वीच राठोड यांनी आपला राजीनामा सादर केला. संजय राठोड यांनी सपत्नीक मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात होतं. पूजा चव्हाण प्रकरणात आपण निर्दोष असल्याचं राठोड हे पत्नीच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना सांगण्याचा प्रयत्न तर करत नाहीत ना? अशी शक्यताही वर्तवली जात होती.

संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर पुढे काय?

संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाची चौकशी बसवली जाण्याची चिन्हं आहेत. यानुसार संजय राठोड यांचीही चौकशी केली जाईल. राठोड दोषी आढळल्यास त्यांच्यावर त्यांच्यावर कारवाई होणार का, याकडे सर्वांचं लक्ष आहे. (Who will be Forest Minister if Maharashtra Minister Sanjay Rathod Resigns)

आमदारकी आणि मंत्रिपदाचाही राजीनामा देणार?

राठोड हे आमदारकी आणि मंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याची शक्यता अधिक वर्तवली जात आहे. आमदारकी आणि मंत्रिपदाचा राजीनामा देऊन राठोड पुन्हा निवडणुकीला सामोरे जातील. त्यातून जनता आणि समाज आपल्याच पाठीशी असल्याचंही दाखवून देण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. तसेच पुन्हा निवडून आल्यानंतर त्यांचा मंत्रिमंडळात परतण्याचा मार्गही मोकळा होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

या अडचणीही आहेत

राठोड यांनी राजीनामा दिल्यास त्यांना पुन्हा तिकीट देण्यात शिवसेनेकडून विरोध होऊ शकतो. पूजा चव्हाण प्रकरणात शिवसेनेची प्रतिमा मोठ्या प्रमाणावर मलिन झाली आहे. त्यामुळे शिवसेनेची प्रतिमा आणखी मलिन होऊ नये म्हणून राठोड यांना तिकीट देण्यास शिवसेनेतून विरोध होऊ शकतो, असंही सूत्रांनी सांगितलं.

महंत राठोडांच्या पाठीशी

दरम्यान, पोहरादेवीच्या महंतांनी पुन्हा एकदा राठोड यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचं म्हटलं आहे. कोणत्याही चौकशीशिवाय राठोड यांचा राजीनामा घेऊ नये, असं आवाहन महंतांनी मुख्यमंत्र्यांना केलं आहे. राठोड यांचा राजीनामा घेऊ नये म्हणून पोहरादेवीतून मुख्यमंत्र्यांना ई-मेल पाठवण्यात येणार असल्याचं महंत जितेंद्र महाराज यांनी स्पष्ट केलं.

संबंधित बातम्या :

संजय राठोड पत्नी आणि मेव्हण्यासह मुख्यमंत्र्यांना भेटणार; कॅबिनेटपूर्वीच मोठा निर्णय होणार?

संजय राठोड यांनी राजीनामा दिल्यास पुढचे पर्याय काय?; वाचा सविस्तर

मोठी बातमी ! आधी मुख्यमंत्र्यांची भेट, नंतर पोहरादेवीला जाणार, संजय राठोड यांचं ठरलं

(Who will be Forest Minister if Maharashtra Minister Sanjay Rathod Resigns)

Non Stop LIVE Update
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.