नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात कोणाला कोणतं मंत्रिपद?

नवी दिल्ली : देशभरात भाजप आणि एनडीएला मिळालेल्या घवघवीत यशानंतर आता मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. काही मंत्र्यांना नव्या जबाबदारीसह पुन्हा आणलं जाणार आहे. तर काहींना डच्चू मिळण्याची शक्यता आहे. मात्र सर्वात जास्त उत्सुकता आहे ती मंत्रिमंडळात सामील होणाऱ्या नव्या चेहऱ्यांची. शिवाय मोदींच्या मंत्रिमंडळातील दोन खात्यांकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या …

नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात कोणाला कोणतं मंत्रिपद?

नवी दिल्ली : देशभरात भाजप आणि एनडीएला मिळालेल्या घवघवीत यशानंतर आता मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. काही मंत्र्यांना नव्या जबाबदारीसह पुन्हा आणलं जाणार आहे. तर काहींना डच्चू मिळण्याची शक्यता आहे. मात्र सर्वात जास्त उत्सुकता आहे ती मंत्रिमंडळात सामील होणाऱ्या नव्या चेहऱ्यांची. शिवाय मोदींच्या मंत्रिमंडळातील दोन खात्यांकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. ते म्हणजे अर्थमंत्रालय आणि गृहमंत्रालय. सध्या गृहमंत्रीपदासाठी भाजप अध्यक्ष अमित शाह यांचं नाव चर्चेत आहे, तर अर्थमंत्रालयासाठी पियुष गोयल चर्चेत आहेत.

अमित शाह गृहमंत्री?

भाजप अध्यक्ष, पक्षाचे चाणक्य आणि मोदींच्या सर्वात जवळचे मानले जाणारे अमित शाह यांच्याकडे गृहमंत्रालयाचा कारभार सोपवण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शाह याआधी गुजरात सरकारमध्ये गृहमंत्री होते. त्यामुळे केंद्रातही त्यांच्यावर हीच जबाबदारी देण्याची शक्यता आहे. असं झाल्यास राजनाथ सिंह यांचं मंत्रालय बदलावं लागणार आहे. मोदींच्या विद्यमान मंत्रिमंडळात ते दुसऱ्या क्रमांकाचे म्हणजेच गृहमंत्री होते.

त्यांच्याकडून गृहमंत्रालयाची जबाबदारी काढल्यानंतर त्यांना संरक्षण मंत्रालय देण्यात येईल अशी शक्यता आहे.

मोदींचे संभाव्य मंत्रिमंडळ
बालाकोट हल्ल्यानंतर मोदी सरकार कणखर नेतृत्वाचं सरकार म्हणून समोर आलं. मात्र आर्थिक पातळ्यांवर देशाची परिस्थिती खराब आहे. नव्या सरकारसमोर हे आव्हान असून अर्थ मंत्रालयावरील कामकाजाचा बोजा वाढणारा आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे अरुण जेटलींना हा कार्यभार कितपत पेलवेल ही शंका आहे. याच जानेवारी महिन्यात जेटलींना वैद्यकीय उपचारांसाठी अमेरिकेला जावं लागलं होतं. त्यावेळी पियुष गोयल यांनी अर्थसंकल्प मांडला होता. त्यामुळे नव्या मंत्रिमंडळात पियुष गोयल यांचं नाव अर्थमंत्रीपदासाठी पक्कं झाल्याची कुजबूज आहे.

दुसरीकडे परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराजही प्रकृती अस्वास्थ्यामुळे नवी जबाबदारी घेण्यास तयार नाहीत.. त्यांच्या जागी सध्याच्या संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांची वर्णी लागण्याची चिन्हं आहेत.

स्मृती इराणींना कोणतं मंत्रिपद?
अमेठीमधून राहुल गांधींचा पराभव करणाऱ्या स्मृती इराणी यांनाही मंत्रिमंडळात महत्त्वाचं स्थान मिळू शकतं. कायदेमंत्री रवी शंकर प्रसाद यांच्याकडेही महत्त्वाच्या खात्याचा भार दिला जाऊ शकतो.

नितीन गडकरी यांच्याकडे अनेक खात्यांचा कारभार आहे. त्यांचं कामही उत्तम सुरु आहे. त्यामुळे ते आपलं सुरु असलेलं कामच पुढे नेतील. अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनाही यंदा मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे. मोदींच्या टीममधील ते एक महत्त्वाचा मुस्लिम चेहरा आहेत.

याशिवाय धर्मेंद प्रधान, प्रकाश जावडेकर, जगत प्रकाश नड्डा यांचीही मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे.

आधीच्या मंत्रिमंडळातील हरदीप पुरी, के.जे.अल्फोन्सो आणि मनोज सिन्हा यांचा पराभव झाल्यानं त्यांना डच्चू दिला जाऊ शकतो.

मोदींचे संभाव्य मंत्रिमंडळ

  • स्मृती इराणी
  • रवी शंकर प्रसाद
  • नितीन गडकरी
  • मुख्तार अब्बास नक्वी
  • धर्मेंद्र प्रधान
  • प्रकाश जावडेकर
  • जगत प्रकाश नड्डा

यांना मिळणार डच्चू

  • हरदीप पुरी
  • के.जे.अल्फोन्सो
  • मनोज सिन्हा

मित्रपक्षांना काय?

भाजपला शतप्रतिशत बहुमत मिळालं आहे त्यामुळे त्यांना घटकपक्षांची तशी गरज नाही. मात्र तरीही काही मंत्रीपदं घटकपक्षांनाही दिली जातील. बिहारमध्ये नितीश कुमार यांनी चांगली कामगिरी केली. या पक्षातून एक-दोन मंत्री नव्या कॅबिनेटमध्ये दिसून येतील. रामविलास पासवान यांचा एलजेपी, शिवसेना आणि अकाली दलालाही नव्या कॅबिनेटमध्ये स्थान असेल. मात्र निकालाचे आकडे पाहता घटकपक्षांनी मोठ्या मंत्रालयांकडे न पाहिलेलंच बरं.

महाराष्ट्राला मंत्रिपदं
केंद्रातील एवढ्या दमदार विजयानंतर येणाऱ्या विधानसभा निवडणुका नव्या विजयाचं आव्हान घेऊन येतात.यंदा महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंडमध्ये विधानसभा निवडणुका आहेत. त्यामुळे केंद्रिय मंत्रिमंडळात या राज्यांना नक्की स्थान देण्यात येईल.

पश्चिम बंगाल

लोकसभा निवडणुका मोदींचा विजय असला तर पश्चिम बंगाल त्या विजयाची ट्रॉफी आहे. गेल्या निवडणुकीत केवळ 2 जागा मिळवणाऱ्या पश्चिम बंगालमधील बाबुल सु्प्रियोंना कॅबिनेटमध्ये स्थान मिळालं होतं. यंदा तर खासदारांची संख्या 18 वर पोहोचली आहे. शिवाय 2021 मध्ये बंगालमध्ये विधानसभा निवडणुकाही होऊ घातल्या आहेत. त्यामुळे भाजपचं पुढचं मिशन पश्चिम बंगालमध्ये आपलं सरकार बनवण्याचं असेल. त्यामुळे या राज्यातही मंत्रिपदं दिली जातील.

केंद्रातील मोदी सरकारचा शपथविधी 30 मे रोजी होईल अशी शक्यता आहे. गेल्या निवडणुकीत मोदींनी 26 मे रोजी शपथ घेतली होती. अतिशय नेत्रदीपक सोहळ्यात हा शपथविधी पार पडला होता. यंदाचा सोहळा 2014 पेक्षाही भव्य असेल. मोदींना विजयाच्या शुभेच्छा देणारे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहूंपासून शी जिनपिंग आणि व्लादिमीर पुतिनसारखे बडे चेहरे या सोहळ्याला उपस्थिती लावतील पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनाही निमंत्रण पाठवलं जाईल अशी शक्यता आहे.

VIDEO:

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *